सोनाली नवांगुळ

पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका - सलमा. अनुवाद - सोनाली नवांगुळ)

Submitted by ललिता-प्रीति on 13 August, 2022 - 03:28

पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)

सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.

संवाद - वीणा जामकर / सोनाली नवांगुळ

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', ’बेभान’, ’मर्मबंध’, 'लालबाग परळ', ’तुकाराम’, 'पलतडचो मुनिस', 'कुटुंब', 'मित्रा' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल', ’दावेदार’, ’वदनी कवळ घेता’, ’तीच ती दिवाळी’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणा जामकर यांनी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.

प्रकार: 

'ड्रीमरनर' - ऑस्कर पिस्टोरिअस, अनु. सोनाली नवांगुळ

Submitted by चिनूक्स on 3 August, 2012 - 13:33

उद्या, म्हणजे शनिवारी दुपारी, ऑस्कर पिस्टोरिअस लंडनला सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत आपली पहिली शर्यत धावेल. यापूर्वी त्यानं अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. पण उद्याची शर्यत मात्र खास असेल. ही शर्यत तो जिंको न जिंको, पण मैदानात उतरताक्षणी त्यानं इतिहास घडवलेला असेल. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कृत्रिम पायांनिशी धावणारा तो पहिला स्पर्धक असेल. जेमतेम पंचविशीचा ऑस्कर ’ब्लेडरनर’ या नावानं ओळखला जातो. ’पाय नसलेला जगातला सर्वांत वेगवान मनुष्य’ असंही त्याला म्हटलं जातं, कारण कार्बन फायबरांपासून तयार केलेले कृत्रिम पाय लावून तो धावतो.

Subscribe to RSS - सोनाली नवांगुळ