भाषा

नवीन म्हणी

0

नवीन युगाच्या नव्या म्हणी या धाग्यावर येउद्यात

उदा.

नकटीच्या प्रोफाईलला व्हायरस फार...

चार दिवस देओलचे, चार दिवस लिऑनचे

आले अण्णांच्या मना, तेथे कुणाचे चालेना..

हितगुज दिवाळी अंक २०११ - मुदतवाढ

0

हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली!

काय म्हणता??? वेळ थोडा कमी पडला? अहो अजून दोन-तीन जणांकडूनही असंच काहीसं ऐकलं.

ह्यावर्षीच्या हितगुज दिवाळी अंकाला तुमच्या उत्तमोत्तम साहित्याने सजवावं हाच आमचाही मानस; तेव्हा साहित्य मागवण्याच्या मुदतीचे काटे आम्ही थोsssडे मागे करतोय, केवळ तुमच्याकरताच!

हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य पाठवण्याची मुदत वाढवून ९ ऑक्टोबर २०११ केली आहे.

तेव्हा तुमचं साहित्य पाठवताय ना?

Diwali-3_updated.jpg

मराठी उच्च शिक्षण समिती - "मुशिस"

0

पार्श्वभूमी

देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे.

रसग्रहण स्पर्धा: अन्तरीचे धावे: लेखक भानु काळे

0

अंतरीचे धावे
लेख़क : भानू काळे
प्रकाशक मौज प्रकाशन
प्रकाशन: जून २००९

'अंतरीचे धावे' च्या निमित्ताने ..

हिरना... समझ-बूझ बन चरना

कुमारांचं निर्गुणी भजन ऐकत होतो.
कुमारांनी ते शब्द इतक्या आर्ततेने आळवलेत की काही केल्या ते शब्द विसरेनात. पण त्याचा अर्थ मात्र तितकासा कळला नाही.

शब्द असे आहेत -

हिरना...
समझ बूझ बन चरना
एक बन चरना
दूजे बन चरना
तीजे बन पग नही धरना

तीजे बन में पाँच पारधी
उन के नजर नही पडना
पाँच हिरना पच्चीस हिरनी
उन में एक चतुर ना

तोए मार तेरे मास विकावे
तेरे खाल का करेंगे बिछोना

कहे कबीरा जो सुन भइ साधो
गुरू के चरन चित धरना

इथून थोडा-फार अर्थ कळला. http://kabir-bani.blogspot.com/2009/10/5-hirana.html

हे हरिणा, या अरण्यात समजून-उमजून चर. अतिशय सावधगिरीने वावर.

सुपरसेन्सॉरशिप : आरक्षण या चित्रपटाला विरोध बरोबर कि चूक ?

0

सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला आरक्षण हा पिकचर काही नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वर ही सुपरसेन्सॉरशिप असावी का ? सेन्सॉर बोर्ड नीट काम करते असे वाटते का ?

स्वारस्याची अभिव्यक्ती

0

वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.

स्वारस्याची अभिव्यक्ती

मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का?
वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार?
मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय?
वामनः हो. तेच ते.

मग गुगलवर मराठीच का नाही?

0

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'