शैलजा यांचे रंगीबेरंगी पान

ऋण

भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

नववर्षाच्या शुभेच्छा

Lotus_himachalmb.jpg

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!
(जरा उशीराच देते आहे, पण असूदेत फिदीफिदी )

मनाचिये गुंती...

जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून.

शुभेच्छा आणि शुभेच्छूक!!

ICHUK.jpg

बहुत काय लिहावे, म्हणावे? केवळ अगत्य असो द्यावे!! हाहा


हे प्रचि मी काढलेले नाही, कोणी काढले आहे मला ठाऊक नाही, पण ज्याने कोणी काढले आहे त्याच्या विनोदबुद्धीला आणि सामाजिक व्यंग टिपण्याच्या कलेला दाद द्यावीशी वाटली.

कासची फुलं

कासच्या पठारावर फुललेल्या फुलांचे आणि इतर दृश्यांचे टिपलेले काही फोटो.

१. सोनकी/ Senecio grahmil

२. शेरल/ Persicaria giabra

३.

एका कोळियाने..

grungycobweb_mb and w.jpg

ह्या प्रकाशचित्राची रंगीबेरंगी आवृत्ती इथे पहा.

वाटले होते... !

तुझे खोटे बहाणे लाघवी का भासले होते?
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते..

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते

किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?

युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...

राजसगाणी

भाग १ -अक्षय कविता

पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही. ...

अक्षय कविता

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.