aschig यांचे रंगीबेरंगी पान

'जित्याची खोड'ची पार्श्वभुमी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे वाचण्याआधी कृपया 'जित्याची खोड' वाचा: http://www.maayboli.com/node/22014

लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०

त्या कथानकाशी काही साधर्म्य नसले तरी स्टॅनिसलॉ लेमची 'The chain of chance' मनात घोळत होती. सोबतच रामानुजन व हार्डीबद्दल पुन्हा एकदा वाचले, व ग्योडेल आणि गॅल्वा सुद्धा आठवले.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

जित्याची खोड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जित्याची खोड
लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०

"भांडणं अगदी पाचव्या वर्षापासुन जणुकाही माझ्या पाचवीलाच पुजली होती. आजुबाजुच्या मुलांबरोबर ट्रक सारख्या खेळण्यांवरुन, बगीच्यातील घसरगुंडी वापरण्यावरुन, आणि तत्सम इतर कारणांवरुन. जसा थोडा मोठा झालो आणि शाळेत जाऊ लागलो तसा इतर प्रकारच्या भांडणांमध्ये ओढल्या जाऊ लागलो. आतापर्यंतची भांडणे भौतीक पातळीवर असायची. शाळेतील टग्यांशी बरोबरी करायची शक्यता नसल्याने त्यांनी केलेल्या खोड्यांचा राग घरच्यांवर काढल्या जायचा."

विषय: 
प्रकार: 

निरिक्षणे बर्फाची

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

sP2250111.jpg
वा छान दिसतोय दूरच्या डोंगरांवर बर्फ

sP2250105.jpg
पण हे काय, बर्फ इथेही आहे. आणि सुर्याला काय झालं? अवकाश निरिक्षणांचा बट्याबोळ.

sP2250124.jpg
कोवळा पण डोळ्यांना दिपवणारा सकाळचा सुर्यप्रकाश. आज तरी रात्री निरभ्र असेल आकाश?

(फेब्रु. २००९, पालोमार, कॅलिफोर्नीया)

पॅसॅडेना दर्शन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नव्या कॅमेर्‍याचे फोटो टाकण्याच्या निमित्याने आमच्या रोज परेड फेम पॅसॅडेनाची थोडी ओळख करुन द्यायचा विचार आहे.

कॅसल ग्रीन
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या प्रासादाचे हे दक्षीणाभीमुख अंग. ७ मजली हॉटेल ग्रीनच्या जोडीला हे Frederick I. Roehrig याने मुरीश व स्पॅनीश पद्धतीने घुमट, कमानी वगैरे वापरुन बनविले. अजुनही old town मध्ये हॉटेल म्हणुन प्रसिद्ध.

PC120053.JPGPC120064.JPG

ब्लॉगमधील चित्रपटांच्या गुणांची उलथापालथ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पुस्तकं वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो म्हणुन कधिकधी चित्रपट पाहतो. बरेचसे चित्रपट सुमार असतात म्हणुन विचारुन, गुण तपासुन मगच पाहतो. तरीही काहीकाही आवडत नाहीत. इतका वेळ घालवलाच आहे तर आपणही वाईट चित्रपटांबद्दल लोकांना सावध करावे म्हणुन व चांगल्यांची थोडी तारीफ करावी म्हणुन चित्रपटांना गुण देऊन माझ्या संकेतस्थळावर काही पाने भरतो. पण तुमच्याशी मी खोटे नाही बोलणार - अजुन एक अंतस्थ हेतु आहे. मी कोणते चित्रपट पाहिले हे विसरून जातो म्हणुन खरेतर हा लिहुन ठेवायचा खटाटोप - पुन्हा चुकुन तोच चित्रपट पाहु नये म्हणुन. त्यामुळे अनेकदा अगदी थोडक्यात लिहितो. आणि पुन्हा कथानकही तर reveal करायचे नसते.

प्रकार: 

माझे संगीताचे प्रयोग

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

घरी भीमसेन जोशींच्या अभंगांच्या पलिकडे फार काही संगीत नसायचे. तिसरी-चौथीत शाळेतल्या एका बाईंकडे काही दिवस पेटी शिकायला गेलो होतो. मग सातवी-आठवीत असतांना शेजारी रहाणार्‍या एका दादामुळे हिंदी सिनेमातील गाणी ऐकायची सवय लागली. या शिवाय संगीताशी फार काही संबंध तिशीपर्यंत आला नाही. सर्व प्रकारची गाणी ऐकणे सुरु असायचे, पण त्या बद्दल फार काही विचार न करता. शाळेत असतांना चित्रकला जमत नाही म्हणुन सोडलेली, तर संगीत प्रयत्न न करताच सोडलेले. त्यामुळे पॅसॅडेनाला आल्यावर कधीतरी ठरवले की आपणही पहायचे संगीत हा काय प्रकार आहे ते.

प्रकार: 

लीडर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मला बनायचे लीडर
मला बनायचे लीडर!
बनु द्याल मला लीडर?
होऊ मी? होऊ मी?
खरंच?
मी आता लीडर!
मी झालो लीडर!

काय करुया आपण आता?

Roger McGough यांच्या कवीतेचा अनुवाद

प्रकार: 

कवितेची ओळख

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी सांगतो त्यांना कविता निवडायला
आणि मग ती प्रकाशाकडे धरायला
जणु काही एखादा फोटो ...
किंवा कानाला लावून पहा म्हणतो !

सोडा एक उंदीर कवितेत आणि पहा कसा
तो येतो बाहेर शोधून त्याचा रस्ता.
किंवा हिंडा कवितेच्या दालनात,
दिव्याचे बटण शोधित भिंती चाचपडत !

मला वाटते त्यांनी करावे स्किईंग
कवितेच्या पृष्ठभागावर,
एका बाजुला असलेल्या
कवीच्या नावाला हॅलो म्हणत !

पण त्यांना मात्र ते काही नाही रुचत ..
घेतात ते कविता,
बांधतात एका खुर्चीला आणि
छळ करुन मिळवतात कबुलीजवाब !

जुन्या गादीतला कापुस काढावा
काठीने झोडपून,
तसा काढतात अर्थ कवितेतून !!

प्रकार: 

जाबरवोका

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बिलबिलाट होता आणि ते घसरडे तोव्ह
घुमत आणि फिरत होते वाबात।
सगळं मीम्सी होतं बोरोगोव्ह,
आणि मोम होते राथाडत।

जाबरवोका पासुन सावध रहा माझ्या बाळा!
जबडा जो चावतो, आणि पंजे जे पकडतात!
सावध रहा जुबजुब पक्षापासुन,
आणि फ्रुमित बंदरओढ्यापासुन।

घेतली त्याने त्याची वोरपल तलवार हाती:
कधीपासुन या मांक्सोम शत्रुचा तो घेत होता शोध।
थोडा आराम केला त्याने टुमटुम झाडाखाली,
आणि थोडा उभा ठाकला विचारात।

आणि असा तो उफिष विचारात गढला असतांना,
ज्वाळांसमान डोळे असलेला जाबरवोका,
आला वीफाकत टल्गी जंगलातुन,
आणि बरबेलला येता-येता।

एक-दोन! एक-दोन! आणि आर आणि पार,
ती वोरपल तलवार बोलली सनक-झनक!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शंभर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

शुकी ब्रुकच्या "The Joy of Teaching" या Caltech Project for Effective Teaching (CPET) अंतर्गत झालेल्या talk ला आज गेलो होतो. शिक्षकांचे काम कसे शिकवण्याचे (आणि न की मुल्यमापनाचे) असते याबद्दल थोडी चर्चा झाली, त्याचप्रमाणे context दिली तर content मिळवणे कसे सोपे जाते याबद्दलही थोडे बोलणे झाले (बरोबर अनेक अवांतर पुस्तके होतीच).

ईटलीतील Reggio Emilia या ठिकाणी Loris Malaguzzi या प्राथमीक शिक्षकाने The Reggio Approach to Early Childhood Education ची स्थापना करुन एक क्रांती घडवुन आणली. Loris Malaguzzi ची एक कविता तिथे ऐकायला मिळाली त्याचा हा किंचीत स्वैर अनुवाद.

मुलं शंभराची बनली असतात.

प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - aschig यांचे रंगीबेरंगी पान