कविता

लकेर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

प्रकार: 

अभिनय

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

तिला काहीतरी हवं असतं म्हणून..

दार उघडताचं हसून प्रेमानं त्याचं स्वागत करते
रुचकर चमचमीत लज्जतदर खा-प्यायला देते
वेल्हाळ शैलीत त्याच्याशी बोलते रमते गमते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!

पुन्हा तिला काहीतरी हवं असतं म्हणून..
ती त्याच्याशी अबोल शीतयुद्ध पुकारते
रुसते फुगते कोरडी वागणूक देते
पाठमोरी उभी राहूनचं संवाद साधते
सतत भडकते सुनावते ज्वालामुखी होते
तो आता ऐकेलचं अशा वेळी मागणी करते!!!!

प्रकार: 

मातृत्व

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

तिचं बाळं तिच्या गर्भात रुजताना

त्याच्या जन्माआधीचं
जन्माला आलेलं असतं
तिचं वात्सल्य.. तिचं प्रेम
अगदी निरपेक्ष!!!

ते फक्त तिच्याचपाशी असतं
तिच्या प्रत्येक स्पंदनात असतं
तिच्या पोटात असतं
त्याला कुणिचं धक्का लावू शकत नाही!

तिचं प्रेम
कधीच बदलत नाही
कधीच संपत नाही
कधीच उणे होत नाही
कधीच सरत नाही की मरत नाही

आयुष्याच्या प्रवासात नातीगोती
येतात जाता.. उरतात राहतात
त्यांचं प्रेम बदलत राहत
कधी हेतूपुर्वक तर कधी अपेक्षानिशी!
पण तिचं प्रेम मात्र
निरपेक्ष.. निर्हेतुक असत!

प्रकार: 

विट

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

जेंव्हा,

तू शिकवत होतास
तुझ्या हाती येणार्‍या विटांना
घर न बनवता.. घाव घालायला

तेंव्हा,
तुला थांबवत मी म्हंटले होते
नको उभारु शांतिच्या महासागरावर
प्रतिहिंसेचे बंदर
कारण,
तेंव्हाच खचून... ढासळून पडतात
विश्वासाचे उभे हिमालय
आणि
आशाआकांक्षांचे तळपते द्वीप
होऊन जातात शुष्क बंजर!!!

- हर्ट

प्रकार: 

खादाड बडबडगीते

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

१.
पापडी चुरमुरे कुरकुरीत लागले
मिरची अन कांदा चरचरित लागले
चिंचेची चटणी आंबट गोड
शेव फरसाण कैरीची फोड
सगळ्याची मिळून केली भेळ
असा आमचा भातुकलीचा खेळ

-----

२.
पुरी फुगली टमाटम
छोल्यांचा वास घमाघम
श्रीखंड खाऊ गप गप
ढेकर देऊ अsब अssब

प्रकार: 

गाणं..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हृदयाला घट्ट बिलगून आहे एक गाणं..

एका एका श्वासाने भरत जातो अंतरा,
थोडा चंद्र , थोडा सूर्य की चांदण्यांच्या मात्रा..

फुलपाखरी पंख घेऊन भुर्र फिरून येते,
मनातल्या चोराला मोकाट सोडून देते!

कुठंकुठं खण्ण वाजते अनुभूतीचे नाणं..
चढ्या लयीत गाऊन घेत्ये मिठीतलं गाणं!

खोल खोलश्या विहीरीतून आलेत सूरपक्षी
पाणी शिंपीत तुळशीपाशी तुझ्या रांगोळीची नक्षी..

एक सूर पारव्याचा, एक जीवनगाणं..
जुन्या गोधडीच्या मऊ पोतीचं आहे रेशीमगाणं...

प्रकार: 
शब्दखुणा: 

वळण

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

अनेकदा टोकाची भांडणे झाली
महिनोंमहिने शीतयुद्धे चालली

रडूनपडून आदळआपट झाली
तुझी...माझी वाट वेगळी म्हणताना
निरोप-समारोप घेऊन झाले
केलेले उपकार.. राहीलेली परतफेड
ह्यावर अवमान-अपमान करुन झाले

सगळा गुंता नकोसा झाला
सोबत नकोशी झाली
एकमेकांच्या सावल्याही नकोशा झाल्या
आहे ते जगच नकोसे झाले

प्रकार: 

बळ

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

वेदनेच्या आहारी
मृत्युच्या तोंडी असताना
व्यक्त होण्याची
मृत धडपड कुणाला दिसते? समजते?

डोळे भरुन कुणाला पाहता येत नाही
हातात हात घेऊन छातीशी लावता येत नाही
खांद्यावर डोके ठेवून रडता येत नाही
पाठिवरुन हात फिरवता येत नाही
खोल श्वास घेऊन चार शब्द बोलता येत नाही
कुणाच्या शब्दाला ओ देता येत नाही!
एकेक निर्जीव .. गतप्राण झालेल्या
अवयवातली उरलीसुरली शक्ती
काही.. काहीच कामी येत नाही

व्यक्त न होण्याची ही शिक्षा भोगायला
सगळे बळ एकवटून दिलेला...
शेवटचा एक हुंकार पुरेसा आहे!!!

-बी

प्रकार: 

ओम नमो नरेन्द्र मोदी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'नमो'मंत्र

ॐ 'नमो' भारतमाते।।
'मै नही प्रधानमंत्री
मै हु प्रधानसेवक'

देश की उन्नती के लिये
सभीको सेवक बनना है!

ॐ 'नमो' भगवते वासुदेवाय।।
'सबका साथ.. सबका विकास'
यही हमारा मंत्र है
देश के विकास के लिये
सभीको सक्रिय सहभागी होना है!

ॐ दुर्गा दैव्यै नम :।।
'बेटी बचावो.. बेटी पढावो'
यह एक जरुरत है
हर दुर्गा को बचाने के लिये
दुर्गा घर मे लाना है!

ॐ नमो नरेंद्र मोदी।।
'अच्चे दिन आने वाले है'
हर दिन.. हर रात
हर सुबह .. हर शाम
हम सभीको 'नमो' होना है!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता