ललित

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by आनंदनंदिनी on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

शब्दखुणा: 

'दरजा'

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

पुर्वप्रसिद्धी- 'माहेर' दिवाळी अंक २०११.
इथे माझ्या ब्लॉगवर (रंगीबेरंगीवर) पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख यांचे आभार.

***
***

प्रकार: 
शब्दखुणा: 

गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.

गेट क्लोजर

Submitted by दाद on 11 October, 2012 - 20:28

गेट क्लोजर...
काय फंडा आहे...

नक्की कशा कशावर कंट्रोल आहे आपला म्हणायचा... म्हणून गेट क्लोजर?
कधीतरी अख्खं आयुष्यच झपाटून टाकणारं, काहीतरी गवसतं.... आयुष्यात आल्याचं कळतं. आपलाच एक भाग बनून जातं. त्याच्याविना आयुष्यं अधुरं, अपुरं वाटेल असं काहीतरी. त्याविना दु:खं अधिक गहिरं अन आनंदही कोमेजलेला असतो. त्याच्या मनातलं हसू आपल्या जिवणीवर झुळझुळतं, त्याची काळजी आपल्या काळजाचं पाणी होऊन भळभळते.... अन तिथं ओघळल्या सरीनं आपलं जग चिंब होतं.

शब्दखुणा: 

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

गुरुदत्त

Submitted by अशोक. on 10 July, 2012 - 04:59

guru1.jpg

काल ९ जुलै ~ हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल लिहिताना वाचताना चर्चा करताना आपण हरवून जातो अशा दोन कलाकारांचा हा जन्मदिवस. ज्यांची नावे उच्चारताच सर्वच स्तरावरील रसिकप्रेमींच्या मनी ज्यांच्याबद्दल 'अपनापन' भावना निर्माण होतेच होते, ते दोघे - गुरुदत्त आणि संजीवकुमार.

शब्दखुणा: 

"तो दिवस"

Submitted by मोहन की मीरा on 21 June, 2012 - 03:07

मी त्या वेळेस आर्टीकल शीप करत होते. आमचे एक काम मुंबई शेअर बाजारात होते. मोठ्ठ्या ब्रोकर चे खूप काम आमचे सर करायचे. त्यामुळे खूपशी मुलं नेहेमी त्यांच्या ऑफिसला जायचो. एकदा गेले की ३-४ महिने आम्ही रोटेशन ने तिकडेच असायचो. मला तिकडे जाणं आवडायचं. याच कारण मला तो फोर्ट आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडायचा. त्या ब्रोकरची दोन ऑफिसे होती. एक मोठ्ठ शेअर बाजाराच्या इमारती मध्ये आणि दुसरे त्याच्याच मागच्या बाजूला कर्‍हाड बँकेच्या इमारती मध्ये. आम्ही बर्याचदा कर्‍हाड बँकेच्या इमारती मध्ये बसायचो. शेअर बाजाराची इमारत आणि आमची इमारत ह्यात एक अगदी छोटा रस्ता होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल एवढा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एकटेपणा व स्वातंत्र्य

Submitted by SuhasPhanse on 2 June, 2012 - 03:49

एकटेपणा व स्वातंत्र्य
स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - ललित