पैला नंबर

Submitted by आतिवास on 25 September, 2013 - 10:52

आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.

गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची.
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.

म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.

पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.

कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.

एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं.
जोरात चिमटा काढला बबलीला.
रडली लई. खच्चून.

आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं.

पैला नंबर गेला म्हणा.
जाउंदे.

* अन्यत्र पूर्वप्रकाशित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैला नंबर गेला म्हणा.
जाउंदे.>> नंतर काय