माय

माय मराठी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 February, 2021 - 02:04

माय मराठी

मराठी लळे लाविले माय ऐसे
मनाच्या तळी प्रेम धारा विशेषे
स्वये ज्ञानियाचे कृपादान जेथे
तुकाराम बोले विठू डोलविते

वीरा शाहिरीने रणा जागविले
जिथे लावणीने मना मोहविले
विविधा कळा नाटके नौरसीची
गुणा खाणिया व्यापी या जीवनाची

बहु थोर सारस्वता जन्मदात्री
विशेषे गुणे डोलते या धरीत्री
असे रांगडी माय सह्याद्रिकाची
विदर्भा तशी मोकळी मन्मनाची

किती स्वैरता धावता चौदिशांसी
प्रवाही गुणे भूषवी सर्व देशी
मना रंजवी ओवी बहिणा विशेषी
वरी सार ते दाविते जीवनासी

माझी आई

Submitted by संतोष वाटपाडे on 17 January, 2014 - 21:30

बांधावरचा हिरवा चारा,
गवत दुधाळी टवटवलेले,
पाजळलेल्या जुन्या विळ्याने,
कापून भार्‍यामध्ये मोठ्या,
आणायाची जेव्हा आई,
खुंट्याभोवती पिंगा घालत
धावायाच्या सार्‍या गायी....

परसामध्ये सदाफ़ुलीला,
प्राजक्ताला कोरफ़डीला,
विहिरीवरच्या थारोळ्यातुन,
वरती येता दिसता आई....
ढळती सांज असूनही त्यांची,
आंघोळीला सदाच घाई...

मावळतीचा सुर्य तांबडा ,
गोंदण झाकून विसावलेला,
तसेच कुंकू रुंद कपाळी,
घामासोबत वाहत येई...
कष्ट करुन थकल्यावरही
सुंदर वाटायाची आई...

कोपर्‍यातली फ़ुरफ़ुरणारी,
विस्तवातली चूल हासरी,
सुखदुःखे गार्‍हाणी मांडत,
आईजवळी व्याकुळ काही...
भाकर भाजून गहिवरलेली ,

शब्दखुणा: 

माय....!!

Submitted by मकरन्द जामकर on 7 May, 2012 - 06:45

माय....!!

मकरंद जामकर
०७-०५-१२

आमास्नी वरपाया,
रांधतीस चारठाव ,
शिळपाक सोतास्नी ,
हाय मला ठाव .

आमास्नी गंद पावडर ,
सणा वारा चंगळ,
काटकावानी तू ,अन,
जूणेर लई वंगळ.

भाजले लेकीचे हाथ ,
घरदार ईकून ,
तीत बी म्होर तू ,
दाग दागीन ईकून .

घरादाराच्या वज्यान,
वाकलीस तू माय ,
संसाराच्या फिकीरीन ,
झिजलीस तू माय .

नाक लगड निट मेल्या ,
उग देतीस शिव्या मला ,
तुज्याकून मोट्टा देव ,
माय,दाव तरी मला ...!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माय