माय....!!

Submitted by मकरन्द जामकर on 7 May, 2012 - 06:45

माय....!!

मकरंद जामकर
०७-०५-१२

आमास्नी वरपाया,
रांधतीस चारठाव ,
शिळपाक सोतास्नी ,
हाय मला ठाव .

आमास्नी गंद पावडर ,
सणा वारा चंगळ,
काटकावानी तू ,अन,
जूणेर लई वंगळ.

भाजले लेकीचे हाथ ,
घरदार ईकून ,
तीत बी म्होर तू ,
दाग दागीन ईकून .

घरादाराच्या वज्यान,
वाकलीस तू माय ,
संसाराच्या फिकीरीन ,
झिजलीस तू माय .

नाक लगड निट मेल्या ,
उग देतीस शिव्या मला ,
तुज्याकून मोट्टा देव ,
माय,दाव तरी मला ...!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाक लगड निट मेल्या ,
उग देतीस शिव्या मला ,
तुज्याकून मोट्टा देव ,
माय,दाव तरी मला ...!!>>>>

माय परास मोट्टाला देव
न्हायरे बाप्पा न्हाय.