Submitted by राजेश्री on 6 July, 2018 - 21:11
माझे माहेर
माझिया मनाने का दंग व्हावे
विठु नाम मुखी का व्यर्थ घ्यावे
पंढरीची आस ना मजलागी कणभर
जीव होई कासावीस माय माझी पंढरपूर
बा विठ्ठला तुझी का करावी आम्ही वारी
माय बाप जिथे माझे तिथे माझी पंढरी
तुझिया भेटीची वाट किती खडतर
मायबापाची माझ्या दरसाल येरझार
वाट भेगाळलेली जसे रोखले तू मेघा
मायबापाच्या पायी रक्ताळलेल्या भेगा
तुझ्यासाठी ठेवतील मायबाप उपवास
तुझे मुख पाहता त्यांची सुटे एकादस
तुझ्या नामाचा चालेल आता सतत गजर
तुझ्या भेटीसाठी निघाले बघ माझे माहेर
रे काळ्या तुझा असा करिते दुस्वास
तुझ्या भेटीची साऱ्याला का लाविशी आस
©राजश्री जाधव-पाटील
०६/०७/२०१८
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा