'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०१०)

Submitted by सुनिधी on 9 March, 2010 - 10:46

mahila_1.jpg

नमस्कार मायबोलीकर,

८ मार्च. 'जागतिक महिला दिन'.

या निमित्त 'संयुक्ता' तर्फे गरजू संस्थांना देणगी देण्यात यावी अशी कल्पना मांडली गेली. हे काम 'सुपंथ' तर्फे करता येऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर 'सुपंथ' चे काम पहाणार्‍या सदस्यांनी तशी तयारी दर्शवली. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).

३१ मार्च २०१० पर्यंत देणगी गोळा करुन ती काही संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या पुण्यातील कोथरुड येथील अंध मुलींची शाळा, पाषाण शाळा, सुमती बालवन अश्या काही संस्था देणगीसाठी विचारात घेतल्या गेल्या आहेत. ह्या पैकी एक ते दोन संस्थांना तरी मदत करता येईल अशी आशा आहे.

ही योजना सर्वांकरता खुली केली तर जास्त रक्कम जमा होईल या हेतूने सर्व मायबोलीकरांना मदतीचे आवाहन करत आहोत. ३१ मार्चपर्यंत तुम्ही देणगीची रक्कम पाठवू शकता.

पैसे पाठवण्याबाबत माहिती-

रुपयांत रक्कम कृपया सुपंथ च्या बँक खात्याला पाठवा. त्यावर मेमो मधे 'महिला दिन' असे लिहावे. खाते क्रमांक वगैरे बद्दलची माहिती खाली आहे.

Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

जर डॉलर्स मधे रक्कम पाठवणार असाल तर कृपया केदार जोशी (मायबोली नाव 'केदार') ह्यांना ईमेल करावे व त्यांच्याकडुन त्यांचा घरचा पत्ता घेऊन तिथे डॉलर्स मधे चेक पाठवावा. केदार ते पैसे सुपंथ च्या खात्यावर जमा करतील. त्यावर पण 'महिला दिन' असे लिहावे.

सुपंथ बद्दलची ही लिंक पहावी - http://www.maayboli.com/node/13486

अधिक माहितीसाठी इथे प्रश्न विचारले तरी चालतील.

धन्यवाद!!!
-संयुक्ता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामली, तुम्हाला जितकी इच्छा असेल तितके करु शकता. इतकी मात्र खात्री आहे, जितके पैसे जमतील त्या सर्व पैशाचा उत्तम विनियोग होउ शकेल.

काही शंका आहेत-

देणगी कोणाला द्यायची यात काही चॉईस असणार आहे का? की संयुक्ता समिती ठरवेल?
उदा- मला जर अंधशाळेलाच "स्पेसिफि़क" मदत करायची असली तर ?
आणि इथल्या इथे भारतात चेक सुपूर्द करणे सोपे पडेल. मी रक्कम तुम्हाला कळवते. महिला दिन विशेष मध्ये तुम्ही अ‍ॅड करु शकता.
रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का?
टोटल रकमेच्या विनीयोगाचा हिशेब देणगीदाराला मिळु शकेल का?

सुपंथ बद्दलची ही लिंक http://www.maayboli.com/node/13486 वरील आवाहनात देता येईल का? ज्यामुळे 'सुपंथ', Account holder name वगैरे काही शंकांचे निरसन होण्यास मदत होईल.

तसेच रैनाच्या ह्या प्रश्नांना अनुमोदन:-

रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का?
टोटल रकमेच्या विनीयोगाचा हिशेब देणगीदाराला मिळु शकेल का?

टोटल रकमेच्या विनीयोगाचा हिशेब देणगीदाराला मिळु शकेल का?
- नक्की मिळेल. पण एकुण सुपंथ कडे जमलेले पैसे व त्यातले किती कोणत्या संस्थेला कशाकरता दिले हे
सांगता येईल कारण कोण किती देणगी देणार हे कळु शकणार नाही.

रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का?
- त्या संस्थांना संपर्क करुन मग लिहिते. कारण जर सुपंथ ला पैसे आधी दिले आणि सुपंथ ने संस्थेला
दिले तर ती संस्था प्रत्येक व्यक्तिला पावती देणार का ते विचारावे लागेल. सुपंथ रजिस्टर नसल्याने
त्याकडुन पावती मिळणे अवघड आहे. (केदार,उपास- अजुन काही सांगु शकणार का ह्याबद्दल?)

देणगी कोणाला द्यायची यात काही चॉईस असणार आहे का? की संयुक्ता समिती ठरवेल?
- अंधशाळेला सर्वाधीक प्राधान्य आहे. त्यानंतर बाकी संस्था (ह्यावेळेस तरी). ३१ मार्च ला एकुण जमलेली
रक्कम पाहुन अंतीम निर्णय करु. तेव्हा संयुक्ता मधेच आपण पुन्हा चर्चा करु.

रैनाच्या चौथ्या प्रश्णाचे उत्तर - जर कोणालाही आपली देणगी एखाद्या विशिष्ट संस्थेला द्यायचे असेल तर जरूर करता येईल तसे, परंतु मग देणगीदार, तुम्ही किती रक्कम देताय ती माहिती मला ईमेल ने कळवाल, म्हणजे सोपे पडेल. जर नाही कळवले तर महिन्याअखेर ठरवु वर लिहिल्याप्रमाणे.

मंजु, बरोबर आहे सुपंथ ची माहिती मिळेल त्या दुव्यातुन. तो दुवा मी टाकते आवाहनात.

संयुक्तासाठी सुपंथ फक्त पैसे पोचविन्याची मदत करत आहे. त्यामुळे संयुक्ताच्या सदस्यांनी जितके पैसे जमविले तितके सुपंथ, संयुक्ता जी संस्था सुचवेल तिला देईल.

रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का >> ८० जी साठी मग वयक्तिक देणगी देणे जास्त उपयोगी पडेल. सुपंथ अजून रजिष्टर नाही, त्यामुळे ही सोय नाही.

टोटल रकमेच्या विनीयोगाचा हिशेब देणगीदाराला मिळु शकेल का? >> हो. तो दरमहिन्यात अकाउंट डिटेल्स मध्ये सुपंथ सादर करते. सुंपथ सुरु झाल्यापासून असे हिशोब आहेत त्यामुळे मागील रकमांबद्दलही हे सर्व पाहता येईल. मेमोत तुम्ही संयुक्ता लिहीणार आहात, त्यामुळे रक्कमेचा वेगळा हिशोब ठेवने शक्य होईल.

केदार, वरच्या अकाउंटमधे आत्ताच ऑनलाईन फंड ट्रान्स्फर केली आहे. प्लिज चेक करुन इथे किंवा विपुत कळवशील Happy

रकमेच्या स्वीकाराची पावती प्रत्येक देणगीदाराला मिळू शकेल का >> मी अंधशाळेत विचारले आहे. नाव पत्ता आणि रक्कम असं कळवलं तर त्या वेगवेगळी पावती देतील ८०जी साठी जीचा उपयोग होईल.

केदार, ICICI अकाउंटमधे आत्ताच ऑनलाईन फंड ट्रान्स्फर केली आहे. प्लिज चेक करुन इथे किंवा विपुत कळवणार का?

नमस्कार,

मी काल दुपारि परत आले, भारतात असताना घरि इंटरनेट उपलब्ध नसल्याने, मायबोलिच्या सम्पर्कात रहाण जमल नाहि त्याबद्दल क्षमस्व. माझ्या आणि मीनुच्या शब्दावर अंधशाळेला मदत करणार्‍या आणि करु इछ्छिणार्‍या सगळ्या मायबोलिकरांचे मनापासुन आभार. मीनु, सुनिधि आणि चिन्मय मुळे इतक्या शॉर्ट नोटिस वर अंधशाळेचि भेट शक्य झालि.

माझ्या पुण्याच्या वास्तव्यात दोन तीन आणखि संस्थांना भेट देता आलि. पैकि यशोदा अवचट च्या संवेदना संस्थेचि ओळख मायबोलिकरांना ती स्वतःच करुन देणार आहे, रेणु ताई गावस्करांच्या 'एकलव्य शिक्षण आणि आरोग्य न्यास' ह्या संस्थेला दिलेल्या भेटिचा वृत्तांत मी एक दोन दिवसात टाकते.

कॅश मध्ये भरलेस का? हो ते दिसत आहेत.

लालू, रुनी, झारा तुमचे चेक मिळाले व त्याचे पैसे आजच्या दराप्रमाणे भारतात पाठवले आहेत.

Pages