किती मी तुज

ऊर्जेचे अंतरंग-०८: मोजू कसा, किती मी तुज

Submitted by नरेंद्र गोळे on 3 May, 2011 - 06:50

एककास (युनिटला) चार रुपये दराने एन्रॉन वीजनिर्मिती करणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया वर चढल्या होत्या त्यावेळी. कारण तेव्हा वीज, मराविमं (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) दर एककास दीड रुपया दराने सामान्य ग्राहकांना देत होते. एन्रॉनचा प्रस्ताव त्यावेळी तरी भविष्यातलाच होता. सामान्यांना ह्या तफावतीचे राजकारण उमगले नाही. आज मुंबईला वीज पुरवठा अविरत करता यावा म्हणून दर एककास सात-आठ ते दहा-पंधरा रुपये दराने महागाईची वीज मिळवितांनाही नाकी नऊ येत आहेत. तेव्हाच जर तुलना शास्त्रीय पद्धतीने करून त्वरित ऊर्जोत्पादन सुरू केले असते तर आजचे दिवस ना दिसते.

Subscribe to RSS - किती मी तुज