पर्यावरण

पर्यावरण

चिऊताईगिरी

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:07

चिऊताईगिरी

मुन्नाभाईची बघून गांधीगिरी
चिऊताईला सुद्धा चढले स्फुरण
ठरवले तिने चिऊताईगिरीचे धोरण !

चिऊताई मोबाईल टॉवरवर चढली
तिने चीवचीवाट करीत नारे लावले
पण, शिकारी पक्ष्यांनी तिचे लचके तोडले !

उंच इमारतींच्या बंद काळ्या काचांवर
तिने इवल्याशा चोचीने केले प्रहार
पण, तिची चोच तुटून ती जायबंदी झाली !

तिने भरचौकात चिमण्यांचा थवा जमवला
कावळ्यांच्या विरोधात तिने आंदोलन केले
पण, गावगुंड कावळ्यांनी तिच्यावर हल्ले केले !

परत ये चिऊताई

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 00:49

परत ये चिऊताई

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
मोबाईलच्या लहरींना तू फसलीस का?

मोबाईलच्या लहरींनी दुखते का गं तुझे डोके?
आमच्याच तंत्रज्ञानाचे कळेना आम्हाला धोके!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
खाऊ तुझा तू हरवून बसलीस का?

खाऊसाठी गरज मुळी नव्हतीच तुझी मोठी
धान्याचे दाणे, अळ्या आणि उष्टी खरकटी!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
घरटे तुझे तू हरवून बसलीस का?

घरट्यासाठी गरज मुळी नव्हतीच तुझी मोठी
फोटोची फ्रेम, छोटासा कोनाडा वा भिंतीतल्या फटी!

चिऊताई चिऊताई रुसलीस का?
नजरेआड दूर दडून तू बसलीस का?

कावळा आणि अंधश्रद्धा

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 00:46

कावळा आणि अंधश्रद्धा

काळ्या काळ्या कावळ्याच्या, अकलेला तोडच न्हाय
काळा काळा दिसतो अन, करतोया काव

कावळ्याशी पंगा कधी, घेऊच न्हाय
हैराण करील चोच मारून, सोडणार न्हाय

गाणी गातो कावळीसाठी, खाऊन जातो भाव
उन्हाळ्यात बांधतो घरटे, खरकटं खाय

कोकिळा बनविते उल्लू, त्याला कळतच न्हाय
घरट्यात टाकून अंडी त्याच्या, भुर्र उडून जाय

कोकिळेच्या पिल्ल्याला, भरवत र्‍हाय
अकलेच्या गोष्टी मोठ्या, सांगतच र्‍हाय

मडक्यात टाकून खडे, पाणी पीतो काय
अजूनतरी कुणी तसं, पाह्यलंच न्हाय

लोकसंख्येवर ( लिहून) बोलू काही.

Submitted by परत चक्रम माणूस on 25 July, 2019 - 00:52

आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटींवर गेली आहे. सद्यस्थितीत आणखी बऱ्याच कोटींची भर पडली आहे. पुर्वीचं एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती येऊन दशकं लोटली. आता प्रत्येकाला स्वतंत्र घर हवं असतं. एका घरात स्वतंत्र खोल्या हव्या आहेत. स्वतंत्र गॅजेट्स, वाहनं असे स्व मालकीचं असावं यासाठी सगळा आटापिटा चाललेला दिसतोय.

शब्दखुणा: 

मधमाशीची झप्पी

Submitted by Dr Raju Kasambe on 21 July, 2019 - 08:00

मधमाशीची झप्पी

नाचे गुणगुणे ह्या मधमाशा
कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा !

मारून भरार्‍या चहूदिशेला
झप्पी देई ती फुलाफुलाला !

भरून घेई परागकणांची झोळी
वाटा उचलते बांधण्यात पोळी !

थेंबा थेंबाने करते संचय मधाचा
शिकावा तिजकडून मंत्र बचतीचा !

परागणाचे करते अचाट काम
नकळत देई ती करोडोचा दाम !

हसती फुले मधमाशीच्या झप्पीने
मळे, फळबागा डुलती आनंदाने !

मधमाशांचे प्रमाण का घटले
कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले !

खाली डोकं वर पाय

Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 11:08

कोल्हा नाही लांडगा नाही
आपला सच्चा मित्र हाय
पक्षी नाही, वटवाघूळ हाय
खाली डोकं वर पाय !!

मायाळू बुजरे निशाचर
गुहेत झाडावर वा फटी-चर
आम्हा सम सस्तन प्राणी हाय
खाली डोकं वर पाय !!

शाकाहारी वटवाघळे
खाती केवळ फळे
मांसाहारी किडे खाय
खाली डोकं वर पाय !!

इको लोकेशनचे तंत्र
अंधारात बघण्याचा मंत्र
रडार सुद्धा फेल हाय
खाली डोकं वर पाय !!

विष्ठेत नत्र आणि स्फुरद
नैसर्गिक कृषी खत
कृत्रिम खते फेल जाय
खाली डोकं वर पाय !!

कमलपक्षिणीचा कॅटवॉक

Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 11:04

पाऊस

Submitted by Kajal mayekar on 13 June, 2019 - 14:03

पाऊस.. पाऊस.. पाऊस शब्दच किती गोड आहे ना.. ऐकायला सुद्धा आणि बोलायला सुद्धा... पाऊस म्हटल की आठवतो तो वार्‍यासह जोरात कोसळणारा मुसळधार पाऊस.. तर कधी कधी अगदीच रिपरिप.. पण तो जेव्हाही येतो इतकी refreshment देऊन जातो की बस अस वाटत की आयुष्यातली ही भावना, हा क्षण इथेच थांबावा.. काळाने पुढे सरकूच नये कधी.. असा हा पाऊस...

त्याचा थंड स्पर्श.. चेहर्‍यावर, गालांवर, ओठांवर, हातावर ओघळणारे पावसाचे ते थंड पारदर्शक मोहक थेंब... Actually ते पावसाचे थेंब थंड नसतातच कधी... वातावरणाला गारवा ते थेंब थंड करतो...

झाडं लावणे

Submitted by vichar on 11 June, 2019 - 14:19

प्रश्न:
कृपया मार्गदर्शन करावे की कोणती झाडे / वृक्ष आहेत जी भरभर वाढतात आणि ज्यांना फार देखभालीची
नंतर गरज पडत नाही?

सर्वसाधारणपणे सहज उपलब्ध होणाऱ्या आणि भरपूर प्रमाणात प्रसार करता येऊ शकणाऱ्या बिया जर suggest केले तर अति उत्तम.

पावसाळ्यात थोडीफार तरी जमीन सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प आहे.

तुम्हीही स्वतः प्रयत्न करून शुभ कार्यात सामील व्हा.

हे कुणा दुसऱ्यासाठी नव्हे आणि social media वर सेल्फी साठी तर अजिबात नव्हे.

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण