आज माझ्या भारतातील कुटुंबीयानी या उपक्रमाबद्दल आणि त्यांच्या वैयक्तीक सुरक्षीततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उपक्रम चांगलाच आहे याबद्दल त्यांची खात्री आहे. परंतू याचा गैरवापर करून कुणी काही लिहिले, किंवा गैरवापर न करता सत्य तेच लिहिले तरी त्याचे पडसाद त्यांच्यावर उमटतील अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात प्रसिद्धीमाध्यमांवर होणारे हल्ले पाहता त्यांची भिती अगदीच अनाठायी नाही.
विनंती : ग्रुप मधील सर्व सभासदांनी त्यांच्या माहितीचा स्त्रोत इतरांच्या लक्षात आणुन दिला तर उत्तम.
प्रतिमंत्रिमंडळ उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी माझा माहितीचा स्त्रोतः
१) सरकारी / शासकीय संस्थांची संकेतस्थळे. उदा. http://maharashtra.gov.in/ http://ahmednagar.nic.in/ http://mahanews.gov.in/
२) नेहमीच्याच वाचनामध्ये (वृत्तपत्रे / नियतकालिके) थोडासे लक्ष सरकारी निर्णय अन त्यावर समाजात उमटणार्या प्रतिक्रिया यावर.. (विषयतज्ञ वा अभ्यासगटांकडुन प्रसिद्ध झालेले लेख)
३) सरकारी अधिकारी असलेले मित्र. (त्यांची नावे उघड न करता माहितीचा उपयोग करावा)
दि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.
काही मुद्दे:-
भारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही? हा एक प्रश्नच आहे.
जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.
(खालील लेख मुंबईकर मायबोलीकर `कुलदीप १३१२ ' यांनी लिहिलेला आहे.)
नमस्कार.
या वर्षी टीशर्ट विक्रीमधून जमा झालेली देणगीची (चॅरिटीची) रक्कम (रु.१३,५०१) ठाणे जिल्ह्यातील मनोहर मानवता सामाजिक न्यास - कळवे ठाणे ['डॉ. हेडगेवार जनजागृती प्रतिष्ठान, खर्डी, ता. शहापूर] ह्या संस्थेला दिनांक २५ ऑक्टोबर २००९ रोजी भोसपाडा, खर्डी (शहापूर) येथे भाऊबीज कार्यक्रमात देण्यात आली.
दिवाळीतली पहिली पहाट उजाडली.
पणत्यांच्या रांगा, दारापुढील रांगोळी, आकाशदिवा.. घर मोठे देखणे दिसत आहे.
स्नानगंधा-उटणे-चिरांटे आदी सोपस्कारांनी अभ्यंगस्नान झालेले आहे.
बच्चेमंडळी फटाके फोडण्यात दंग झाली आहेत.
ताज्या फराळाचा नैवेद्यही नुकताच दाखवून झाला.
आता फक्त आस्वाद घ्यायचा आहे.. लाडू,चकल्या,शंकरपाळ्यांचा, गरमागरम चहाचा आणि..
अर्थातच नुकत्याच प्रकाशित झालेल्या मायबोली दिवाळी अंकाचा!!!!