ग्रूपचे अस्तित्व आणि भविष्य

Submitted by webmaster on 22 November, 2009 - 00:27

आज माझ्या भारतातील कुटुंबीयानी या उपक्रमाबद्दल आणि त्यांच्या वैयक्तीक सुरक्षीततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उपक्रम चांगलाच आहे याबद्दल त्यांची खात्री आहे. परंतू याचा गैरवापर करून कुणी काही लिहिले, किंवा गैरवापर न करता सत्य तेच लिहिले तरी त्याचे पडसाद त्यांच्यावर उमटतील अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात प्रसिद्धीमाध्यमांवर होणारे हल्ले पाहता त्यांची भिती अगदीच अनाठायी नाही.

एक चांगला उपक्रम बंद होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण त्याचबरोबर माझ्या कुटुंबियांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करू शकणार नाही. आणि ही शक्यता फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही. ज्या व्यासपीठातून विरोधी विचार प्रकट होतात ती व्यासपीठेच कशी बंद पडतील हे पाहणे हे दबावशाहीचे तंत्र प्रत्येक देशात वापरले गेले आहे. त्यामुळे उद्या दुसर्‍या कुठे हे नेले तरी तिथे ते बंद पाडण्याचे प्रयत्न होणार नाही असे नाही (बहुतेक नक्कीच होतील)

हा उपक्रम चालू रहावा पण कुणा एका व्यासपीठावर्/माध्यमावर्/व्यक्तीवर अवलंबून न रहाता खरोखर "Distributed" होण्यासाठी काही करता येईल का? लेखन करणार्‍या व्यक्तींनी लेखनाची वैयक्तिक जबाबदारी घेण्यासाठी काही करता येईल का (ज्या योगे त्यांचे लेखन ही बेजबाबदार होणार नाही)? काही तांत्रिक सुविधा आहेत त्याचा यासाठी उपयोग करता येईल का? एखादी व्यक्ती काहीही कारणामुळे लिहायची थांबली/तिला भाग पाडले गेले तरी बाकीचा ग्रूप चालू राहू शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही आम्हाला "कुटुंबीय" म्हटले यातच सर्व आले!! धन्यवाद.

एक चांगला उपक्रम सुरू होण्याआधीच त्याला नाट लावायला कित्येक जण उत्सुक आहेत. हा उपक्रम मायबोलीचा "उपक्रम" न ठरता पूर्ण समाजाचा उपक्रम ठरावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. सरकारी कामकाजाशी आपला काहीएक संबंध नाही. असे मानणारी जी पिढी आहे त्यातलीच मी एक!!

तरीही सध्याचे वातावरण आणि दबावशाही बघता यामधे काही सावधगिरीच्या उपाययोजना बाळगणे गरजेचेच आहे. या ग्रूपला सदस्यत्व देताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. संयुक्ताचे सदस्यत्च जसे मिळते तसेच काहीतरी या बाबतीत करणे शक्य आहे. ग्रूपचे मॉडरेटर इच्छुक सदस्याशी फोनवर बोलून अथवा प्रत्यक्ष भेटूनच सदस्यत्व देतील अशी व्यवस्था करणे शक्य आहे का?? यामुळे डु आयडी हा प्रश्न निकालात लागेल...

तसेच या ग्रूपमधील सर्वच चर्चा व लिखाण प्रसिद्ध न करता एखाद दुसरे लेख (ग्रूप व इतर नियामक मंडळाच्या सदस्यामार्फत) प्रसिद्ध करता येइल. हे लिखाण लेखकाच्या नावाने आथवा आयडीने प्रसिद्ध न करता ग्रूपच्या नावाने प्रसिद्ध करता येइल.

मुळात या ग्रूपमधे राजकीय घडामोडी व व्यक्तिगत टीका रोखणे गरजेचे आहे. प्रत्येक पोस्टचे मॉडरेशन व एडिटिंग करण्यासाठी एखादी टीम देखील उभारावी लागेल..

तसेच, प्रत्येक मंत्रीमंडळाच्या नावाने एखादा ब्लॉग चालू केल्यास (हे काम अर्थात सदस्याला स्वतः करावे लागेल आणि सांभाळावे लागेल) तिथेदेखील ठराविक लिखाण प्रसिद्ध करता येत राहिल. मायबोलीवरच्या पत्रकार मंडळीच्या मदतीने यामधील वेचक आणि वेधक लेख अथवा चर्चा प्रिंट आणि एलेक्टृओनिकच्या माध्यमात नेता येइल

अजून एक सूचना:- मायबोलीच्या संदर्भामधे कुठलीही बातमी अथवा लेख प्रसिद्ध करण्याआधी स.बंधित मायबोलीकरानी याची सूचना अ‍ॅडमिन अथवा वेबमास्टर याच्याकडे कृपया द्यावी. उपक्रम सुरू होण्याआधी प्रसिद्धी हवी की उपक्रम एका ठराविक स्टेजला पोचल्यावर प्रसिद्धे करायची हा निर्णय त्यानीच घ्यावा ही विनंती!!! कृपया गैरसमज नसावेत.

शेवटी हे एक कुटुंब आहे हे लक्षात घेऊनच आपण काम करूया!!!

कुटुंबीयानी व्यक्त केलेली चिंता रास्तच आहे. नंदिनी यांनी खूप चांगले मुद्दे मांडलेत. त्यांना अनुमोदन!
अजून एक म्हणजे सकाळमधल्या बातमीत 'आंतराष्ट्रीयदबावगट' असे म्हटले गेले आहे ते खटकले. दबावगट या शब्दाला एक निगेटिव्हीटी ची छटा येते. शासनाने मांडलेल्या प्रस्तावावर, घेतलेल्या निर्णयावर सारासार चर्चा व्हावी, अभ्यास व्हावा. त्या त्या क्षेत्रातील experts चे मतही जाणून घेतले जावे. आणि मग त्यावर संपादित केलेले अभ्यासपूर्ण लिखाण हे संबंधीत खात्याला पाठवावे. तसेच घेतलेल्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी होते की नाही तेही माहितीच्या आधिकारामुळे शक्य होणार आहे. कुठल्याही प्रकारची वयक्तीक टीका तसेच कुठल्याही राजकिय पक्षाला पाठिंबा कटाक्षाने टाळणे आवश्यक. अतिशय नि:पक्षपातीपणे शासनाच्या कार्याचा मागोवा घेणे, अभ्यास करणे आणि आपली मते शासनाला कळवणे, असे काहिसे या ग्रुपचे कार्य असावे. शासन आणि ग्रुप यांच्यात सकारात्मक संवाद असावा. ग्रुपच्या सभासदांना ते एखाद्या राजकिय पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? किंवा एखाद्या राजकिय पक्षाकडे त्यांचा अधिक कल आहे का वगैरे विचारून घ्यावे. मला वाटते सभासदांसाठी एक प्रश्नावली करावी.
सध्या इतकेच.

बाप रे..
नन्दिनी, स्वाती यांनी चांगले मुद्दे मांडलेत.
>>शासनाच्या कार्याचा मागोवा घेणे, अभ्यास करणे आणि आपली मते शासनाला कळवणे,
असेच काहीसे मला वाटत होते. काही सूचना देणे, पर्याय सुचवणे इतपत. या कोण सुचवते आहे यावर काही बंधन असायचे कारण नाही पण एकंदर आवाका पाहता अशी शंका आली की जे भारताचे नागरीक नाहीत त्यांनी याबद्दल लिहिणे योग्य होईल का?

नंदिनी आणि स्वाती अनुमोदन.
वेबमास्टर>>>एक चांगला उपक्रम बंद होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण त्याचबरोबर माझ्या कुटुंबियांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करू शकणार नाही. आणि ही शक्यता फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही. ज्या व्यासपीठातून विरोधी विचार प्रकट होतात ती व्यासपीठेच कशी बंद पडतील हे पाहणे हे दबावशाहीचे तंत्र प्रत्येक देशात वापरले गेले आहे.<<< अगदी खरे. मलाही वाटते या गृपचे सदस्यत्व थोडे काळजीपूर्वक दिले जावे. नंदिनीचा याबाबतचा विचार छान वाटतोय.

गेल्या दोन दिवसातील घडामोडी वर विचार करता, सदर उपक्रम मायबोली च्या बाहेर नेणे (जरी मनाला पटत नसले तरी) योग्य राहील. हा उपक्रम नवा असल्याने अन तो राजकारणापासुन १०० टक्के अलिप्त राहु शकत नसल्याने (मंत्रिमंडळ ही राजकीय संस्थाच आहे) त्यालाऑर्कुट वर कम्युनिटी च्या रुपाने स्थापन करण्याचा प्रयत्न आपण करु शकतो का? जे लोक मायबोली चे सदस्य आहेत, मायबोली च्या ऑर्कुट कम्युनिटीचे सदस्य आहेत, ते लोक ह्या नव्या कम्युनिटी चे सदस्य होउ शकतील. तिथे मॉडरेटर अन ओनर मी असु शकेल. अन प्रकाशित लेखाची जबाबदारी पुर्ण पणे उचलु शकेल. तिथे ही पोस्ट मॉडरेट करणारी एक टीम बनवु शकतो.

मंडळी, आपले म्हणणे मांडा! Happy

मला इंटरनेट वर ब्लॉग, वगैरे चा फारसा अनुभव नाही. मी जे काही लिहितो ते फक्त मायबोलीवरच. ऑरकुट वर दोन चार ओळी लिहिलेले आहे. अन गेल्या २-३ महिन्यात फेसबुक वर आलेलो आहे. त्यामुळे ब्लॉग वर जाण्यापेक्षा ऑर्कूट वर मला सोपे पडेल. तज्ञांनी मार्गदर्शन करावे!

ऑर्कुट नको. Happy

मला तरी उपक्रमाची पूर्ण कल्पनाच आलेली नव्हती. आजचे चंपकचे पोस्ट वाचल्यावर आणि तिथली बाकी काही पोस्ट्स वाचून असे वाटले की याची प्रसिद्धी इतक्यातच झाली नसती तरी चालले असते. त्या प्रसिद्धीमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या काळजीमुळे काही प्रश्न निर्माण झाले असतील पण काही निवडक लोकांना इथे सदस्यत्व देऊन इथे लेखन चालू करायला काय हरकत आहे? लिहिणार्‍यालाही सराव हवा. Happy इतक्यातच ते कुठे पाठवायची वगैरे गरज नाही. चंपक, उदाहरण म्हणून तूच सुरुवात करु शकतोस.

हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे. याची सुरुवात मायबोलीवर झाली तर छानच. चंपक, तू इथेही तशी जबाबदारी घेऊ शकतोस, तू म्हणतो आहेस तेच सगळे इथेही करता येईल. मायबोलीचा फक्त आपण एक ग्रूप तयार करण्यापुरात आणि इथे लेखन करण्यापुरता उपयोग करत आहोत. याबद्दल मायबोली प्रशासन कसे अडचणीत येऊ शकते याबद्दल मला कल्पना नाही. आणि टीका, वैयक्तिक हल्ले इत्यादी गोष्टी टाळून इथले लेखन होणार असेल तर तिथल्या दडपशाही करणार्‍या लोकांकडूनही काही भीती असायचे कारण नाही. असे आपले माझे मत.

नंदिनी , स्वाती आणि शर्मिलाने खुप चांगले मुद्दे मांडलेत. हा उपक्रम खरोखर खुप चांगला आहे आणि प्रत्येक चांगल्या / वेगळ्या कामाला विरोध होतो आपण फक्त मनाची तयारी ठेवावी.

मायबोलीवर (राजकीय घडामोडी ) राजकारणावर्/राजकारण्यांवर टोकाच्या टीका झालेल्या आहेत आणि होतही आहेत , त्यामुळे ह्या उपक्रमाविषयी एवढी भिती का निर्माण झालीयं तेच कळत नाही . एव्हाना लोक ई-सकाळमध्ये आलेली ती बातमी विसरलेही असतील .

मायबोलीची इतकी सवय झालीयं ना त्या ऑर्कुट / फेसबुक वर जाण्यासाठी सुद्धा कंटाळा येतो.

टीका हा शब्दही सापेक्ष आहे , जरी सौम्य शब्दांत चुक दाखवुन दिली तरी टीकाचं समजली जाते. पण तरीही आपण आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवला तर सगळं सुरळीत होऊ शकतं.

!! जब मंजील पर पहुँच कर देखोगे अपने पीछे एक कारवा पाओगे,
जो खुशी तब मिलेगी उसका कोई मोल न कर पाओगे !!

मला देखील मायबोली सोडुन इतर कुठे हा उपक्रम हलवण्याचा मार्ग फारसा आवडलेला नाही. पण प्रशासकांच्या शंका रास्त आहेत. किमान मी भारतात असतो तर त्यांच्या काही शंकांची जबाबदारी मी स्वतः घेउ शकलो असतो.

मायबोलीवर (राजकीय घडामोडी ) राजकारणावर्/राजकारण्यांवर टोकाच्या टीका झालेल्या आहेत आणि होतही आहेत ,>>>>>
मला काल रात्री हे च आठ्वले, कि पुर्वीही अशी अनेकदा अगदी टोकाची मते असलेली पोस्ट मायबोलीवर आली होती अन ती मग काढुन टाकली गेली. या बाबतीतही तसे करता येईल का?

इतक्यातच ते कुठे पाठवायची वगैरे गरज नाही.>>>>> अगदी. हे पुढील पाउल म्हणुनच उल्लेख केला होता.

जे भारताचे नागरीक नाहीत त्यांनी याबद्दल लिहिणे योग्य होईल का?>>>>>
नक्कीच योग्य आगे! आपण हे जे करतो ते मानवतेच्या भावनेतुन करतो आहोत. जगातील एका देशात जर मानवी हक्कांची गळचेपी झाली तर दुसर्‍या एखाद्या देशातील मनवी हक्क संरक्षणा चे कार्यकर्ते निदर्शने करतात ती केवळ मानवतेच्या भावनेनेच! शेवटी, भारत स्वतंत्र होण्यासाठी अहिंसक अन हिंसक अश्या दोन्ही आंदोलनांना भरपुर परदेशी नागरिकांचे पाठबळ लाभले होते हा इतिहास आहे!! उदा. भारतीय कोंग्रेस ची स्थापना अन आझाद हिंद सेनेची स्थापना. फरक एकच कि, आज स्वराज्याकडुन सुराज्याकडे जाण्याचा हा लढा आहे.

******* ऑरकुट वर मुक्तपीठ नावाची एक कम्युनिटी आहे. तिथे खालील नियम दिलेले आहेत..........

१. चर्चा याचा अर्थ वाद-विवाद नाही. त्यामुळे कोणतीही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी. दुसऱ्याच्या मतांचा पूर्ण आदर राखला जावा.
२. पक्षीय जाहिरातबाजी कृपया करू नये.
३. कोणत्याही जाती अथवा धर्माबद्दल अवमानकारक, अधिक-उण्या काॅमेंट किंवा टाॅपिक असू नयेत.
४. अश्लीलता, द्वैअर्थी बोलणे निषिद्ध आहे.
५. कोणावरही वैयक्तिक हल्ले नकोत.

राजकीय चर्चा करायला कोणाचीही हरकत नसावी. पण होतं काय, की नेमका मुद्दाच कोणी मांडत नाही. एखाद्यानं मांडला, की सुरू होतात उखाळ्यापाखाळ्या. आणि राजकीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह लिखाण सुरू होतं. त्यानंतर सुरू होतात नळावरची भांडणं... मग निघतात जाती... असं करता करता इथं रणभूमी होते...
तुमच्याकडे खरोखरच चांगला मुद्दा असेल, तर कृपया मला किंवा माॅडरेटर्सना आधी स्र्कॅप करावा. तो पाहून आम्ही निर्णय घेऊ

अश्या प्रकारचे नियम सुरुवातीला डिस्क्लेमर म्हणुन लावले तर चालेल का?

राजकीय हुल्लडबाजी ची अन गुंडगर्दीची भिती वाटणे ही मायबोली प्रशासकांची शंका रास्त आहे. अन म्हाणुन ह्या पुर्ण उपक्रमाची जबाबदारी ही मायबोलीची नसुन मायबोलीवर वावरणार्या चंपक ह्या व्यक्तीची/आयडी ची आहे असे आपण जाहीर करु शकु का? मी मे-जुन २०११ ला भारतात परत जात आहे. माझी ओळख, पत्ते, (भारतातील अन परदेशातील) जाहीर करायला हरकत नाही. कारण अश्या उपक्रमाचे भवितव्य केवळ नेट वरील काही टाईमपास करणारे/ उखाळ्या पाखाळ्या काढणार्‍या लोकांमुळे अडकु नये अशी माझी अपेक्षा आहे.

(क्रमशः)

त्यामुळे ह्या उपक्रमाविषयी एवढी भिती का निर्माण झालीयं तेच कळत नाही . एव्हाना लोक ई-सकाळमध्ये आलेली ती बातमी विसरलेही असतील .>>>>>
लोक चांगले उपक्रम निश्चितच लवकर विसरुन जातात. अन आपण आक्षेपार्हच लिहिणार आहोत हे आपण का गृहीत धरुण चाललोय? हे गृहितकच चुकीचे आहे असे मला वाटते. अन म्हणुन त्यातुन निर्माण होणारी भितीही !! आपण काहीही अक्षेपार्ह लिहिणार नाही अन कुणा एका व्यक्ती/पक्षा ला टारगेट ही करणार नाही. जर कुणी ग्रुप सदस्य वा माबो सदस्याने असा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करणे प्रशासनाला शक्य आहे.

जर या उपरही कुणी जाणुन बुजुण या उपक्रमाचा गैरवापर करयचा प्रयत्न केला, इतर मेडिया मध्ये ह्याबद्दल काही चुकीच्या बातम्या दिल्या, अन काही आणिबाणी ची परिस्थिती आली (याचा बैल गेला अन झोपा केला असा अर्थ ही निघु शकतो! अन तोच खरा भितीचा /वादाचा मुद्दा आहे.) तर हा उपक्रम मायबोली वरुन दुसरीकडे हलवण्याचा विचार करु. तोवर तरी या उपक्रमाला मर्यादित स्वरुपात म्हंजे निवडक सदस्यांसह चालवण्यास हरकत नसावी.

रुनी पॉटर यांनी दिलेली उपयुक्त माहीती
चंपक,
प्रतिमंत्रीमंडळ या प्रकल्पासाठी सदस्य निवडतांना त्यांच्याबद्दल खात्री करून मग घ्यायची असेल (डु आयडी नको. इ.) तर संयुक्ता जसे करते तसे करता येईल. संयुक्तातला प्रत्येक सदस्य हा मायबोलीकरांच्या कोणाच्यातरी प्रत्यक्ष ओळखीतला किंवा निदान फोनवर बोललेला तरी असतो. आणि ज्या व्यक्तीला कोणीच ओळखत नाही त्याला (यादीतल्या) कुठल्यातरी मायबोलीकराला मेल करून संपूर्ण नाव व नंबर कळवावा लागतो, मग त्याच्याशी फोन वर बोलुन खात्री करून मगच सदस्यत्व दिले जाते. (इथे नीट लिहीलय त्याबद्दल http://www.maayboli.com/node/10008)


......अन उपस्थित केलेले काही प्रश्न. यावर ही चर्चा करु.

तिथे तू लिहीलेले नाहीये म्हणून विचारते, या मंत्रीमंडळात ज्या सगळ्यांना एखाद्या क्षेत्राची आवड आहे त्या सगळ्यांचा समावेश केला जाणार का की ही संख्या मर्यादित ठेवणार. समजा १५-२० लोकांनी ग्रामविकास खात्यात काम करायची तयारी दाखवली तर त्या सगळ्यांना सहभागी करून घेणार का?

रुनीचा मुद्दा पटला मला ,

१) माझी नाव , मेल , फोन नंबर देण्याची तयारी आहे.
२) जेवढे ऑथेंटीक सभासद घेता येतील तेवढे चांगले , प्रत्येकाचा एखाद्या प्रॉब्लेम कडे बघण्याचा , तो सोडवण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असु शकतो आणि आपण सगळे मिळुन त्यातुन सुवर्णमध्य काढु शकतो . जर एखाद्या विभागात जास्त सदस्य झाले आणि दुसर्‍या विभागात कमी सदस्य असतील तर ,ज्यांना इच्छा असेल ते दुसर्‍या विभागात जाउ शकतात. अर्थात संख्येवरही काही मर्यादा बाळगणं ठीक राहील नाही तर सगळा सावळा गोंधळ होऊन बसेल .

नाव, ओळख देण्याबद्दलचा हट्ट मला समजत नाही आहे. जरी ही माहिती घेतली तरी त्याची सत्यासत्यता कशी पडताळून पाहणार? ओळख न देण्याची लोकांची बरीच कारणे असू शकतात. घ्यायचीच असेल तरी ही माहिती फक्त ग्रूप व्यवस्थापक, अ‍ॅडमिन, वेबमास्टर यांना कळवली तरी पुरेसे असावे. बाकी लोकांना माहीत असण्याची गरज नाही. ओळख न देणारे बेजबाबदार लेखन करतात असं काही नाही. आणि ओळख देणार्‍यांकडून तसे होणार नाही अशीही खात्री नाही. तेव्हा मॉडरेटर असणे गरजेचे वाटते. लेखन प्रकाशित करण्यापूर्वी काही जबाबदार लोकांनी तपासून पहावे.

मी पहिल्यांदा माझ्या कुटुंबियांच्या भूमिकेतून बोलतोय. गेल्या काही वर्षात झालेल्या घटना लक्षात घेतल्या तर त्यांची मनोभूमिका समजायला सोपे जाईल.

१. कुमार केतकर, निखिल वागळे यांच्यावर झालेले हल्ले. त्यांच्या प्रकाशनात प्रत्यक्ष लेख कुणाचाही असला तरी हल्ले मुख्य संपादक्/मालक ज्याना समजले गेले त्यांच्यावर झाले.

२. ऑर्कूटवर कुठल्यातरी ग्रूपमधे लिहिलेल्या संदेशांवरून, प्रत्यक्ष संदेश लिहीणार्‍याला शोधण्यापेक्षा गुगलच्या कार्यालयावर झालेली जाळपोळ

३. आनंद यादव यांना धमक्या देऊन त्यांच्यावर दबाव आणून त्याना पुस्तक मागे घ्यायला लावले.

४. एखाद्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या मजकूराबद्दल थेट डायरेक्टर्सना अटक करायची तरतूद असलेला कुठलातरी नविन कायदा (हे कितपत खरे आहे हे माहिती नाही कदाचित ही अज्ञानामुळे असणारी भिती असावी)

६. चांगल्या सामाजिक कार्यात गुंतलेल्या व्यक्तीना राजकीय/जातीय वादात अडकवून बदनामी करण्याचा प्रयत्न. (उदा. बाबासाहेब पुरंदरे)

५. गेले काही दिवस २४ तास, सतत वेगवेगळ्या माध्यमातून IBN-LOkmat यांच्या ऑफीसवर केलेल्या हल्ल्याची माहिती

आता वेबमास्तर म्हणून मला स्वतःला आलेले काही अनुभव

६. मायबोलीवर कुठेतरी मधून मधून काड्या लावून गंमत पाहणारे काही मायबोलीकर (त्यात काही जुने आणि जाणतेही आहेत).
अ. मुद्दाम वादग्रस्त विषय/ भडक विधाने करणारे. ब. दोन व्यक्ति मधल्या जुन्या वादाचा उपयोग करून घेणारे. क. झुंडीने काही मायबोलीकराना लक्ष करणारे, ड. इतराना धमक्या देणारे.

७. वाद कुठे थांबवावा ते न कळल्याने, वाटेल त्या टोकाला नेणारे. ग्रूपमधले वादविवाद स्वत:च्या मोठेपणासाठी अर्धवटच बाहेर प्रसिद्ध करणारे

८. स्वतःच्या कामासाठी मायबोलीचा दुरुपयोग करू पाहणारे आणि अ‍ॅडमीन टीम/मॉडरेटर यांनी तो करू दिला नाही म्हणून त्यांच्यावर राग असणारे.

९. मायबोलीवर खरोखर प्रेम असणारे पण आपल्या वागण्याने/बोलण्याने मायबोलीवर किंवा इतरांवर होणार्‍या दुष्परिणामांची जाणिव नसणारे

असे फक्त १-२% च मायबोलीकर असतील. ९९% मायबोलीकर हे चांगल्या हेतूने इथे येतात आणि राहतात नाहीतर आतापर्यंत आपले कुठलेच उपक्रम यशस्वी झाले नसते. किंवा आज मायबोली अस्तित्वात आहे ती त्या ९९ % मुळे.

पण असं पहा दिवाळी अंकासारखा उपक्रम असो वा गणेशोत्सव, थोडंफार वाजलं तर काही बिघडत नाही. पण या उपक्रमात थोड्या चुका/थोडे वाद खूपच महागाचे ठरण्याची शक्यता आहे. अशा सारखे उपक्रम राबवण्यासाठी असलेली परीपक्वता यात सामील होण्यासाठी इच्छूक असलेल्या किती जणांमधे आहे? आणि त्यात मी जर डूप्लिकेट आयडी घेऊन लिहित असेन तर मला कुठल्याही परिणामाची भिती बाळगायचंही कारण नाही.

आणि कितीही काळजी घेतली तरी केंव्हातरी शासकीय/राजकीय यंत्रणेतल्या काही व्यक्तिना आवडणार नाही असे प्रश्न इथे विचारले जातील. किंवा तसे ते कधीच विचारले गेले नाही तर हा उपक्रम मुळात हवा तसा परिणामकारक ठरणार नाही. त्या न आवडण्याचा परिणाम म्हणून १-५ पैकी काही होऊ शकते आणि ते लक्षात ठेवून/त्या साठी मनाची तयारी ठेवूनच पुढे जावे लागेल. चंपकची या बाबतीत तयारी आहे पण यात भाग घेण्यासाठी उत्सुक असणार्‍या किती व्यक्तींची ही तयारी आहे?

एकीकडे चंपकची कल्पना ही एक खूप चांगली कल्पना आहे आणि खरं तर आपल्या समाजाला अशा गोष्टीची खूप गरज आहे हे पटतंय तर दुसरीकडे एखाद्या छोट्या गोष्टीचा/चुकीचा केवढा मोठा पर्वत/अनर्थ होऊ शकतो हे पण दिसते आहे.
हे मी मोकळेपणाने चंपकशी बोललो आहे. कदाचित वरच्या काही विधानांचा त्यामुळे उलगडा होऊ शकेल.

वेबमास्तर ,
तुम्ही मांडलेले सगळे मुद्दे योग्य आहेत. आपल्यावर वॉच ठेवला जातोय ही कल्पना कोणालाच सहन होत नाही , अगदी ओबामाचं उदाहरण घेतल तर, एका कार्यक्रमात तो काहीसं असं म्हणाला होता , "मी ७० दिवसात १०० दिवसांच काम करीन आणि ७१ व्या दिवसापासुन सुट्टीवर जाईन" , कारण त्याला मिडियाचा त्याच्यावर वॉच ठेवण्याचा शब्दप्रयोग फारसा आवडला नव्हता .
तसाच आपला उपक्रमही आपल्या राजकारणी / शासकीय यंत्रणेला आवडणे कठीण आहे ,पण संघठीत समंजस लोकशक्तीत खुप मोठी ताकत असते , आणि मला वाटतं ती मायबोलीकरांमध्ये आहे .
तुम्ही म्हणताय तशा १% लोकांना खड्यासारखं ह्या उपक्रमातुन बाजुला काढणं फारसं कठीण नसावं .

मी माझ्याविषयी सांगु शकतो की , मी इथे जे काही लिहीन ते सामाजीक जबाबदारीचं पुर्ण भान ठेवुन सामान्य मराठी माणसाच्या हिताचचं लिहीन. पुढे मागे काही गंभीर समस्या आलीच तर त्याला तोंड देण्याची माझ्या मनाची पुर्ण तयारी आहे.

१) उपक्रमाचे अस्तित्व अन भविष्य हे, सकाळ मधील बातमी अन त्या अनुषंगाने आलेले पोस्ट यांवर आधारित आहे, असे मला वाटते. कारण, त्यात दबावगट, अंकुश असे वादग्रस्त/ धमकीवजा/ वॉच असे सरकार विरोधी सुर असणारे शब्दप्रयोग झाले होते. प्रति हा शब्द देखील विरोधाचे चित्र डोळ्यासमोर आणतो अन या उपक्रमाची एक सरकार/ गट/ व्यक्ती विरोधी प्रतिमा तयार होते.
पण मुळात, ही संकल्पना कुणाला विरोध करण्यासाठी नाही तर पुरक कार्य/सहकार्य करण्यासाठी राबवली जाणार आहे, अन हेच तिचे मुळ गृहितक आहे. म्हणुन, संकल्पनेच्या नावातुन प्रति हा शब्द काढुण केवळ महाराष्ट्र मंत्रिमडळ अभ्यासगट असे नाव दिले तरी बराचसा प्रथमदर्शनी बदल तिच्या प्रतिमेवर होईल असे वाटते.

२) वेबमास्टर यांनी उपस्थित केलेली शंका रास्त आहे, हे मी पहिल्यापासुनच मान्य केले होते. कारण कुठेतरी हा विषय वादावादीचा केला जाउ शकतो. विशेष्तः त्यांनी दिलेल्या ६ ते ९ या प्रकारातील काही खोडसाळ किंवा अज्ञानी लोकांकडुन असे प्रकार केले जाउ शकतात. (मी स्वतःला ९ व्या प्रकारात सामाविष्ठ करील, कारण संगणकावरील फोरम वर माझा वावर व त्याचे ज्ञान हे अज्ञानाच्या जवळपासच आहे.)
पण/अन हे मान्य करुनही, जर हा उपक्रम मायबोलीवर राबवायचा असेल तर, मायबोलीवरील इतर अनेक उपक्रमांमध्ये जसे मॉडरेटर आहेत त्यापेक्ष एक पाउल पुढे टाकुन, प्रत्येक पोस्ट मॉडरेट करुन प्रसिद्ध करणे हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

३) सर्व सभासदांची खरी ओळख ही संयुक्ता ग्रुप च्या धरतीवर करुन घेणे अन ती फक्त प्रशासकांकडेच ठेवणे. सर्वांना सांगणे गरजेचे नाही.

४) ह्या गटातील लेखन सार्वजनिक करणे देखील गरजेचे नाही. चर्चेदरम्यान्/अंती काही महत्वाचे मुद्दे लिखाच्या रुपाने इतर मायबोलीकरांना उपलब्ध करुन दिले जाउ शकतील.

५) वेबमास्टरांच्या पोस्ट मधील १ ते ५ मुद्दे लक्षात घेता, मी पुर्ण जबाबदारी घेउनही हा प्रश्न पुर्णपणे सुटत नाही. वेबमास्टर अन त्यांच्या कुटुंबियांची, अन मायबोली परिवाराची कुठलीही हानी होणार नाही, अश्या प्रकारेच हा उपक्रम राबवावा. त्यांचा निर्णय मला एकदम मान्य राहिल. काही रागलोभ असणार नाही.

एका विषयात अनेक माबोकरांनी भाग घ्यायचा ठरवले तर.... एका सभासदाने लेखन धागा सुरु केल्यावर इतरांनी त्या धाग्यावर आपली मते मांडणे योग्य राहील. उदा. जर एक सभासद, अर्थ विषयावरील चर्चेमध्ये भाग घेत असला अन त्याला महसुल खात्यावर ही काही मत मांडायचे असले, तर तो महसुल च्या अगोदर सुरु केलेल्या/ नसल्यास स्वतः सुरु करुन त्यावर मंत्रिमंडळ निर्णय अन त्यावर स्वतःचे मत लिहु शकतो.
इथे मंत्रिमंडळाचा निर्णय हा केंद्र मानला आहे. त्यावर सर्वात अगोदर कोण लिहिल हा मुद्दा महत्वाचा नाही. शक्यतो ज्या सदस्याकडे त्या विषयावर अभ्यास/माहिती आहे, त्याने तो लेखन धागा सुरु करावा. एकापेक्षा जास्त विषयावर आपली मते/माहिती मांडली, तर उत्त्मच, असे मला वाटते.

आपण फक्त साप्ताहिक बैठकितील निर्णयावर चर्चा करु.
मंत्री जे निर्णय इतर दिवशी/ खास प्रसंगी जाहीर करतात, ते कालांतराने मंत्रिमंडळ बैठकीत यावेच लागतात, कारण ते निर्णय जरी मंत्र्याचे वैयक्तीक असले, तरी मंत्रीमंडळाची सामुहिक जबाबदारी म्हणुन ते अश्या बैठकीमध्ये मंजुर करुण घ्यावे लागतातच.

(अनेकदा असे निर्णय वादग्रस्त ठरतात/ एखादा सामान्य नागरिक त्यावर न्यायालयात दाद मागतो. मन मग तो न्यायालयाने जर रद्द केला, तर त्याऐवजी पर्यायी निर्णय मंत्रिमंडळाला घेणे भाग पडते. देशाच्या राज्यघटनेतील अनेक दुरुस्त्या ह्या अश्याच खटल्यांमुळे झालेल्या आहेत. पण तो आपला विषय नाही.)

पेशवा ह्यांचे मतः
चंपक अनोनिमिटि असलि पाहिजे असे मला वाटते कारण कोण म्हणतय ह्यालाच जास्त मह्त्व दिले जाते आज काल. हा विचार खोडुन काधत काय म्हणतय ह्यावर फोकस आणला पाहिजे. असे माझे वैयक्तिक मत आहे. कोण म्हणतय हे कळल की काय पेक्शा कोण ला कसे डिस्क्रेडित करता येइल हे बघितले जाते आणि ते खुप सोपे आहे. इतके लोक आहेत ज्यांच्यात कुवत असते एखद्या विशयात गति असते ते खुप काहि देउ शकतात करु शकतात. अनोनिमिटि असेल तर अशा लोकांचा सहभाग वाढुन बरेच भरीव काम होउ शकते. जर रेपुटेशन बनवायचे असेल तर ते ग्रुपचे बनवावे व्यक्तिचे नाहि असे वाटते. त्यामुळे जेंव्हा कधी नियमावली बनवशिल तेंव्हा ह्याचा विचार जरूर कर...

हे प्र.म.म एकाद्या विशयातल्या शाश्त्रिय मासिका सारखे असावे ज्यात एखाद्या निर्णयावर पेपर किंवा लेख त्या निर्णयाच्या बाजुने व विरोधात स्पष्तिकरण देनारे असावे. असे वाटते. तुला नक्कि काय अभिप्रेत आहे हे मला माहित नाही. पण वैयक्तिक मला राजकारणापासुन दुर राहुन काहि करता आले तर करायला नक्की आवडेल. आणि माझ्या सारखे अनेक आहेत / असावेत असे वाटते.

माझे उत्तरः

मलाही ते अनलिमितेडच हवे आहे. पण प्रशासक काय म्हणतात यावर अवलंबुन आहे.
मायबोलीवरील अनुभवी लोकांचे प्रत्येक विषयातील ज्ञान या मार्गाने एकत्र करता येईल अन पुढे पाउल उचलले तर, सरकारला ह्यावर विचार करायला प्रवृत्त केले जाईल. पण तो फार पुढचा भाग आहे.
सध्या तरी, अश्या माहीतीचा उपयोग हा मायबोलीवरीलच सामाजिक उपक्रमांत/ प्रत्य्क्ष फिल्ड वर असलेल्या लोकांसाठी झाला तरी खुप झाले.
नको ते फाते फुटल्याने खरे तर हा उपक्रम रखडलाय.....!

प्रवरानगरला असतानाचा एक उप्क्रम आठवला....
तिथे प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळ असा एक उपक्रम आहे.
मा. खा. बाळासाहेब विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. अन अनेक महाविद्यालयातील तज्ञ शिक्षक, प्राध्यापक तसेच माजी सनदी अधिकारी त्यावर सदस्य आहेत. वेळोवेळी सरकारी धोरणांवर मा. बाळासाहेब जी भुमिका माडतात, त्यामागे या अभ्यास मंडळाने केलेला अभ्यास/चर्चा असतो. बाळासाहेब सुचवतील त्या विषयावर या अभ्यास मंडळाने काढलेले अधिक माहिती जमा करुन मग सर्वांनी चर्चेद्वारे एकत्र केलेले निष्कर्ष मा. बाळासाहेबांच्या नावाने प्रसारमाध्यमात दिले जातात.