मायबोली टी शर्ट २००९ -देणगी प्रदान समारंभ

Submitted by टीशर्ट_समिती on 4 November, 2009 - 22:37

(खालील लेख मुंबईकर मायबोलीकर `कुलदीप १३१२ ' यांनी लिहिलेला आहे.)

नमस्कार.
या वर्षी टीशर्ट विक्रीमधून जमा झालेली देणगीची (चॅरिटीची) रक्कम (रु.१३,५०१) ठाणे जिल्ह्यातील मनोहर मानवता सामाजिक न्यास - कळवे ठाणे ['डॉ. हेडगेवार जनजागृती प्रतिष्ठान, खर्डी, ता. शहापूर] ह्या संस्थेला दिनांक २५ ऑक्टोबर २००९ रोजी भोसपाडा, खर्डी (शहापूर) येथे भाऊबीज कार्यक्रमात देण्यात आली.

मनोहर मानवता सामाजिक न्यास ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून वनवासी व ग्रामीण समाजाच्या उन्नती साठी झटत आहे. न्यासाच्या सेवा प्रकल्पातील बालवाडी हा एक महत्वाचा टप्पा आहे. यासाठी हे प्रतिष्ठान वनवासी पाड्यांवर (विनामूल्य) बालवाड्या सुरू करण्याचे काम करते.

वनवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना दिपावली सणाचा आनंद लाभावा यासाठी दिपावली नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. ह्या कार्यक्रमात मायबोलीचे प्रतिनिधित्व घारुअण्णांनी [संदीप खांबेटे] केले. त्यांच्याबरोबर ह्या वेळी मायबोलीचे इंद्रधनुष्य, चेतना, किशोर मुंडे, अश्विनी के, कुलदीप १३१२ हे सदस्य ह्या कार्यक्रमात उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात बालवाडी शिक्षिकांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. अनिल कुंटे यांनी संस्थेचे कार्य व कार्यामागची भुमिका विशद केली. मायबोलीतर्फे श्री. संदीप खांबेटे यांनी मायबोलीची ह्या देणगीकार्यामागची भुमिका स्पष्ट केली. ह्यानंतर भाऊबीजभेट आदिवासी भगिनींना व मुलांना देण्यात आली. अतिशय योजनाबद्ध रित्या आखलेल्या ह्या कार्यक्रमाचा समारोप अत्यंत छान अश्या भोजनाने झाला.

**********
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)

IMG_2094.jpgIMG_2101.jpgIMG_2104.jpgIMG_2107.jpgIMG_2108.jpgIMG_2112.jpgIMG_2114.jpg

विषय: 

वा, अभिमान वाटला! Happy

हे इथे लिहिल्याबद्दल, शिवाय छायाचित्रासांसाठीही टी-शर्ट समिती आणि कुलदीपाचे आभार. Happy

मायबोलीची ह्या सारख्या सार्वजनिक शैक्षणिक कार्यक्रमास होणारी आर्थिक मदत ही स्वागतार्ह आहेच पण आर्थिक मदती बरोबरच आपण मिळून सारेजण अजून काही मदत करू शकतो (का) ह्याचा विचार केला पाहिजे. पुढच्या वेळेस आपण आर्थिक मदती बरोबरच इतर अंगांनीही मदत करू शकू अशी आशा बाळगूया.

मस्त! Happy
देणगी कुठे द्यायची याचे नेमके सुयोग्य ठिकाण शोधल्याबद्दल घारुअण्णा व इतर सहकार्‍यान्चे देखिल हार्दीक अभिनन्दन Happy

ए मित्रांनो,
मला कुणीही असं काही समाजोपयोगी काही करत असेल तर खूप बरं वाटतं. असंच छान काही करूया रे! शुभेच्छा Happy

Pages