मंत्रीमंडळ- शॅडो कॅबीनेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार पुढे काय करणार? असा प्रश्न पडलेल्या काही मायबोलीकरांसाठी एक कल्पना मांडाविशी वाटते... शॅडो कॅबिनेट अर्थात प्रती मंत्रीमंडळ! Happy
राज्य मंत्रीमंडळाच्या धरतीवर मायबोलीवर देखील ४३ लोकांची एक टीम असावी कि ज्यामध्ये एक सदस्य (अथवा दोन वा तीन चा एक गट) ने प्रत्येक मंत्र्याच्या कामावर थोडे लक्ष ठेवुन असावे. अन त्यावर इथे भाष्य करावे. उत्तेजन्/टीका/ सुचना ह्या माध्यमातुन या मायबोली गटाच्या नावे सरकारच्या संबंधीत खात्याशी पत्रव्यवहार केला जावा. मायबोली चा एक सामाजीक उपक्रम म्हणुन यास मायबोली प्रशासनाने मान्यता अन प्रसिद्धी द्यावी. मायबोली चे प्रमुख अर्थात अ‍ॅडमिन हे ह्या गटाचे (पदसिद्ध) अध्यक्ष असावेत.

इंग्लंड (व ऑस्ट्रेलिया) च्या राज्यकारभारात शॅडो कॅबिनेट ला मानाचे स्थान आहे. अन विरोधी पक्षात एखादा शॅडो-मंत्री ज्या खाताचा कारभार पाहतो, तेच खाते त्याला सत्ता बदल झाल्यास प्राधान्याने दिले जाते!
मायबोलीवर वावरणार्‍या अनेक चौकस अन राजकारण-प्रशासनाची आवड असणार्‍या लोकांनी ह्यावर जरुर विचार करावा ही विनंती. आपल्या सुचानांचे स्वागत!

मुंबई दिल्ली त आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार! Happy

प्रकार: 

चंपक कल्पना खरोखर चांगली आहे पण आपल्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना ह्याने काय फरक पडेल ?
इंग्लंड / ऑस्ट्रेलिया चे राजकारणी कदाचीत येवढे निर्ढावलेले नसावेत.
पण तु म्हणतो तसं करुन बघायला काही हरकत नाही . " गाजराची पुंगी वाजली तर वाजली ...."

मला कल्पना आवडली. Happy मी सहभाग घ्यायला तयार आहे.

काही मतं.

- पूर्ण खात्यांचा पाठपुरावा करायला माबोवर ४३ लोक नक्कीच मिळणार नाहीत असे वाटते. त्यामुळे जितके उपलब्ध असतील तितक्यांनी सुरुवात करावी.

मायबोली चे प्रमुख अर्थात अ‍ॅडमिन हे ह्या गटाचे (पदसिद्ध) अध्यक्ष असावेत. >> हा उपक्रम मायबोलीचा नसावा, तर मायबोलीकरांचा असावा. त्यामुळे अ‍ॅडमिन ह्यांना सहभाग घ्यायचा असेल तर ते ही व्यक्तीशः घेउ शकतात. पण पदसिद्ध अध्यक्ष कुणीही नसावा. प्रत्येक विषयावर त्या त्या विषयाला फॉलो करणारे लोक मतं लिहीतील अन वाचक मत मांडतील. मायबोली साईट व व्यक्तीचे विचार ह्यात फारकत असावी. (मायबोली ह्या साईटच्या धोरणांशी राजकिय घडामोडीवरील भाष्य ऑफकोर्स अ‍ॅडमिन देतील पण मला वाटते ते लिहीले.)

सरकारच्या संबंधीत खात्याशी पत्रव्यवहार केला जावा >> उद्देश चांगला असला तरी तो कितपत साध्य होईल हे माहीत नाही. इ मिडीयाचा प्रभाव पडेलच पण त्यासाठे हे निट काही वर्षे होत राहिले तर आपोआप प्रसिद्धी मिळेल. पत्रव्यवहार करायची गरज नाही. पण ही स्टेज यायला निदान ५-७ वर्षे लागतील.

कल्पनेवर आणखी विचार करेन. पण कल्पना मात्र आवडली.

सेना बिजेपीने मागच्या इलेक्शन नंतर शॅडो कॅबिनेट घोशित केले होते. येखादं बैठकी पुढे त्याचे काहि झाल्याचे ऐकिवात नाही

कल्पना मस्तच आहे..

माबो वर एवढे अभ्यासू लोक मिळायला पाहिजेत... काही खात्यांपासून सुरु करता येईल

रॉबिन, बापू, उमेश असे काही अधिकारी माबोवर आहेत ते नक्की मार्गदर्शन करू शकतील...
ही कल्पना राबवता येणे शक्य आहे का?
असेल तर कशी राबवायला पाहिजे?.. इत्यादी इत्यादी

कल्पना चान्गली आहे. मला वाटते स्वछता, सुरक्षा आणि आरोग्य या बद्दल काही करता आले तर बरे होईल. शिवाय लोकसन्ख्या नियन्त्रन हाही एक चान्गला मुद्दा आहे.....