प्रतिमंत्रिमंडळ- संकल्पना

Submitted by चंपक on 15 November, 2009 - 18:14

भारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही? हा एक प्रश्नच आहे.

जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.
दुर्दैवाने आपल्या देशात वा राज्यात विरोधी पक्षांनी ह्या संकल्पनेला जास्त महत्व दिले नाही. किंवा ह्या संकल्पनेचे महत्व त्यांना कळले नाही. या संकल्पनेचे बीज आपल्या देशात रुजवावे अशी अपेक्षा बाळगुन हा उपक्रम सुरु करत आहोत.

इंग्लंड (व ऑस्ट्रेलिया) तसेच इरर अनेक देशांमध्ये राज्यकारभारात प्रतिमंत्रिमंडळ अर्थात शॅडो कॅबिनेट ला मानाचे स्थान आहे. सत्ता बदल झाल्यास विरोधी पक्षात एखादा प्रती-मंत्री ज्या खात्याचा कारभार पाहत असतो, तेच खाते त्याला प्राधान्याने दिले जाते! http://en.wikipedia.org/wiki/Shadow_Cabinet

सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्तरावर हे काम सुरु करत आहोत. राज्य मंत्रिमंडळाच्या धरतीवर मायबोलीवर देखील ४३ लोकांची एक टीम असावी कि ज्यामध्ये एका सदस्याने (अथवा दोन वा तीन चा एक गट, असे ४३ गट असावेत) प्रत्येक मंत्र्याच्या कामावर लक्ष ठेवुन असावे. दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. त्यात झालेले निर्णय दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांमधुन अथवा शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडुन प्रसिद्ध केले जातात. तसेच मंत्री महोदय त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये देखील अनेक निर्णय जाहीर करत असतात. ते निर्णय प्रसारमाध्यमातुन आपल्या पर्यंत पोहचत असतात. असे हे सर्व निर्णय अभ्यासुन त्यावर या ग्रुप च्या सदस्यांनी चर्चा / भाष्य करावे. उत्तेजन्/टीका/ सुचना अश्या सर्व बाजुंनी त्याचा विचार व्हावा.

या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणजे, इथे चर्चेच्या माध्यमातुन एखाद्या विषयावर/ निर्णयावर तयार केलेले मुद्दे (मायबोली गटाच्या नावे) सरकारच्या संबंधीत खात्याशी (संबंधित मंत्री अथवा त्या खात्याचे सचिव)
पत्रव्यवहारा द्वारे कळवले जातील.

मायबोली परिवारामध्ये जगभर विविध देशांमध्ये राहणारे सुशिक्षित लोक आहेत. हे लोक जरी प्रत्यक्ष मतदानामध्ये भाग घेउन भारतातील राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होउ शकत नसले, तरी त्यांच्या परदेशातील वास्तव्य, शिक्षण, कामकाजाच्या अनुभवाचा फायदा भारतातील राजकीय निर्णय प्रक्रियेवर त्यांनी व्यक्त केलेल्या मत्-मतांतरातुन मिळावा अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला एखादा निर्णय जगाच्या विविध देशांमध्ये/राज्यांमध्ये पुर्वी घेतला गेला आहे का? असेल तर त्याचे तेथील परिणाम काय होते, ह्याचे अनुभव सांगणे अपेक्षित आहे. (अर्थात शासनाची हे काम करण्याची स्वतःची देखील एक यंत्रणा असते, पण ती यंत्रणा दरवेळी बरोबर/योग्य निष्कर्ष काढतेच असे नाही!)
मायबोलीवर वावरणार्‍या अनेक चौकस, सामाजिक बांधिलकी जपणार्‍या अन राजकारण-प्रशासनाची आवड असणार्‍या लोकांनी ह्यावर जरुर विचार करावा ही विनंती. आपल्या सुचानांचे स्वागत!

या उपक्रमाच्या माध्यमातुन : सुशिक्षित लोकांनी राजकिय प्रक्रियेत सामील व्हावे, आपल्या दैनंदिन आयुष्यात सरकारी निर्णयांचे किती परिणाम होतात ह्याची जाणीव व्हावी, आपल्या छोट्या मोठ्या अनुभवांचा इतरांना लाभ व्हावा, तसेच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणारा एक सामान्य नागरिकांचा दबाव गट निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे.

भारतीय संसदीय राजकारणामध्ये प्रतिमंत्रिमंडळ या संकल्पनेचा उदय व्हावा ह्यासाठी हे एक पहिले पाउल ठरावे ही अपेक्षा! Happy

मुंबई दिल्ली त आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार! Happy

*** सुरुवातीला कृषी, शिक्षण अन आरोग्य ह्या तीन खात्याच्या निर्णायावर चर्चा करण्यासाठी प्रत्येकी एक नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. मायबोलीकरांनी आपले विचार त्या धाग्यावर मांडावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती खालील लिंक पाहून तुम्हाला हवे ते खाते निवडा.

महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ अन त्यांच्या खात्यांची यादी :
http://maharashtra.gov.in/english/government/MinisterEng.pdf

वेळोवेळी मंत्रीमंडळाच्या बैठकांच्या लिंक देण्यात येतीलच.

मला Rural Development आणि उर्जा खात्यात भाग घ्यायला आवडेल.

मला महिला-बालकल्याण, ग्रामविकास, ऊर्जा, मध्ये भाग घ्यायला आवडेल.

प्रति सर् कार म्ह्न्जे गम्म्त नाहिये, भार् तात अजुन्हि आय् बिन लोक् म् त वर ह् ल्लाचे प्र् कार होत् आहेत. माय् बोलि वर केले ल्या लिखाना ला ज् बाब् दार कोण? कोणि का हि पण लिहु शकते...................................................

सकाळमधील बातमी वाचली. हल्ल्याची गोष्ट सोडा, पण लालटो म्हणतो त्याप्रमाणे हे काही सोपे नाही. जाणकार लोक लागतील, बराच अभ्यास करावा लागेल. पण यामुळे जर एखाद्या मोठ्या उपक्रमाची सुरुवात होऊ शकली तर उत्तमच आहे. न करण्यापेक्षा जमेल तसे करणे नक्कीच चांगले आणि महत्वाचे.

पत्रकार दिनेश गुणे यांनी उत्तम माहिती देउन जनजागृती केली आहे. केवळ अंकुश नको समांतर/पुरक सक्रिय सहभाग हवा.

या उपक्रमाला मायबोलीवर मिळालेला प्रतिसाद आणि इतर माध्यमात मिळालेली प्रसिद्धी त्यामुळे अनेक अभिनंदनपर संदेश येत आहेत तसेच काही गंभीर मुद्देही मांडले जात आहेत. संकल्पना अतिशय चांगली असली तरी मायबोलीच्या माध्यमाचा उपयोग होऊन त्याचा गैरवापर केला जाणार नाही याबद्दल काही ठोस उपाय झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवतानाच, इथे लेखन करणार्‍या व्यक्तिची जबाबदारी काय,लेखनामागचा खरा हेतू काय यावर कोण लक्ष ठेवणार? गेल्या काही दिवसात प्रसिद्धी माध्यमावर होणारे हल्ले पाहता या गोष्टीचे गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात यावे. याच कारणास्तव, यावर योग्य तो उपाय आणि काही पायाभूत निर्णय किंवा आचारसंहिता ठरवेपर्यंत या ग्रूपमधे नवीन लोकांना सभासदत्व देण्यात येणार नाही. मायबोली हे व्यासपीठ या साठी योग्य आहे का मायबोलीच्या व्यासपीठाबाहेर हे करणे योग्य होईल याचाही विचार ग्रूपचे सभासद करत आहेत.

अतिशय चांगली कल्पना आहे.पण खरोखर तुम्ही म्हणता तसा दबावगट निर्माण होईल का? आणि या प्रती मंत्रीमंडळाच्या सूचनांची दखल शासन घेईल का? आजच्या सकाळमधे वरील उपक्रमाबाबत बातमी आहे.
मला नाही वाटत वरील कल्पना समजून घेण्याइतपत आपले शासन, राजकारणी लोक आणि सचिवस्तरावरील लोकदेखील प्रगल्भ विचारांचे आणि उदारमतवादी आहेत.

कोणताही उपक्रम त्यातही चांगला, सकारात्मक उपक्रम सुरू होताना अशा शंका येणारच. पण आताच; याचा उपयोग होईल की नाही, कोण पाहणार आहे हे या आणि अशा शंकांचा विचार आपण नंतर केला तर? आधी आपल्याला काय सुधारणा सुचवता येतील याचा विचार आपल्या पातळीवर तर करूयात. एखादे वेळेस सुचतील उपाय, ते योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचवता येती, ती व्यक्ती काही प्रयत्न करेल आणि सुधारणा होतील; किंवा यातले काहीही होणारही नाही. पण निदान आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? ज्यांना शक्य आहे, पटतेय, वेळ घालवायला(किंवा कारणी लावायला) तयार आहेत त्यांनी हा प्रयोग करून बघुयात तर !

भारी आयडिया काढलीये...
मी हाच प्रकार समजावून घेण्यासाठी मायबोलीचा मेम्बर झालोय...कारण आजच सकाळ मधून ह्याबद्दल समजले...

- आज पर्यंत याविषयी काय काय झालेले आहे
- श्याडो मात्रीमंडळात कोण कोण आहे
- एखाद्या विषयावरील माझे विचार मी त्या श्याडो मंत्र्यापर्यंत कसे पोहोस्त करायचे
- पाठपुरावा करायची पध्धत काय
कोणी तपशीलवार सांगू शकेल काय?

चंपक...
अभिनंदन! अन अतीशय स्तुत्त्य ऊपक्रम.
मागे एकदा तू IAS मधे सहभागी होण्याबद्दलच्या चर्चेत वयाची मर्यादा असल्याने (माझ्या सारख्या) ईतर इच्छुकाना शक्य होत नाही याबद्दल हळहळ व्यक्त केली होती. उलट राजकारणात मात्र अशी कुठलीच मर्यादा नसल्याने वयाच्या कुठल्याही वर्षापर्यंत कुणिही निवडून येवू शकतो वा मंत्रीमंडळात सहभागी होवू शकतो.
या पार्श्वभूमीवर ही प्रतिमंडळाची कल्पना उत्तम आहे. या मार्गाने तरी का होईना आपण सिस्टीम चा एक भाग बनू शकतो (नुसते बाहेरून सिस्टीम बद्दल ओरडत बसण्यापेक्षा).
वरील खात्यांच्या यादीत मला pwd (including public undertaking) यात काम करायला प्रचंड आवडेल. त्यातही infastructure development -रस्ते, पूल, घरे, विमानतळे, मेट्रो यात विशेष काम करायला आवडेल. याचं कारण एकचः या क्षेत्रातील माझा गेल्या १५+ वर्षांचा अनुभव (भारत, अमेरिका, अमिराती, बाहरीन) आणि पद्व्युत्तर प्रशीक्षण. हा विषय माझ्या प्रचंड जिव्हाळ्याचा आहे अन यात अजूनही भारतात शहरातून देखिल खूप चांगले काम करता येण्याजोगे आहे. उदाहरणे बरीच देता येतील.

यासाठी नेमके कुठे सामिल व्हावे वा लिहीता येईल हे कळवले तर बरे होईल.

शिवाय वरील सकाळ मधील बातमी अन त्या अनुशंगाने इथे वेबमास्टरचे पोस्ट वाचले. मला वाटते, काळजी घेणे निश्चीत आवश्यक आहे पण काही नियमावली अन संकेत बनवून सर्वाना ती पाळण्यास सक्तीचे केले तर कायदेशीररीत्या काही अडचण येवू नये, जसे:
१. खात्याबद्दल लिहीताना राजकीय पक्ष वा व्यक्तीगत टीका टाळावी. तशी टीका केल्यास ती पोस्ट अन त्या सदस्याला "बाद" करावे.
२. टीका करायचीच असेल तर कामकाजावर करावी तेही सबळ आकडेवारी वा ईतर पाठ पुराव्यासकट
३. लिखाणाचा सूर हा positive criticism with recommendations असाच असावा.
४. प्रत्त्येक खात्याला एक मुख्ख्य नेमून द्यावा जो त्यावरील चर्चेचा अहवाल, ऊहापोह, अन योग्य अयोग्य मुद्द्यासकट एक रीपोर्ट तयार करेल जो खर्‍या सरकार/खात्याला पाठवता येवू शकेल.
५. या सर्व चर्चा अन विषयावर मा.बो. वरील कार्यकारिणी मंडळाचे मॉडरेशन असेल (निदान प्रत्त्येक खात्यासाठी एक मॉडरेटर आपल्यातूनच निवडला तरी चालेल) जेणेकरून कुठल्याही पोस्ट, मत, वा ईतर लिखाणामूळे मायबोलीला कसलेही नुकसान होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेता येईल.

पण हा ऊपक्रम राबवणे हे गरजेचे आहे, त्यातून बर्‍याच चांगल्या गोष्टी पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मा.बो. कार्यकारीणीने पुढाकार घेवून इथल्या इच्छुकांना मार्गदर्शन करून एक परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे ही विनंती.

योग

Pages