बऱ्याचदा मित्रांकडून विचारना होते की "नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल." मग त्याला थोडी-फार माहिती देतो. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मायबोली’वर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल.
बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे. ImageOptim सुरु आहे. अगोदरचे QuikTime Player ओपन आहे. प्रत्यक्षात मी Pages मध्ये काम करत असलो तरी ही सगळी ॲप्स बॅकग्राउंडला ओपन आहेत.
नमस्कार,
मी iOS / iPhone Development चा कोर्स करायचा विचार करत आहे. मला IT मधे ५.५ वर्षे अनुभव आहे, पण १ वर्ष गॅप झाली आहे. सध्या नोकरी नाही.
सध्या ह्या क्षेत्रात - iOS - मागणी आहे असं वाटतयं. पुण्यात काही संस्थांमधे हा कोर्स शिकवतात.
कोर्स नंतर नोकरीची हमी असं आश्वासन असेल तरी नुसतं शिकून नोकरी देतील का ? जनरली अनुभव लागतो सगळ्या कंपनीजना.
माझा नोकरी शोध चालूचं आहे, पण सध्या मार्केट डाऊन आहे असं वाटतयं. त्यामुळे काही शिकावं असा विचार आहे. पण २०-२५K गुंतवायचे तर रिटर्न्स हवेत.
कोणी असा कोर्स केला असेल किंवा काही माहीती असेल तर जरूर सांगा.