बॉसच बोलण

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 August, 2012 - 05:05

तुम्हाला बॉसच बोलण
उगाच रोज ऐकाव लागत
शिव्या खाव्या लागतात
पर्सनल कामे करावी लागतात
आत राग येत असूनही
वर गोड गोड बोलाव लागत
त्याच दु:ख मुळीच वाटून घेवू नका
कारण बॉसलाही एक बॉस असतो
तोही नेमक हेच करत असतो
आज बोलणी खाणारा उद्या बॉस होतो
पण दट्ट्या मिळण त्याच
कधी काळी चुकत नसते
माणसाला सत्तेची सदैव भूक असते
त्याच मुख्य कारण हेच असते
जेवढे तुम्ही वर जाणार
तसे समीकरण बदलत जाते
शिव्या देणे जास्त होते
ऐकणे कमी होत जाते
पण ऐकाव्या तर लागतातच
बॉस होऊन तुम्ही जर
शिव्या देणार नसाल तर
वरून येणाऱ्या शिव्यांचे
ओझे उगाच वाढत जाते
नोकरी सोडून कुणाला
मग घरी बसावे लागते
अकाली कधी कुणा उगा
निवृत्त व्हावे लागते
अर्थात घरीही सुटका नसते
तिथेही एक बॉस
तुमची वाट पाहत असतो
प्रारब्ध भोगल्या वाचून
का कोण कधी सुटतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

झककास,kalajivahu,Kiran.. आपले आभार .
अनुभवते,जानते सारे त्यांना हे माहित आहे.
विक्रांत

"अर्थात घरीही सुटका नसते
तिथेही एक बॉस
तुमची वाट पाहत असतो" >>> हे अधिक आवडलं.
या बॉसकडून मिळणारं फायरिंग पास-ऑन करता येत नाही.
स्वत:लाच पचवावं लागतं..... Wink Proud