सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी

हिमालयाच्या पायथ्याशी

रात्री नऊ वाजता बस सुटली आणि मी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकला. 'जय भवानी', 'जय शिवाजी' च्या जयघोषात कुणाला तो ऐकू गेला नसावा, पण वेळच तशी होती. ह्या बसवर आणि त्यापेक्षाही त्या बसच्या उतारूंवर गेल्या काही दिवसांत इतके प्रसंग ओढवले होते (कुणी खोडसाळ म्हणेल की 'ओढवून' घेतले होते.) की आता हा प्रवास सुरु होऊन आम्ही इप्सित स्थळी पोहोचणे हाच मुळी बोनस होता. दोनच दिवसांपूर्वी आम्ही हृषीकेशला गंगेचे रौद्र रूप भयचकित होऊन पाहिले होते. नदीचे शांत, प्रेमळ रूप मी ह्याआधी अनेकदा पाहिलेले आहे, परंतु कालीमातेचा हा संचार मी प्रथमच पाहत होतो. देवभूमी उत्तराखंडवर देवांची अवकृपा झाली होती.