वाचन कट्टा

Submitted by योडी on 31 October, 2012 - 05:53

वाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..

काय वाचताय?कसं आहे?कुठे मिळेल? हे सगळं बोलण्यासाठी..
-परागची संकल्पना..

कृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.
-अ‍ॅडमीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टीव वॉ चं आत्मचरित्र एकदाचं आलं ! बर्‍याच वर्षांपासून विशलिस्टवर होतं.
काल चाळलं आहे फक्त आणि फोटो पाहिले. एखाद दोन पानं वाचली.. प्रास्ताविक द्रविडने (आणि टीम मे ने) केलेलं आहे.. स्टिव वॉच्या पुस्तकाला द्रविडचं प्रास्ताविक ह्यासारख दुसरं कॉम्बो नाही..

वाचायला मजा येणार असं दिसतय...

Facebook COO - Sheryl Sandberg हीच Lean In सध्याच वाचल छान आहे. Corporate world मध्ये काम करणाअया प्रत्येकाने वाचाव अस आहे. सगळी कडे अनुभव सारखेच येतात अस वाटल वाचून.

ठाण्यातल्या पुस्तक प्रदर्शनात 'तेंडुलकरांच्या निवडक कथा' हे पुस्तक दिसलं. लगेच उचललं. कथा जुन्या असणार हे माहिती होतंच. पण ते गृहित धरूनही वाचायला अफलातून आहेत. एकूण १७ कथा आहेत. माझ्या ६-७ वाचून झाल्या आहेत.
सर्वात आधी 'चौर्‍याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च' वाचली. कसली लिहिली आहे!
मग वाचली संग्रहातली पहिली - 'आमच्यावर कोण प्रेम करणार?'
त्यातल्या नायिकेच्या मी फुल्ल प्रेमात आहे...आणि तिच्या तोंडी दिलेल्या संवादांच्याही...

गावदेवी मैदानात प्रदर्शन सुरू आहे. शेवटची तारीख - ११ डिसेंबर.

इंग्लिश पुस्तकं भरपूर आहेत. मराठी आपली तोंडी लावण्यापुरती.

इथे ज्या पुस्तकाबद्दल बोलायचे आहे ते सध्या खूप चर्चेत आहे पण स्वतः वाचलेले नाही. त्याबद्दल विचारणा आणि त्याबद्दल बोलले लिहीले गेलेले शेअर करण्यासाठी प्रयत्न करूनही योग्य बाफ न सापडल्याने सध्या इथे लिहीत आहे. (नंतर योग्य त्या ठिकाणी हलवता येईल).

फेसबुक वरचे मित्र मुरलीधर खैरनार यांची शोध ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. कादंबरी लिहीत असताना त्यांनी अनुभव शेअर केलेच होते. सध्या या कादंबरीबद्दल अनेकांकडून चांगलं मत ऐकू येतं आहे. लोकमत वाल्यांनी शोध लिहीत असताना असा लेख मुरली खैरनारांकडून घेऊन प्रकाशित केला आहे. एक दोन दिवसात कादंबरी विकत घेणार आहेच. पण कुणी वाचली असेल तर समीक्षण वाचायला आवडेल.

लोकमतचा लेख इथे ..
http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=2246

राजहंस च्या ग्रंथवेद या दर महिन्याला निघणार्‍या नियतकालिकात याबद्दल वाचले होते. परीक्षण होते की माहिती लक्षात नाही. आणि नेमकी कोणत्या महिन्याच्या, ते ही लक्षात नाही. पण मागच्या ३-४ महिन्यांतील अंक तेथे पाहा. इतरही वाचनीय माहिती आहे.
http://www.rajhansprakashan.com/granthvedh

मराठी पुस्तक प्रदर्शन!

दि. ६ जानेवारीते १२ जानेवारी कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर आवार, झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ, जंगली महाराज पथ, शिवाजीनगर पुणे या ठिकाणी सकाळी ९.०० ते सायंकाळी ९.०० वेळेत मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरणार आहे.

हे प्रदर्शन पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने भरवण्यात येणार असून अधिकाधिक मराठीप्रेमींनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन मराठी पुस्तकांची मोठ्या संख्येने खरेदी करावी, असे आवाहन !

अनिल गोरे, मराठीकाका.

सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका.

विशेष माहिती :- भाषेचे संवर्धन हे खरे तर कोणत्याही महापालिकेचे वैधानिक कर्तव्य नाही परंतु त्या त्या शहराची महापालिका वैधानिक कर्तव्याशिवाय अन्य लोकोपयोगी उपक्रम अंगीकृत करू शकते. आपल्या शहरतील नागरिकांची मुख्य भाषा असलेल्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून पुणे महापालिकेने महापालिकेचीच अंगीकृतसमिती म्हणून मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या कार्यासाठी तीन वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात केली.

स्थानिक भाषा आणि आपल्या कामकाजाची राजभाषा असलेल्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी अशी समिती आणि असेकार्य करणारी पुणे महानगरपालिका ही जगातील एकमेव महापालिका आहे. यापुढेइतरअनेकशहरांत अशा समित्या स्थापनहोतील पण अशी समितीस्थापन करणारी जगातील पहिली महानगरपालिका हा मान पुणे महापालिकेकडे कायम राहील.

मला आलेली एक इमेल, सर्वांच्या माहितीसाठी इथे देतोय.. कदाचित अनेकांना आली असेल, पण ज्यांना आली नसेल त्यांच्यासाठी....

25 डिसेंबर 2015 पासुन - ‘अॅप’ली ग्रंथाली चा शुभारंभ!

ग्रंथाली’ महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात रुजली ती एक वाचक चळवळ म्हणून. 1975 साली आरंभ झालेली, ज्ञानप्रसाराचे काम सलग चाळीस वर्षं करणारी ही बहुधा एकमेव साहित्य चळवळ ठरावी. या प्रवासात वाचकाच्या दारी, खेडोपाडी पुस्तकं नेण्याचं काम ‘ग्रंथाली’नं केलं. आजवर 800 पेक्षा अधिक पुस्तकें प्रसिद्ध केली. कित्येक पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कारही मिळाले.

पण हा सगळा इतिहास झाला. जेव्हा ‘ग्रंथाली’ सुरू झाली ते जग आणि आजचे जग ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, आणि तो फरक तंत्रज्ञानामुळे आहे हे वादातीत आहे. ‘ग्रंथाली’ने हे ओळखले आहे आणि म्हणूनच हा ‘अॅप’ व ‘टॅब’चा उपक्रम हाती घेतला आहे, ज्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. प्रकाशकांना व लेखकांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि तुम्हा वाचकांना पुस्तके स्वस्तात वाचायला मिळतील! शिवाय, ई-बुक म्हटले की सगळी पुस्तके रंगीत! आणि आम्ही ePub हा format निवडला असल्यामुळे आणखीन बऱ्याच शक्यताही निर्माण होतात: पुस्तकात ऑडिओ-व्हिडिओ टाकू शकतो; पुस्तकांना interactive बनवू शकतो.

‘ग्रंथाली’चे अजून एक वैशिष्ट्य हे आहे की आम्ही फक्त स्वतःपुरता विचार कधीच केला नाही. आम्ही नेहमी मराठी पुस्तके व मराठी संस्कृती यांचा व्यापक विचार केला आहे. ती टिकतील कशी? त्यांचे संरक्षण व संवर्धन कसे करायचे? अशा प्रश्नांचा आम्ही नेहमीच विचार केला आहे, आणि भविष्यातही करत राहू. म्हणूनच हा ‘अॅप’ व ‘टॅब’चा उपक्रम हाती घेतला आहे, आणि त्यासाठी आम्हाला प्रशांत कऱ्हाडे (IITian आणि IT expert) व स्वप्नील उघडे (CEO, Magicworks IT Solutions Pvt. Ltd.) मदत करत आहेत. त्यामुळेच आतापर्यंतचे काम उत्तम रितीने पार पडले आहे व पुढचे कामही तसेच पार पडेल असा विश्वास वाटतो.

या अॅपचे नाव आम्ही ‘अॅप’ली ग्रंथाली असे ठेवले आहे. हे अॅप 29 फेब्रुवारी, 2016 पासुन जगभरातल्या सर्वांना गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करता येईल. अॅपमधून वाचकांना दर महा ग्रंथालीची दोन नवीन पुस्तके मोफत वाचायला मिळतील. महिना संपला की ही पुस्तके अॅपमधून automatically delete केली जातील व वाचकांना दोन नवीन पुस्तके डाऊनलोड करता येतील. मोफत नसलेली व विक्रीस असलेली पुस्तके ही केवळ ग्रंथालीचीच नसुन अन्य प्रकाशकांचीही असतील व ती अॅपमधुनच विकत घेता येतील; अॅपमध्ये payment gateway integrated असेल. (या ‘अॅप’मधील पुस्तके फॉर्डवर्ड करता येणार नाही किंवा त्यांचा प्रिंट आऊट काढता येणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.) अॅपमधुन वाचकांना ग्रंथालीचे ‘शब्द रुची’ हे मासिक व अन्य प्रकाशकांची मासिकेही वाचता येतील. (यातील काही मासिके मोफत असतील तर काही मासिकांसाठी पैसे मोजावे लागतील.) याशिवाय अन्य प्रकारची माहिती अॅपमधुन मोफत पुरवली जाईल: पुस्तक परिक्षणे (ग्रंथाली व अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांची), पुस्तक प्रकाशन समारंभांच्या बातम्या, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बातम्या, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्ति व संस्था यांच्या बद्दल लेख, इतर चांगले लेख, मराठी नाटकांची परिक्षणे व promos, मराठी सिनेमांची परिक्षणे व promos. ह्या मागचा उद्देश सामाजिक-सांस्कृतिक जगताला गती आणणे हा आहे.

ग्रंथाली’ने हे अॅप बनवण्यासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे. पण योजलेली पुढील कामे करण्यासाठी अधिक रक्कम लागणार आहे. म्हणून ग्रंथाली आपल्या हितचिंतकांना 125 ePub पुस्तकांचा संच 15,000 रु. किंमतीत विकत घ्या असे आवाहन करत आहे. मदतीचा हात पुढे करणाऱ्या पहिल्या ५०० व्यक्तींना Magicworks IT Solutions Pvt. Ltd. तर्फे Micromax p680 हा ‘टॅब’ मोफत देण्यात येणार आहे. ह्या टॅबचा वापर अॅप डाऊनलोड करून ePub पुस्तके वाचण्यासाठी तुम्ही करू शकता. (हा टॅब एक उत्कृष्ठ टॅब असुन त्याचा वापर एका ‘नॉर्मल’ टॅब सारखाही केला जाऊ शकतो: कॉल करण्यासाठी, इतर अॅप डाऊनलोड करून रन करण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी, इत्यादी.) 25 डिसेंबर 2015 रोजी होणाऱ्या ग्रंथालीच्या वाचकदिनी आम्ही ‘अॅप’ली ग्रंथाली लाँच करत आहोत, व तुम्ही मदतीचा हात पुढे करायचे ठरवले तर त्याच दिवशी आम्हाला कळवू शकता. तसे तुम्ही कराल अशी आशा.

अखेरीस हे आवर्जून सांगावेसे वाटते की ग्रंथालीने आपले नवीन वेबसाइट लाँच केले आहे: http://www.granthali.com. ते जरूर पाहावे. सध्या त्यावर बरीच पुस्तके आणि माहिती टाकली आहे. येणाऱ्या दिवसात अजुन बरीच पुस्तके व माहिती आम्ही त्यावर टाकणार आहोत. ग्रंथालीने social mediaचाही वापर करायचे ठरविले आहे. म्हणून ग्रंथालीने Facebook, Twitter, Google+, Pinterest, आणि YouTube वर accounts उघडले आहेत

ग्रंथालीचा वाचकदिन कीर्ती कॉलेजच्या पटांगणावर होणार आहे. त्याचा पूर्ण पत्ता खालील प्रमाणे आहे: Kirti College Ground, Kirti College, Off. Veer Savarkar Marg, Kashinath Dhuru Marg, Dadar (West), Mumbai, Maharashtra 400028 ह्या कार्यक्रमाचे live updates मिळवण्या साठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा!

यापुढे, ग्रंथालीच्या विश्वात घडणाऱ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या माधमांतून मिळत राहील. त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा.

कळावे,
आपला,
सुदेश हिंगलासपूरकर
विश्वस्त, ग्रंथाली

कै मंगेश पाडगावकर
अंत्यदर्शन आज दुपारी 12 ते 3.
पत्ता: 125ए, साईप्रसाद, जैन सोसायटी, सायन (प).
अंत्यसंस्कार: दु. 4 वाजता सायन विद्युतदाहिनीत.

माझ्या पन्जाबी मित्राने पु.ल.देशपान्ड्यान्च्या व्यक्ति आणि वल्ली आणि असा मी असामी चा इन्ग्लिश अनुवाद आहे का ते विचारले आहे. कुणाला काही माहित आहे का?