नर्सरी

Vitrogreen अर्थात आमचा रोपांचा व्यवसाय

Submitted by प्रज्ञा९ on 16 June, 2021 - 12:32

नमस्कार, मला आमच्या बागकामाच्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे. आमचा रोपांचा व्यवसाय आहे. शोभेची झाडं आम्ही विकतो. सविस्तर माहितीसाठी खाली लिंक देत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काही अडचणी येत आहेत. एखाद्या नर्सरीला आवश्यक ती रोपे पुरवल्यावर त्या रोपांच्या रिकाम्या कुंड्या, आणि पॅकिंग करताना वजन जास्त होऊ नये म्हणून काढावी लागणारी माती/ कोकोपीट यांचा खूप साठा आमच्याकडे आहे जो आम्हाला विकत द्यायचा आहे. साधारण ४" मापाच्या कुंड्या आहेत आणि कोकोपीट, माती आहे. पुण्यात असतो. संपर्कासाठी नंबर देत आहे, इच्छुकांनी कृपया संपर्क करावा.

भुवनेश्वर येथे दोन तीन दिवस रहायच्या सोयींबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by प्रज्ञा९ on 29 January, 2018 - 06:05

माझा नवरा आमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या कामासाठी एका मित्राबरोबर भुवनेश्वर ला जात आहे. १ फेब्रुवारीला पहाटे भुवनेश्वरला उतरणार आणि ४ फेब. ला निघणार. ३ दिवस पूर्ण वास्तव्य भुवनेश्वर शहरातच असेल. तिथे बोटॅनिकल गार्डन आणि नर्सरी-रोपांशी संबंधित लोकांना आणि ठिकाणांना भेटायचं आहे. तर तिथे रहाण्यासाठी आणि शाकाहारी जेवणासाठी चांगले पर्याय सुचवा प्लीज. जिथे कामासाठी जायचंय तिथली माहिती काढलेली आहे. साधारण लॉजिंगचं बघून ठेवलंय (बुकिंग नाही), पण काही चांगली माहिती असली हवी आहे.

'पॅशन ग्रीन' कंपनीच्या संचालिका अलका बजोरिया : मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 December, 2013 - 04:45

शोभेच्या रोपांना एखाद्या कलाकृतीचे रूप देण्याचे कौशल्य हाती असलेल्या मुंबईस्थित व्यावसायिका अलका बजोरिया यांची 'पॅशन ग्रीन' कंपनी आणि त्यांच्या कंपनीद्वारे दिल्या जाणार्‍या समग्र सुविधा त्यांच्या झाडा-पानांवरच्या प्रेमाची साक्षच देतात. आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप देणार्‍या, नोकरीतून ब्रेक घेतल्यावर आपल्या सेकंड इनिंगमध्ये बागकामाच्या छंदाला कॉर्पोरेट स्तरावर नेणार्‍या व त्यात यश मिळवणार्‍या अलका यांचा हा खास परिचय मायबोली व संयुक्ताच्या वाचकांसाठी!

'पॅशन ग्रीन' सुरू करण्याअगोदरच्या तुमच्या वाटचालीविषयी सांगाल का?

गो-ग्रिन नर्सरी - युसुफ मेहेरअली सेंटर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 June, 2011 - 13:05

गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले.

पत्ता
युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत
मुंबई-गोवा मार्ग
पनवेल.

१) नर्सरीचे गेट

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नर्सरी