प्रवासवर्णन

महाबलिपुरम (भाग ३)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाबलिपुरमचे अजून एक वैशीष्ट्य असलेले हे शोअर टेम्पल. असे म्हणतात की पूर्वी ही अशी एकसारखी सात देवळे होती म्हणून महाबलिपुरमला "सेव्हन पॅगोडा" असे म्हटले जायचे. सध्या त्यापैकी ही दोनच मंदिरे शिल्लक आहे.
ही मंदिरे पल्लव राजा नरसीम्हराय याच्या काळात बांधली गेली.

हिंदीमधे बोर्ड लिहायलाच हवा का? घ्या एकदाचा!!!!! Proud

विषय: 

महाबलिपुरम (भाग २)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आता हे प्रमुख आकर्षण
अर्जुनाची तपश्चर्या किंवा गंगेचे आगमन.

माझ्या कॅमेरामधे याचा पूर्ण पॅनोरमा शॉट घेता आला नाही, लांब जाऊन शॉट घेणे शक्य नव्हतं कारण इथे प्रचंड ट्राफिक होतं. पूर्वी हे अर्धं शिल्प वाळूमधे गाडलेले होते. काही दशकांपूर्वी पूर्ण उत्खनन करून काढलेले आहे. पूर्ण शिल्प विकीपीडीया पेजवरती आहे. हे शिल्पदेखील अर्धवट स्थितीमधेच आहे, मात्र जेवढे खोदलेले आहे तेवढे मात्र अप्रतिम आहे:

हा हिमालयाचा देखावा असून मधल्या खोबणीमधे गंगा अवतीर्ण होताना दिसत आहे. आजूबाजूला यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा वगैरे दिसत आहेत.

विषय: 

महाबलिपुरम (भाग १)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाबलिपुरम म्हणजेच मामल्लापुर हे चेन्नईपासून ६० किमी अंतरावर असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. पल्लव राजघराण्यामधे हे शहर एक विकसित बंदर होते आणि इथून बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडच्या देशाशी व्यापार केला जात होता. तमिळमधे याच शहराला कौतुकाने "कडल मल्लै" म्हटले जाते (समुद्र टेकडी).

इथे असलेली बरीचशी शिल्पे ही खोदकाम करून बनवण्यात आली आहेत. (रॉक कट). यापैकी अर्जुनाची तपश्चर्या हे एकाच दगडात खोदलेले भव्य बास रीलीफ (मराठी शब्द सांगा) हे इथले एक प्रमुख आकर्षण आहे. ही बहुतेक शिल्पे सातव्या ते नवव्या शतकामधे खोदलेली आहेत. संपूर्ण शिल्पांवर महाभारताचा प्रभाव जाणवत राहतो.

विषय: 

ईंडोनेशिया - बांडुंग, योग्यकर्ता आणि बोरोबुदुर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

१) ९ शतकात ईंडोनेशियामधे महायाना बुद्धीस्त लोकांनी 'बोरोबुदुर' स्तुपाची निर्मिती केली. अनेक वर्ष हे मंदिर जंगलात गाढले गेले होते. हे मंदिर इतके भव्य आणि दिव्य आहे की तिथे गेल्यानंतर जेंव्हा आपण अगदी चिमुकले भासायला लागतो तेंव्हा ह्या पाषाणनिर्मित मंदिराची भव्यता आपल्याला कळते. ह्या मंदिराविषयी अगदी सविस्तर माहिती इथे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Borobudur

विषय: 

सँटा फे, इ.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती सुट्टी घेऊन एका ठिकाणी गेली. जिथे गेली ते गाव पॉप्युलर पटेल पॉइंट्स पैकी खासच नव्हतं. सहसा ती किंवा मी सुट्टी घेऊन कुठे गेलो की सुट्टीचे दिवस, आधीची, नंतरची आवराआवरी झाल्यावरच निवांत बोलणं होतं. ह्या वेळी मात्र तिचा तिथे पोचल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीच फोन आला. अगदी भरभरुन बोलत होती. एकूण ते ठिकाण मैत्रिणीला भयंकर आवडले होते. गूगल केल्यावर तिथे ऑगस्टात एक (रेडवाले) इंडियन मार्केट पण असते असे समजले. ठरलं! यंदा तिथेच उन्हाळ्याची सांगता करायची. उन्हाळा काही तिथे जाण्यासाठी 'आयडियल' ऋतू नाही. पण इंडियन मार्केट गाठायचं तर उन्हाळ्यातच जायला हवं.

विषय: 

कंबोडियातील 'बान्ते सराई' - एक अपुर्व शिल्पकृती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे.

कंबोडियातील बाजार आणि गावकुस!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी कंबोडियामधे २०११ ला अंकोरची मंदिरे बघायला गेलो होतो. मी कुठल्याही नवीन ठिकाणी जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा त्या त्या देशाचा भाजीबाजार, पहाटेचे जनजीवन, रात्री शहराची निरवानिरव, एखादे खेडेगाव आणि तेथील लोकांचा नित्याचा व्यवहार ह्या गोष्टी अनुभवण्याचा हौसेने प्रयत्न करतो. ह्याच माझ्या हौसेतून काढलेली काही छायाचित्रे मी तुम्हाला दाखवत आहे.

१) हा आहे पाम-गुळ. ही बाई हा गुळ झाडाच्या पानात छान गुंडाळूत आहे.

248655_1957280142311_1551964083_2070861_4152555_n.jpg

विषय: 

जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग २)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

भाग १

Piazza del Campidoglio कडे जाणारा Cordonata (घोडे व गाढवं पण चढू शकतील अशा उताराप्रमाणे बनविलेल्या पायऱ्या). पंचम चार्ल्सच्या भेटीच्या सन्मानार्थ हा पियाज्झा बनविला गेला. मायकेलअॅंजेलोने याच्या रचनेत अनेक भौमितीक प्रमाणांचा वापर केला आहे. कॅस्टर आणि पोलक्स कॉरडोनाटाच्या दोहोबाजूला दिसताहेत.

पियाज्झाच्या एका अंगाला आहेत Aracoeli संगमरवरी पायऱ्या. १३४८ मधे प्लेग संपल्याच्या निमित्ताने या बनविल्या गेल्या.

विषय: 

जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग १)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सप्टेंबरमध्ये रम्य सोरेंटोत आठवडाभराची 'मीटींग' करुन (आणि अर्थातच भरपूर कॉफी पिऊन, लिमोनचेल्लो आस्वादून, रिकोटा-पेर केक सारखा खास स्थानिक पदार्थ रिचवून) परतीच्या वाकड्या मार्गावर असलेल्या रोममध्ये शनिवारी मध्यरात्री पोहोचलो. टर्मिनीसारखे प्रगल्भ, कल्पक पण तितकेच उपयोगी नाव असलेल्या स्थानकावर नेपल्सहून निघालेली माझी आगगाडी (अर्थात इलेक्ट्रिक) पोहोचणार याची कल्पना असल्याने, जवळचेच एक साधे हॉटेल निवडले होते. तसेही बहुतांश वेळ बाहेरच घालवायचा असतो. नेहमीच्या साहसी (अशा बाबतीत तरी) स्वभावाप्रमाणे स्मरलेल्या नकाशाप्रमाणे स्वारी १५ दिवसांची बॅग ओढत निघाली. शहर लख्ख जागे होते.

प्राचीन कोकण संग्रहालय

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे.

या संग्रहालयाच्या सुरूवातीलाच आपले स्वागत या मामाकडून केले जाते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रवासवर्णन