सँटा फे, इ.
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
माझी एक मैत्रीण आहे. एकदा ती सुट्टी घेऊन एका ठिकाणी गेली. जिथे गेली ते गाव पॉप्युलर पटेल पॉइंट्स पैकी खासच नव्हतं. सहसा ती किंवा मी सुट्टी घेऊन कुठे गेलो की सुट्टीचे दिवस, आधीची, नंतरची आवराआवरी झाल्यावरच निवांत बोलणं होतं. ह्या वेळी मात्र तिचा तिथे पोचल्यावर दुसर्या-तिसर्या दिवशीच फोन आला. अगदी भरभरुन बोलत होती. एकूण ते ठिकाण मैत्रिणीला भयंकर आवडले होते. गूगल केल्यावर तिथे ऑगस्टात एक (रेडवाले) इंडियन मार्केट पण असते असे समजले. ठरलं! यंदा तिथेच उन्हाळ्याची सांगता करायची. उन्हाळा काही तिथे जाण्यासाठी 'आयडियल' ऋतू नाही. पण इंडियन मार्केट गाठायचं तर उन्हाळ्यातच जायला हवं.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा