महाबलिपुरम (भाग २)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आता हे प्रमुख आकर्षण
अर्जुनाची तपश्चर्या किंवा गंगेचे आगमन.

माझ्या कॅमेरामधे याचा पूर्ण पॅनोरमा शॉट घेता आला नाही, लांब जाऊन शॉट घेणे शक्य नव्हतं कारण इथे प्रचंड ट्राफिक होतं. पूर्वी हे अर्धं शिल्प वाळूमधे गाडलेले होते. काही दशकांपूर्वी पूर्ण उत्खनन करून काढलेले आहे. पूर्ण शिल्प विकीपीडीया पेजवरती आहे. हे शिल्पदेखील अर्धवट स्थितीमधेच आहे, मात्र जेवढे खोदलेले आहे तेवढे मात्र अप्रतिम आहे:

हा हिमालयाचा देखावा असून मधल्या खोबणीमधे गंगा अवतीर्ण होताना दिसत आहे. आजूबाजूला यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा वगैरे दिसत आहेत.

गाईडच्या मते, हा तपश्चर्या करणारा अर्जुन. शोअर टेम्पल (किनार्‍यावरचे देऊळ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या शंकराच्या देवळाच्या बरोबर सरळ रेषेत हा अर्जुन उभा आहे आणि तपश्चर्या करत आहे. पण जर हा प्रसंग गंगावतरणाचा आहे असे मानले तर हा तपश्चर्या करणारा भगीरथ आहे. नुकत्याच समजलेल्या माहितीनुसार हा प्रसंग गंगावतरणाचाच आहे, असे अभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.

या मनीमाऊ देखील तपश्चर्याच करत आहेत, पण वरच्या अर्जुनाचं खपाटीला गेलेलं पोट बघा आणि यांचं तुडुंब पोट. मनीमाऊना इतक्या भक्तीभावाने तप करताना पाहून उंदीरमामा देखील त्यांची पूजा करत आहेत. मांजरीचं लक्ष कुठे आहे ते सांगायला नकोच.

===========================================
हिमालयातील विष्णुचे मंदिर आणि तिथे शिकवणारे गुरूजी व त्यांचे तीन शिष्य (शिष्यांची मुंडकी उडाली आहेत)

=================================================

यक्ष, किन्नर, अप्सरा वगैरे:

=====================================================

या अर्जुनाची तपश्चर्या/गंगावतरण शिल्पाला लागूनच असलेले हे अजून एक मंदिर:

या मंदिरामधे कृष्णलीला कोरल्या आहेत:

हा कृष्ण बौद्धशैलीतला वाटतो का? जाणकारांनी सांगा प्लीज.

================================================

हे पांडवांचे पाच रथ:
यांची नावे रथ असली तरी प्रत्यक्षामधे ही मंदिरेच आहेत. यापैकी केवळ द्रौपदीचा रथ पूर्ण झालेला असून इतर कामे अर्धवट स्थितीमधेच आहेत. भीमाचा रथ सर्वात भव्य असून युधिष्ठीर आणि नकुल शेअरिंग रथामधे आहेत. बाकीचे चार रथ एकाच रांगेत असून अर्जुनाचा एकट्याचा रथ वेगळा कोरलेला आहे.

आधी लिहिलं तसं हे बांधकाम केलेलं नाही, तर अख्खा दगड खोदून त्यामधे केलेले काम आहे.

द्रौपदी:


सहदेव (तमिळी गाईड म्हणे सखदेवाचारी)

आतला भिंतीवर अर्धवट झालेले काम दिसत आहे:

युधिष्ठीर आणी नकुल:

भीम:

अर्धनारीनटेश्वर:

तमिळ भाषा नक्कीच नाही आहे ही: पाली???

याच मंदिराच्या सरळ रेषेत इतर तीन रथ आहेत.

हत्तीच्या बाजूला जे एक छोटे मंदिर आहे तो अर्जुनाचा रथ:

अर्जुन कुठाय? गेला तपश्चर्येला.

हत्ती:

नंदी:

सिंह

=============================

महाबलिपुरम (भाग १) http://www.maayboli.com/node/45028
महाबलिपुरम (भाग ३) http://www.maayboli.com/node/45038

विषय: 

कित्ती सुंदर आहे हे सर्व. पहिल्या फोटोतील छोटी-छोटी शिल्पं खूप गोडुली आणि रेखीव दिसतायत. गाय-वासरूमधले वासरू खूप गोंडस आहे आणि हत्तींची शिल्पं सफाईदार आहेत.

वा !! अत्तिश्श्श्य सुंदर शिल्पं आहेत. Happy
अगदी ३-४ वर्षांची असताना आई बाबांबरोबर महाबलीपुरमला गेले होते. आठवत काहीच नाही, पण हा शेवटचा हत्ती, सिंह ह्यांच्यासमोर फोटो काढलेले आहेत आमचे. तेंव्हाच्या फोटोंवरुन ह्यातल्या इतरही बर्‍याचश्या गोष्टी ओळखीच्या वाटताहेत! Happy
मस्तच फोटो नंदिनी.

छान ! सहाव्या शतकानंतरची शिल्पकला यांत्रिक झाली .कलात्मकता ,जिवंतपणा ,भाव इत्यादि लुप्त झाले .कलाकारांना पूर्ण स्वातंत्र्य होते ते गेले .कोरिवकाम आणि भव्यपणा वाढला .महाबलीपूरमची कला खरी कला आहे .जसे आहे तसे वस्तु आणि भाव आहेत .स्त्रियांचे शरीरे उगाचच उत्तान कोरलेली नाहित आणि ढोंगी मांजरही आहे ,गायीचे दुध काढणारा गवळी नी वासराला चाटणारी माय .देवलोक त्यांच्या कामात आणि सामान्य आपल्या दैनंदीन कष्टांत .नंतरच्या काळात ढीगभर शिल्पांची गोपुरे आली पण गंमत गेली .जुन्या तमिळमध्ये ख ग घ त श ह वगैरे बरीच व्यंजने नाहित .शिवा आहे चिवा ,लक्ष्मण होतो लटचिमण ,खाना गाना होते काना ,सीता होते सिदा .

तो तपश्चर्या करणारा भगिरथ असावा कारण प्रसंग गंगावतरणाचा आहे त्यामुळे अर्जुनाऐवजी भगिरथाचे शिल्प सुसंगत वाटते.

हो गमभन, बरोबर आहे.
नंदिनी, त्या शिल्पाविषयी दोन मतं अभ्यासकांनी मांडली होती. १. ते शिल्प गंगावतरणाचा देखावा आहे. २. किरातार्जुन कथा/ त्यातला अर्जुनाचा तपःश्चर्येचा भाग तिथे चित्रित केली गेली आहे.
आता यातलं पहिलं मत सर्वमान्य ठरलं आहे तरीही बरेच ठिकाणी त्याला अर्जुनाचं तप असं नाव देतात.

तुम्ही जे मत मानाल त्यावर तो तपःश्चर्या करणारा भगीरथ आहे का अर्जुन हे ठरणार. पण गंगावतरणात अर्जुन कधीच येणार नाही

आता यातलं पहिलं मत सर्वमान्य ठरलं आहे तरीही बरेच ठिकाणी त्याला अर्जुनाचं तप असं नाव देतात>> ओके. मग मी वर तसं संपादित करते. गाईडने पण अर्जुनास पेनन्स म्हणून सांगितले. Sad

तूच वरती गंगा अवतीर्ण होत आहे असं लिहिलंस ना? म्हणजे ते गंगावतरण नाही का होणार? तू अर्जुनाज पेनन्स म्हणलंस तर त्यात गंगा कशी येईल? दोन्ही कथांची सरमिसळ करू नकोस - कुठलंही एक नाव दिलंस तरी हरकत नाहीये

परत एकदा प्रचि न्याहाळत होतो. तेव्हा ते मनिमाऊच्या तपश्चर्येचे चित्र आवडले. मुख्य म्हणजे ते आता गाजत असलेल्या "आसाराम" घटनेशी चपखलपणे जुळते आहे. Happy

मस्त फोटो नंदिनी.:स्मित: मनीमाऊ लय भारी. आमच्या इथे अशी पांढरी गुबगुबीत माऊ होती ती उभी राहिली मी तिच्या पोटाला गुदगुल्या करुन हैराण करायची.:फिदी: अर्थात ती तेव्हा छोटी पिल्लु होती, मग नखे बाहेर न काढता ती मला पंज्याने मारायची.:फिदी:

सगळी शिल्पे आवडली, खूप छान वाटले बघतांना. अजून ट्रिप होऊ देत तुझ्या अशा.

दोन्ही कथांची सरमिसळ करू नकोस - कुठलंही एक नाव दिलंस तरी हरकत नाहीये>> होय, आता आलं लक्षात. फारच पौराणिक घोळ घातला जातोय माझ्याकडून. लॉजिकली विचार करता गंगावतरण हे एवढ्या मोठ्या शिल्पासाठी परफेक्ट वाटतंय. अर्जुनाच्या तपासाठी एवढे दोन्ही बाजूला ढीगबह्र यक्ष किन्नर अप्सरा प्राणी हत्ती वगैरे कशाला? Happy गंगावतरण ही मात्र तेवढी मोठी घटना आहेच- त्याकाळी त्याचा काही मोठा सण वगैरे साजरा होत असेल का? दक्षिणेसाठी देखील गंगा तितकीच "इम्पोर्टंट" होती का? आणि गंगावतरण कथादेखील महाभारतामधेच येते ना?

गंगावतरण कथादेखील महाभारतामधेच येते ना?
>>
नाही नंदिनी! महाभारतातदेखील गंगा आहे पण ती पितामह भीष्मांची माता म्हणून. अर्जुनाने शेवटी शरशय्येवर पडलेल्या भीष्मांना बाण मारुन गंगाजल पाजले होते.
बहुतेक इथेच घोळ होत असावा.
गंगावतरणाची कथा शिवपुराणात येत असावी. इथे शंकरांच्या मी तरी ती शिवलीलामृतात वाचल्याचे स्मरते.

दक्षिणेसाठी देखील गंगा तितकीच "इम्पोर्टंट" होती का?
>>
असेलच की! मलातरी महाबलिपूरमची शिल्पे एक काही थीम ठेऊन घडवल्यासारखी नाही वाटत. मुख्य म्हणजे ती दगडात कोरलेली आहेत. दगडाचा आकार, त्याचे स्थान पाहून त्यात काय कोरता येईल याचा विचार करुन घडवलेली असावीत.
एवढा मोठा प्रस्तरात जर महाभारत थीम ठेवली असती तर राजसुय यज्ञ, द्रौपदी स्वयंवर, द्रौपदी वस्त्रहरण, महाभारत युद्ध किंवा गीता उपदेशाचा सीन असे काहीतरी घडवता आले असते. पण त्या शिलेच्या मधोमध असलेली नैसर्गिक घळ शिल्पकाराला आकाशातून पडणार्‍या जलप्रपातासारखी भासली असावी आणि त्याने गंगावतरण कोरले असावे असे वाटते.

गंगावतरण म्हणजे भगीरथाने तप करुन स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली, जी शंकरांनी आपल्या जटांमध्ये झेलली. ही गंगा मग नदी म्हणून वाहू लागली. हे झाले भगीरथवाले गंगावतरण Happy

महाभारताच्या आधीपासुनच गंगा वाहत होती. हस्तिनापूरचा राजा शंतनूने गंगेशी लग्न केले आणि तिने भीष्माला जन्म दिला.
जेव्हा भीष्म शरशय्येवर पडले होते तेव्हा त्यांनी पाणी मागितले (देह सोडण्याआधी). तेव्हा अर्जुनाने जमिनीत बाण मारला आणि तिथून गंगेची एक धार भीष्माच्या मुखात पडली. गंगेनेदेखील मग आपल्या पुत्राला म्हणजे भीष्माला शेवटच्या क्षणी दर्शन दिले. इथे अर्जुनाने बाण मारुन गंगेचा प्रवाह युद्धभुमीवर निर्माण (अवतरित) केला म्हणून अर्जुनाने गंगा अवतरीत केली की काय असा घोळ झाला असावा. Happy