मला चुकीची ऐकू आलेली गाणी

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

Submit to kanokani.com

मला पण 'मी. ईंडीयाच' काटे नही कटते दिने है रात'

हे काय गौडबंगाल आहे कळायचच नाही.. आता ही काटे कापायच्या का मागे लागली आहे.. गुलाबाचे काटे कापयचे असतिल तर घ्यावी सुरी आणि दाखवाव हिल हे फार सोप्प काम आहे म्हणुन.

नीन्दिया से जागी बहार,
ऐसा मौसम देखा पहली बार,
कोयल थूऽऽके, थूऽऽके गाए मल्हार!! हसून हसून गडबडा लोळण

प्रीटी वुमssन
मला कधी नीट ऐकूच यायचं नाही ....नवीन होतं तेव्हा... मला ते "कुडी..गुमान" का काहितरी वाटायचं .. हसून हसून गडबडा लोळण त्यात पंजाबी संगीत, दारासिंग वगैरे होते...त्यामु़ळे वाटलं की असेल काहितरी पंजाबी शब्द... हाहा (तसे कितीतरी अर्थ न कळणारे शब्द हिंदी गाण्यात असतात..) .. मग एकदा एका चॅनल वर गाण्याचे नाव आले लिहून तेव्हा कळाले... खो खो
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

कह दोके तुम होSSSमे रिSSSवर्ना!
कित्येक वर्षे मी हे गाणं असं म्हणत होतो. पण हे 'होमे' अन 'रिवर्ना' काय भानगड आहे, ते कळल्याशिवायच!
खुप वर्षांनी ते कळलं. आता आता Hyundai Verna गाडी घरात आल्यानंतर 'कह दो के तुम हो मेरी वरना' असं गाणं- ते या गाडीसाठीच तयार केलं असावं, असं वाटून गेलं!

कह दोके तुम होSSSमे रिSSSवर्ना! >>> अगदी अगदी!!

स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

कुठ्लं गाणं मला नीट आठ्वत नाही पण त्यात 'जायेगी पीके घर गोरी' असं होतं, मला वाटायचं एक पेग वगैरे घेऊन घरी जाणारी ही कोण गोरी बाबा स्मित मग कळलं की "पी" म्हणजे "पिया", बहुतेक अमेरिकन्स कसा "हनी" चा शॉर्टफॉर्म "हन" करतात तसा काहीसा प्रकार असावा स्मित

तसंच, "तुझे देख देख सोना" मला काही दिवस "तुझे देख देख रोना" असं ऐकू यायचं स्मित

अरे बाप रे! प्रेयसीकडे पाहून झोपाळणारा हा प्राणी पहीलाच... हसून हसून गडबडा लोळण

आयला, ते काटे नही कटतेचा अर्थ हा आहे होय.. मला आजच उमगला.. मला आजपर्यंत तो शब्द गुलाबाच्या काट्याशी संबंधीतच वाटायचा... म्हणजे गुलाबाला काटे असले तरी ते टोचत नाहीत कारण श्रीदेवी मिस्टर इंडीयाच्या प्रेमात पडली आहे असा काहीतरी अर्थ असावा असे मला वाटत होते.. हाहा

फिझा मधल 'पिया हाजी अली ' गाण
यहां दिलसे मांगो............ये हाजी अली है!!!!!!!!
खुदाके .........................बली है!!!!!!!!!!!!!!

दक्शिना अग "तुझे देख देख सोना, तुझे देखकर है जगना" असं काहीतरी होतं, बहुतेक माझे रात्र आणि दिवस तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशी संपतात असं काहीतरी ह्या प्रेमवीराला सुचवायचं असावं स्मित

तसंच नवं "किंग इज सिंग" मला पहिलं "चेंगीजखान" आणि नंतर "फ्रेंन्किस्टिन" असं काहीतरी भयानक ऐकू आलं स्मित

चिन्या, हे म्हणजे "प्रिया गोल्ड हकसे मांगो" असं काहीतरी वाट्लं एकदम स्मित पण पुढल्या वेळी हाजीअलीवरून जाईन तेव्हा लक्शात ठेवेन स्मित

हेहे..ते सिंग इस किंग आहे! म्हणजे परत चुकीचं ऐकलं! स्मित

खर गाण काय आहे???

बीएसके, ह्या वेळी ऐकलं होतं बरोबर, पण ही टाईपिंग मिस्टेक होती स्मित चिन्या, खरं गाणं "सिंग इज किंग" असंच आहे स्मित

टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा
पाठीवरती झी मराठी पायी रुपेरी तोडा स्मित
- माझी २ १/२ वर्षाची मुलगी

माझ्या ५ वर्षाच्या मुलीनी तिची चूक दुरुस्त केली -

अग, पाठीवरती झी मराठी नाही, पाठीवरती झी मखमली स्मित

तस खूपच जुनं नाहीये हे गाण: (मिशन काश्मीर) बुंब्मरो...बुंब्मरो हे मी काही तरी फारच वेगळ ऐकल होत आणी तसच गुणगुणायचो: डुब मरो डुब मरो.... >> आणी वाईट म्हणजे अंताक्षरी स्पर्धेतही मी ^असच^ म्हटल्याने (मी गात नाही>> निदान लोकांना त स वाट त नाही!) आम्ही हरलो अरेरे आणी मग मला प्रचंड शिव्या पडल्या

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

पाठीवरती झी मखमली >> हाहा.

पाठीवरती जीन मखमली....

=================

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

मुझे कुछ केहेना है मधल ते करीना च गाण आहे ना ' अगर कहे दिल तेरा तो रंगदे दुपट्टा मेरा'
हे गाण मला बरेच दिवस ' आगरकर है दिल तेरा ' अस काहीस ऐकू यायच
(आपला आगरकर कसा सारखा टीम च्या आत-बाहेर करत असतो तस प्रेयसीच्या हॄदयातही प्रियकर आत बाहेर करत आहे असा काहीसा अर्थ अभिप्रेत असेल अस वाटायच. ) फिदीफिदी

डुब मरो डुब मरो.... >>>> खो खो
आगरकर है दिल तेरा >>>> काय्च्याकै फिदीफिदी

केदार सेमपींच (चित्कारत जोरात खांद्याला चिमटा काढणारी बाहुली स्मित).....
मला सेम अगदी सेम हेच ऐकु यायच ....'अगरकर है दिल तेरा' स्मित

बाकरवडी, कुलदीप - टू मच स्मित केदार, अगदी अगदी, मला पण हे असंच ऐकू यायचं स्मित

अजूनही, ओम शांती ओम मध्ये ते गाणं "अब तो होश नमी दानम" असं शाहरूख काय म्हणतो ते कळलं नाहीये, कोणाला अर्थबोध झालाय का? नेणत्यास जाणते करा....

अब तो होश नही जानम, असं असावं.. म्हणजे मला तरी असंच ऐकू येतं..

केदार सेमपींच (चित्कारत जोरात खांद्याला चिमटा काढणारी बाहुली ).....
मला सेम अगदी सेम हेच ऐकु यायच ....'अगरकर है दिल तेरा'

पाहिलंत ? ग्रेट पीपल नॉट ऑन्ली थिन्क अलाईक , बट आल्सो हीअर अलाईक!! स्मित

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हनुमान या अनिमेटेड चित्रपटातल गाणं माझी ५ वर्षाची मुलगी असं म्हणायची
"अकडम - बकडम जादुकी तिकडम .. हवासे तेज बिजलीसे कम ... छुकर देखे आसमा सनम"

Its the time to Disco हे गाणं माझ्या नवर्‍याला 'इश्क जादू डिस्को' असं ऐकू यायचं आणि त्याचा अर्थ त्याला, 'इश्क झाला की जादू होऊन आपल्याला डिस्को करता यायला लागतो' असा वाटायचा.

'इश्क जादू डिस्को' ,डुब मरो डुब मरो ,आगरकर है दिल तेरा .... >>>> हसून हसून गडबडा लोळण
काय रे हे!! धम्माल चालू आहे इथे नुसती!!
ते दानम चं बघा बुवा... मला पण हवंय फिदीफिदी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जीवन जगण्यात धाडस आहे.. मृत्यूला शरण जाण्यात नाही.

रुनी, टोणगा स्मित

एक जुनं गाणं आहे, धर्मेंन्द्र, रेहमान आणि नूतन ह्यांचा एक पिक्चर होता त्यातलं, त्यात एक ओळ होती "दिलने फिर याद किया, बर्फसी लेहरायी है", नंतर कळलं की ते "बर्फ" नाहीये "बर्क" आहे, म्हणजे मला वाटतं उर्दूमधे वीज