सहावीत असताना माझी शाळा बदलली आणि त्याचबरोबर पंधरा मिनिटात नाचत, बागडत दंगा करत शाळेत जाण्याची सवय सुटली. अर्थात, चालत केलेल्या प्रवासात जरी घर ते विक्रोळी रेल्वे स्थानक आणि दादरला उतरल्यावर शाळेपर्यंत, आणि मग पुन्हा संध्याकाळी शाळा ते दादर स्थानक आणि विक्रोळी स्थानक ते घर अशी भरीव वाढ झाली असली, तरी त्यातली मजा निघून गेली होती. कारण मज्जा करण्याची जागा आता "कधी एकदा स्टेशन/शाळा/घर गाठतोय" या जगप्रसिद्ध मुंबईछाप घाईने घेतली होती.
मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचा चाहता आहे. अगदी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. त्यांच्याकडे असलेलं विषयांच वैविध्य मला खूप आकर्षित करतं. नेहमीचे हाणामारी आणि विनोदपट तर बघतोच, पण शक्यतो थोडे वेगळे सिनेमे बघायला आवडतं. शिवाय यासारखे सिनेमे आपल्याकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्याने बघायला मिळत नाहीत, पण ते कुठल्यातरी वाहिनीवर किंवा डी.व्ही.डी.वर सहज बघायला मिळतात. अशाच काही मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहीण्याचा मानस आहे. सुरुवात २००८ साली आलेल्या पॅथोलोजी या सिनेमापासून करतोय. हे चित्रपटांचे परिक्षण मात्र नाही हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलं असेलच.
भारत व अमेरिका या दोन्ही संस्कृतींमधल्या फरकांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो.
मायबोली चित्रपट महोत्सव
११-१८ फेब्रूवारी २०१०.
सुदामा सिनेमा,
धरमपेठ, नागपूर
संपर्कः ९७६६४९००८१
काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
इक दिन कहीं...
सॉल्लिड गाणं! सोनून गायलेल अर्थात सोनू जे गातो ते सॉल्लिडच म्हणा.. और प्यार हो गया तलं ऐश्वर्या - बॉबी ( देओल)वर चित्रीत केलेलं गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आहे.
अर्थात सिनेमात दाखवल्या प्रमाणे ...और प्यार हो गया असं होत नसतं सहसा.. पण म्हणतात ना जब भगवान देता है तो छप्पर फाडके तसं होत असलं पाहिजे रिअल लाईफ मध्ये.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.
बॉलिवूडपट परत रिलिज व्ह्यायला लागल्यावर नुकताच आलेला चित्रपट न्यूयॉर्क पाहिला.. एकंदरीत विचार करता चांगला प्रयत्न वाटला.. कबिर खान च दिग्दर्शन बर्यापैकी चांगलं आहे.. निल नितीन मुकेशचा अभिनय लई भारी !!!!! कॅट उच्च दिसते..
राजेश खन्ना याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्याने हा सिनेमा केल्यासारखे वाटते.
हा चित्रपट पाहताना बाजूला काढून ठेवलेल्या डोक्यात आलेले विचार....
ष्टॅट...
हीरो रागाने बघतोय असा पोस्टर म्हणजे अॅक्शन पॅक्ड वगैरे पिक्चर असावा. बघू.
काही गुंड, अतिरेकी वाटणारे लोक कोठेतरी बॉम्ब फोडायच्या तयारीत आहेत. पण स्क्रीन वर एक नुस्ताच बूट दिसतो जाड सोल वाला , मग एक पिस्तूल 'क्लिक' होते. आणि कमांडो च्या वेषातील काही लोक तिकडे जाताना दिसतात व एक एक करून ते गुंड मारले जातात.