हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अक्षय कुमारच्या " गरम मसाला " चित्रपटाची आठवण झाली . थीम सुद्धा अगदी तीच आहे . बघताना हसून हसून पोट दुखायला लागते . अंकुश चौधरीला अभिनय आणि दिग्दर्शन अतिशय व्यवस्तीत जमले आहे . तर हा छावा एकाचवेळी तीन तीन गर्ल फ्रेंड्स सांभाळत असतो . त्यातली एक सई ताम्हणकर हिचा फोटोग्राफीचा व्यवसाय असतो आणि हा अंकुश तिला गर्ल फ्रेंड बनवून तिची कार फुकटात चालवत असतो . दुसरी गर्ल फ्रेंड पूजा सावंत , तीची जाहिरातीची फर्म असते परत इथे अंकुश तिचा बॉयफ्रेंड बनून कामाला असतो आणि तिसरी असते कोल्हापुरी मिरची अमृता खानविलकर , अंकुश इथे राहायची सोय होते म्हणून तिच्या बरोबर राहत असतो .
रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.
कोथरुडमधल्या 'सिटीप्राईड' येथे 'पाऊलवाट'चे संध्याकाळी सहा व सात वाजता- असे दोन प्रीमियर शो झाले. या दोन्ही खेळांना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, कलाकार असे सारे उपस्थित होते. या कीर्तीवंतांची मांदियाळी, रांगोळ्या, लाल गालिचे, सनईचे सूर, कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट अशा भारलेल्या वातावरणातल्या या प्रीमियरना १४ मायबोलीकरांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
उपस्थित मायबोलीकरांनी इथे वृत्तांत व फोटो टाकावेत. तसेच चित्रपटाबद्दल काय वाटलं, ते लिहावं, ही विनंती.
"११.११.११" जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो.
सुरू झाल्यावर थोड्या वेळातच लक्षात येते की आपण एक मनोरंजक, सहजसुंदर अभिनय असलेला चित्रपट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा म्हणून किंवा सो-सो शॉट्स ना "मराठीच्या मानाने ठीक आहे" वगैरे म्हणत बघावा लागणार नाही अस्सल मराठी वातावरणातील कथा, ते खेडे, त्यातले लोक, त्यांच्या समस्या व्यवस्थित दाखवल्या आहेत. गावातील राजकारण्यापासून ते भोळ्या नायकापर्यंत बहुतेक जण "नॉर्मल" वागतात.
प्राथमिक माहिती:
उज्जैन नामे एक आटपाट नगर असतं. तिथे एक राजा(प्राण) असतो. तो विसरभोळा असतो. तरी तो राज्य मस्त चालवत असतो. त्याला एक राणी(बिंदू) असते. ती दुसरी असते. पहिली राणी देवाघरी गेलेली असते. तिची मुलगी मोठी होऊन जयाप्रदा झालेली असते. दुसर्या राणीला एक भाचा असतो. तो का कोण जाणे, पण आत्येकडे/मावशीकडेच राहत असतो. तिथे त्याचे संगोपन व्यवस्थित झाल्याने तो गुटगुटीत अमजद खान झालेला असतो.
ढ्याण्ण्ण्ण्णण!
धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे
काही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.
'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!
तुमच्या कॅमेर्यातलं देऊळ काय दाखवतंय?