नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्या चित्रपटाची भरपूर हवा झाली आहे तो म्हणजे 'टाईमपास'. रवि जाधव यांचा हा चौथा चित्रपट. नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या रवि जाधव यांनी त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय आणि त्याला उत्तमरित्या प्रसिद्धी मिळवून दिल्याने जिकडे तिकडे 'टाईमपास'ची चर्चा आहे.
प्रत्येकाच्या मनात एक संहिता दडलेली असते. आपल्या आयुष्याची संहिता, आपले विचार, अनुभव आणि आपल्या दृष्टिकोनांची संहिता. खरं तर एकच काय ते आयुष्य! पण वेगवेगळ्या चष्म्यांमधून पाहिले तर त्याचे विविध कंगोरे, चढ-उतार, मर्यादा आणि परिसीमा नव्याने जाणवतात, दिसतात, दिसू शकतात. ही जाणीवच मुळात साक्षात्कारी आहे. आणि अशा जाणिवांची लड उलगडताना दरवेळी त्याच त्या परिघांमध्ये फिरणारे कथानक आपल्या सीमा ओलांडून त्यात वेगवेगळ्या वर्तुळांना जसजसे समाविष्ट करत जाते तसतशी त्यातून येणारी अनुभूतीही बदलत जाते. ही अनुभूती म्हणजे संहिता.
इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...
अयोग्य जागी केलेली गुंतवणुक ही फायदा तर मिळवुन देत नाहीच पण मुळ मुद्दल ही धोक्यात पडतं .

नंदिनीच्या अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक या धाग्यावरून ही कल्पना सुचली. कधी कधी चित्रपटातील काही सीन वेगवेगळ्या कारणांमुळे आवडून जातात.
मला आवडलेला एक सीन म्हणजे 'ओमकारा'मधला शेवटचा सीन:
डॉलीचा (करिना कपूर) ओमी (अजय देवगण) गळा दाबून खून करतो. तेव्हा ते दोघं झोक्यावर बसलेले असतात. डॉली तशीच झोक्यावर पडलेली असते. नंतर केसु फिरंगी (विवेक ओबेरॉय) येतो तोपर्यंत ओमीचा गैरसमज दूर झालेला असतो, तो केसुसमोर स्वतःला गोळी घालून घेतो आणि बरोबर झोक्याशेजारी पडतो. झोका हलत असतो तेव्हा एकदा आपल्याला झोक्यावरची डॉली दिसते आणि झोका मागे गेला की खाली पडलेला ओमी!
तर नुकतेच आम्ही मराठी चित्रपटाची तिकिटे अमराठी प्रेक्षकांना ब्लॅक करून एक नवा इतिहास रचला त्याची ही अभिमानगाथा.
गेल्या वर्षीच्या चित्रपटांमध्ये मला बर्फी, वासेपूर, तुकाराम, काकस्पर्श खूप आवडले, पण काळजात घर केलं ते 'इंग्लिश विंग्लिश'नेच. मला वाटते इंग्लिश विंग्लिश हा ’अपने हाथोंसे बनाया हुवा गाजर का हलवा’, ’वडील गेल्यानंतर आईने केलेले काबाडकष्ट’ असला कोणताही मेलोड्रामा न दाखवता देखील आईचा आणि गृहिणीचा केलेला गौरवच आहे.
इंग्लिश विंग्लिशबद्दल प्रोमो पाहिल्यापासूनच उत्सुकता होती. एक तर श्रीदेवी परत येत होती आणि विषय इंटरेस्टिंग वाटत होता. त्यामुळे रिलीज झाल्याझाल्या लगेच थिएटर गाठलेच …
साम्यस्थळे :
१) केवळ उच्च दर्जाचे तंत्र वापरले की पटकथेत आणि दिग्दर्शनात कितीही माती खाल्ली तरी चालते याविषयी चित्रकर्ते ठाम असणे
२) गाजलेल्या पात्रांच्या (पक्षी : तात्या विंचू आणि superman) पूर्वपुण्याई वर प्रेक्षकांना गृहीत धरणे आणि यापूर्वीच्या कामगिरीवर बोळा फिरवणे
३) पहिल्या वीसेक मिनिटातच सिनेमा सोडून जाण्याची उबळ आणणे