"११.११.११" जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो.
सुरू झाल्यावर थोड्या वेळातच लक्षात येते की आपण एक मनोरंजक, सहजसुंदर अभिनय असलेला चित्रपट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा म्हणून किंवा सो-सो शॉट्स ना "मराठीच्या मानाने ठीक आहे" वगैरे म्हणत बघावा लागणार नाही
अस्सल मराठी वातावरणातील कथा, ते खेडे, त्यातले लोक, त्यांच्या समस्या व्यवस्थित दाखवल्या आहेत. गावातील राजकारण्यापासून ते भोळ्या नायकापर्यंत बहुतेक जण "नॉर्मल" वागतात.
प्राथमिक माहिती:
उज्जैन नामे एक आटपाट नगर असतं. तिथे एक राजा(प्राण) असतो. तो विसरभोळा असतो. तरी तो राज्य मस्त चालवत असतो. त्याला एक राणी(बिंदू) असते. ती दुसरी असते. पहिली राणी देवाघरी गेलेली असते. तिची मुलगी मोठी होऊन जयाप्रदा झालेली असते. दुसर्या राणीला एक भाचा असतो. तो का कोण जाणे, पण आत्येकडे/मावशीकडेच राहत असतो. तिथे त्याचे संगोपन व्यवस्थित झाल्याने तो गुटगुटीत अमजद खान झालेला असतो.
ढ्याण्ण्ण्ण्णण!
धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे
काही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.
'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!
तुमच्या कॅमेर्यातलं देऊळ काय दाखवतंय?
दिनांक २ ऑक्टोबर २०११.
रविवार असल्यामुळे दुपारचे जेवण करुन घरी मस्तपैकी पहुडलो होतो. दुपारची झोप महत्वाची होती. सवय ... दुसरे काय? पण झोप येईपर्यंत काहीतरी टाईमपास म्हणून टिव्हीवर चॅनल फिरवीत होतो. एका चॅनलवर सुप्रसिद्ध 'सरफरोश' चित्रपट लागलेला दिसला.
तूच माझी आई देवा तूच माझा बाप
गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप...
या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते.
बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो.
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.