लाभार्थी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 9 November, 2017 - 00:44

लाभार्थी
त्यालाही माहीत नव्हतं
तिलाही माहीत नव्हतं
ते हसतात तेव्हा
चांदण सांडतं
कारण वर्षानुवर्षं
गावात कोण हासलचं नव्हतं
पण लाभार्थीच्या जाहीरातीनं किमया केली ....

टीव्ही आल्यावर तर एवढच
कळलं टीव्हीत दिसाया मॉप
कष्ट आन पैकं लागत्यात
...
मग असचं एक दिस क्वाण म्हणलं
गावाची एक डाकूमेंट्री काढायची
त्यात मंग समदा गाव जमलं
ठेवनितलीच जुनी कापडं
हासली चकाचक
पोळ्याला जुनी झूल बैलावर तशी
फोटुच्या मिसनीपुढ उभं गाव

साहेब म्हणला हसा
पण लोकं म्हणली
ते काय असतयं राव
....
...
..
गोदाक्का आन म्या त रडतच हुतो
फोटुच्या टायमाला
मंग सटवी कानात म्हणली
हसा नाय तर पाऊस पडणार नाय
रडत रडत हासू फुटलं
भूईला उपळं दिसलं
....
...
आन लई उशीरा कळलं
आमचं आसू अन हासू
जी फकस्त आमचं हुतं
ते बी इकलं समद्यानी
ज्याला जसं जमलं तसं पिढ्यानपिढ्या
आन लाभार्थी झालं तेच
आता आमचं कायपण नाय
आसू आन हासू आता येतच नाय
सगळ कसं आलबेल हाय .

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

Realistic!