हरवलेला गाव

Submitted by @गजानन बाठे on 11 October, 2019 - 20:47

हरवलेला गाव
हरवल्या कुठे निंबा खालील मैफीली,
संसार उंबराने का थाटला असावा?

यार, मित्रांस तो परका झाला,
बंगल्यात कुठे घेत असेल विसावा.

महाकाय वड तो उघडा पडला,
पारंब्यानी दगा दिला तर नसावा?

रगडता फुले ही दर्पहीन ते अत्तर,
सुगंध त्यांनीही का विकला असावा.

बारमाही नदी का आटली असावी,
व्यवसाय तिचा ही फसला असावा.

पाखरं ही हरवली एकाएकी अशी,
हो, शहरात त्यांचाही फ्लॅट असावा.

अस्वस्थ गाव जो निद्रामय दिसतो,
शहराचा फाजिल डाव तर नसावा ?

©गजानन बाठे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults