शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

Submitted by नितीन बोरगे on 23 February, 2011 - 02:06

मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,).

जाऊ देत, नमनालाच घडाभर तेल झाल. तर आता हे सर्व आठवायचे कारण म्हणजे आज तूनळीवर उगाचच भटकत असताना अचानक हा विडीयो सापडला. अर्थातच शोध ऑफ सेन्चुरी असल्याकारणाने तुम्हा सर्वांशी शेयर केल्यशिवाय राहावल नाही..

इथे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे! खरंच की नितीन!!! भारीच्चे तुझा शोध... व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्स Happy

खरंच की राव!

भारी

दोघेही गेले म्हणा बिचारे!

पण हात काही दिसले नव्हते पिक्चर बघताना!

ही पोस्ट गूफ अप्स च्या धाग्यावर इमेजेस सकट टाकली होती मी. पण मूळात हा वीडीओ आहे हे माहीत नव्हते. Happy

धन्यवाद मंडळीनो

निम्बुडा : मी खर तर गूफअप्सचेच पान शोधत होतो, पण काल सापडले नाही म्हणून इथे टाकले.

काल माझ्या कडच्या सीडी वर स्लो मोशनमध्ये फ्रेम बाय फ्रेम स्लो करून बघितला . वरील दृश्य कोठेही नाही. एक तर हे वगळलेल्या शॉट्स मधले असले पाहिजे अथवा सॉफ्टवेअरच्या साह्याने एडिट करून नकली बनवले असले पाहिजे. म्हणे शतकातला शोध ! काहीही...

मी शोलेचे २ व्हिडीयो पाहिले आहेत...

१. धर्मेंद्र-हेमाच्या आंबे पाडण्याच्या शॉटमधे 'ये अपने आपको तात्या टोपेके पोते समझते है' हे वाक्य दुसर्‍या Release ला 'James Bond के पोते' केलंय.
२. पहिल्या Release मधे ठाकूर गब्बरला खिळ्यांच्या चप्पलांनी ठेचून मारतो असं दाखवलंय... तर दुसर्‍या Release मधे पोलीस येऊन गब्बरला ताब्यात घेतात..

मला वाटतं दुसरा Release (किंवा तिसरा, चौथा... शेवटचा Release) पटकन आल्यामुळे जुना Release कुणाला बघायला मिळाला किंवा आठवत नसेल. तेव्हा हा शॉट पहिल्या रिलीजमधे असण्याची शक्यता आहे.

@रॉबिनहूड : उगाच शोले स्वत बनवला असल्यासारखा टीका अंगावर घेऊ नका. शोलेच्या दोन रिलीज होत्या. ज्यामध्ये ठाकूर गब्बरला मारतो, तो रिलीज सेन्सॉर बोर्डाने नामंजूर केला होता. म्हणून दुसरा रिलीज ज्यामध्ये ठाकूर गब्बरला पोलीन्सांच्या ताब्यात देतो तो सर्वत्र दाखवला गेला होता.

http://www.veoh.com/search/videos/q/sholay#watch%3Dv19923187HghwyfAJ ह्या मध्ये तुम्हाला शोले ऑनलाईन बघता येईल.

आणि हा मी स्वत घेतलेला स्क्रीनशॉट बघा
sholay.jpg

जिथे हात दिसतात ती वेळ आहे ३:१८:५२ / ३:२५:११