शोले

Submitted by संतोष वाटपाडे on 7 April, 2015 - 00:32

" शोले "

काळतोंड्या गब्बराने वागणे बेफ़ाम केले
एक तोफ़ेनेच शेवट लंबुचे जयराम केले..

खोड ज्यादा बोलण्याची सर्व पोरींनाच असते
गाववाल्यांनी बसंतीला उगा बदनाम केले..

का पसरला आज सन्नाटा असा गावात भाई
आज डाकूंनी कुणाचे कारटे गुमनाम केले..

गाववाल्यांनो नका रोखू मला मी चाललो रे
या बसंतीनेच मजला रोज त्राहीमाम केले..

मावशे समजाव थोडे तू तुझ्या या कारटीला
लग्न करण्याच्या इराद्याला हिने इल्जाम केले..

हात नाही आज ज्याला केवढी बडदास्त त्याची
रामलालाने बिचार्‍या जे हवे ते काम केले..

सांग सांभा का रित्या हाती असा आलास तूही
कोण होती माणसे ज्यांनी तुम्हाला जाम केले..

थांब तू नाचू नको फ़ुटल्यात काचा बाटलीच्या
कालियाने फ़ालतू उद्योग हे मुद्दाम केले..

पाहिले का तू खिळे चपलेत माझ्या चामड्याच्या
मोठमोठ्या डोंगरांचे मीच शाळीग्राम केले.. खिक्क्क

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users