आता कशाला शिजायची बात- मंजू चॉचॉमो चॉकलेटी चॉकलेट मोदक/पंचखाद्य मोदक (फोटोसहित)
Submitted by मंजूताई on 3 September, 2014 - 01:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
लागणारे जिन्नसः
मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.
कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग व्यवस्थित हलवून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण पातळ वाटू शकते. घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.