तळणीचे मोदक

Submitted by मनःस्विनी on 9 September, 2010 - 18:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ वाटी मैदा
१/२ वाटी कणिक
चमचाभर रवा दूधात भिजवलेला ;दूध चार मोठे चमचे घेवून त्यात एखादा छोटासाच चमचा साखर विरघळवून घ्या व त्यातच रवा भिजवा,
मीठ चवीपुरते घालाच्,पारीला चव येते,
४ लहान चमचे कच्चे तेल,मोहन नाही.

खोबरे व गूळाचा चव रोजच्यासारखाच करणे.

क्रमवार पाककृती: 

modak.jpg

कोकणात उकडीचे मोदक व निवर्‍या गणपती घरी येतो तेव्हा करायचे तर तळणीचे मोदक जेव्हा गणपती परत आपल्या घरी जातात तेव्हा करतो. बहुधा प्रवासाला निघालेला बाप्पाला तळणीचे टिकाऊ पदार्थ मिळावे म्हणून. Happy

ह्या कथेनुसार मी दोन्ही करते उकडीचे व तळणीचे.

१) सर्व पीठे,मीठ एकत्र मिक्स करून घ्यायची, भिजलेला रवा टाकून मग मध्ये गोल करून तेल टाकून हातानेच क्रम्स बनवल्यासारखे करायचे.
२) मग रवा भिजवलेले थंड दूध हळूहळू ओतत पीठ एकदम घट्ट भिजवायचे.
३) अर्धा तास ओलसर कपडा घालून झाकून ठेवा. मग अर्धा तास झाला की हाताला जरासेच तेल लावून मस्त मळून घ्या. एकजीव करून कारण रवा आता फुलला असेल.
४) मग एकेक पेढा घेवून पीठाचा पारी कडेला पातळ (फार नाही) पण मध्ये जराशी जाड (कडेच्या मानाने करून) पीठ न घेता लाटून पुरण भरायचे. सगळे मोदक होइपर्यंत ओलसर कपड्यात झाकून शुद्ध तूपात नाहीतर तेलात तळायचे.

इथे आहेत माझे पारीत आमरस घालून केलेले उकडीचे मोदक,
http://www.maayboli.com/node/10599

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात २१ मोठे मोदक होतात.
अधिक टिपा: 

१) आंच मोदक टाकल्यावर मिडियम करायची, आधी तेल व्व्यवस्थित तापवायचे. खूप गरम नाही जसे चकली, शेवेला करतो तसे बिलकूल नाही. मोदक टाकले की तेल जरासे उडवायचे व आंच कमी करून तळायचे.

ते जे चार चमचे दूध घेतो ना त्यात तो एक मोठा चमचा रवा भिजत ठेवायचा. मग दूध गाळून पिठात मिक्स करून क्रम्स करून तेच गाळलेले दूध घालून घट्ट पीठ भिजवायचे.

रवा दूधात २० एक मिनीटे भिजवून ठेवायचा. घाई असेल तर दूध कोमट गरम करून भिजवायचा.

२)रवा व कणिक टाकल्याने खुसखुशीत होतात, एकदम नरम होत नाहित वा कडक नाहे होत. तळताना फोड येत नाहीत. Happy
३) मैद्याने पांढरे दिसतात. म्हणजे हलके रंगावर तळले तरच. नाहीतर नुसत्या गव्हाचे लालकाळे होतात. वरील फोटोत जरा ज्यास्तच तळळे गेलेत माझे. माझी आई मस्त क्रीमीश असे तळते.
४)उरलेल्या पीठाच्या पुर्‍या मस्त होतात. पुर्‍या आमरस मस्त लागतात अश्या पुर्‍याबरोबर. Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत गं.. मी करेन रविवारी Happy

कच्चे तेल लिहिलेस म्हणजे थंडच तेल टाकुन क्रम्स करायचे ना??
मला आधी वाटले चार चमचे दुधातच रवा टाकुन ठेवायचा, पण खाली भिजलेला रवा टाका लिहिलेले वाचल्यावर त्या चार चमच्यातलेच एक चमचा घेऊन त्यात रवा वेगळा भिजवावा हे लक्षात आले Happy

प्राची,
आंच मोदक टाकल्यावर मिडियम करायची, आधी तेल व्व्यवस्थित तापवायचे. खूप गरम नाही जसे चकली, शेवेला करतो तसे बिलकूल नाही. मोदक टाकले की तेल जरासे उडवायचे व आंच कमी करून तळायचे.
साधना,
ते जे चार चमचे दूध घेतो ना त्यात तो एक मोठा चमचा रवा भिजत ठेवायचा. मग गाळून पिठात मिक्स करून क्रम्स करून तेच गाळलेले दूध घालून घट्ट पीठ भिजवायचे.
रोचीन,
रवा दूधात २० एक मिनीटे भिजवून ठेवायचा. घाई असेल तर दूध कोमट गरम करून भिजवायचा.

आमच्याकडे हे मोदक पुरणाचे वा खव्याचे करतात. (यांचे उकडीचे करता येत नाहीत ना !) पण पारिचे हे मिश्रण वेगळे वाटतेय.

हो दिनेशदा, खव्याचे,सुका मेव्याचे, पुरणाचे सुद्धा असेच करतात आमच्याकडे. अशीच पारी करून.
खरेतर आई पुर्‍या सुद्धा अश्याच करते. पुर्‍या चवीष्ट लागतात. नुस्त्या तेलकट,चिवट नाही होत थंड झाल्या तरी. एकतर दूध असल्याने मस्त पीठाला चव येते.

आमच्याकडे सासरी कायम (प्रत्येक चतुर्थीला)तळणीचेच मोदक असतात्.आईकडे कधितरी आवडतात म्हणुन उकडीचे असतात.
मी पारीसाठी फक्त रवा घेते. १ कप रवा असेल तर १ टे.स्पुन तुप घालुन थंड दुधाने भिजवायचा मग ४ तासाने कुटुन मउ करायचे.
करायला सवय नसेल तर थोडे जड जातात पण, अगदी खुसखुशित होतात.

माझी आई पण रव्याचे करते. मी दोन वेळा केले होते. माझ्याकडचा खलबत्ता अती लहान असल्याने कुटणे भयंकर काम होउन जाते. आईनेच सांगितले की फूड प्रोसेसरमध्ये S आकाराचे ब्लेड लावून फिरवले तर छान मऊ होते पीठ.

सिंडरेला! मी पण फुड प्रोसेसर मधुनच काढते,फुड प्रोसेसर नसेल तर ब्लेंडर मधुन सुद्धा फिरवता येते.घरी मात्र कुटुनच घेतात.

मनःस्विनी , तुमचे मी उकडीचे मोदक करून पाहेन ह्यावेळेला. वरचे मोदक ज्यास्त तळलेत का? लाल दिसताहेत? पाकृ छान. Happy

थँक्स सगळ्याना.

रव्याचे मोदकात कष्ट आहेत. पुर्वी तर आजी तसेच करायची. लागतात बाकी मस्त.
आजी तर उकडीचे सुद्धा कधी कधी रव्याची उकड काढून करायची. खूपच खटाटोप आहे. पण दिसतात नी लागतात हि सुंदरच.