मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर येणार्‍या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.

या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.

Nov-2012-yearly-maayboli.jpg

तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद !

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अरे व्वा ! अभिनंदन !
या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). >>> हे फक्त रजिस्टर्ड युजर्सचे आकडे आहेत की सरसकट आहेत. आणि माबोवर रजिस्टर्ड आयडी किती आहेत ?

अभिनंदन माबो प्रशासन आणि शुभेच्छा!
इथे नेहमीच मिळणारी आपुलकी आणि स्नेह प्रत्येकाला खूप आधार देणारा, सुखवणारा असतो. मायबोलीच्या संयत प्रशासनाचे हे यश आहे. धन्यवाद मायबोली Happy

ओह, भारीच आहे हे.....

मा बोवर विविध क्षेत्रातील बहुरंगी, बहुढंगी, अभ्यासपूर्ण असे सर्व असल्याचेच हे द्योतक आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे प्रचंड लाईव्ह तसेच प्रवाही साईट आहे ही.....

अ‍ॅडमीन तसेच लेखक, वाचक वगैरे सर्वांचेच हार्दिक अभिनंदन..

बाप रे!

काय प्रचंड संख्या आहे.

तुडुंब अभिनंदन प्रशासन, प्रशासन टीम, वेबमास्टर, सर्व माबोकर व अतिथी यांचे!

ग्रेट!

अभिनंदन!

आयडी घेतलेले एकूण लोक किती आहेत सध्या?

(११ लाख ऐकल्यावर पूर्वीची महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात आठवली Happy )

अभिनंदन मायबोली टीमचे! या वाढत्या संख्येचा मायबोलीला कसा फायदा होईल? जाहिरात हे मुख्य क्षेत्र आहेच.शिवाय अजूनही काही लक्षणीय परिणाम असतील तर ते ही अ‍ॅडमिनने सांगितले तर आम्हाला अभिनंदन करताना आणखी अभिमान, कौतुक वाटेल.

व्व्व्व्वा!!!!! अभिनंदन!!!! मायबोलीचा एक भाग असल्याचा खुप आनंद होतोय! आणि मायबोलीही आमच्यासारख्या लाखोंच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे!
अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! Happy

भन्नाट आकडेवारी Happy
मायबोली साईटच्या मालक/चालक/संमालक/(असल्यास) मॉडरेटर्स/कार्यकर्ते अन सभासदांचे अभिनन्दन.
अन अर्थातच, मायबोलीच्या सर्व वाचकांचे नेहेमीच स्वागत.

Pages