अटलांटातली दिवाळी !

Submitted by Adm on 18 October, 2009 - 12:50

आर्जे आणि एस्जे ह्यांच्या पुढाकाराने अटलांटावासी मायबोलीकरांनी एकत्र दिवाळी साजरी केली. ह्यावेळी यजमानांची भुमिका जोग दांपत्याने स्विकारली होती आणि त्यांच्या आदरातिथ्याने सर्वच उपस्थित मायबोलीकर भारावून गेले आहेत. घरचे लक्ष्मीपुजन आटोपून सगळे जण ७ च्या आसपास आर्जे च्या घरी जमले. तिथे दिवे, पणत्या लावण्यापासुन सुरुवात झाली. मग मुख्य फराळाचा कार्यक्रम पार पडला.. Happy ह्यात शिल्पा, पूर्वा, मो ह्यांनी बनवलेल्या चविष्ठ आणि फोटोजनिक फराळाच्या पदार्थांचा समावेश होता... मंडळी फराळावर इतकी तुटून पडली की शेवटी "ह्यानंतर डिनर पण आहे" अशी घोषणा आर्जे ला करावी लागली.. Happy
ह्या गटगला जित हा मायबोलीकर आणि त्याची पत्नी हे पहिल्यांदाच उपस्थित होते त्यामुळे परत एकदा ओळखींचा कार्यक्रम झाला... नंतर बाहेर फुलबाज्या उडवून सगळ्यांनी फटाके उडवायची हौस भागवून घेतली.
नंतर कोणाला काही 'आयटम' (ह्यालाच मराठीत सां.का. म्हणतात.. Proud ) करायचे असल्यास करावे अशी सुचना वजा विनंती सगळ्यांनी केली. राहूल (मिस्टर मो) ह्यांनी आपल्या उत्कृष्ठ गिटार वादनाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले.. नंतर जेवायला श्रिखंड पुरी, बटाट्याची भाजी, छोले, कोशिंबीर, कटलेट, जिरा राईस - डाळ असा जोरदार मेन्यू होता. बरोबर अखंड गप्पा चालूच होत्या.. ! बाकीची मंडळी नंतर थांबली होती पण मी आणि रोहित मग निघालो. जोग परिवाराचे घर आणि परिसर अतिथय सुंदर आहे.. एकूण सगळे जण एकत्र जमल्याने दिवाळीचा असा एक माहौल त
तयार झाला, सुग्राह फराळाने तो द्विगुणीत झाला तर नंतर मिळालेल्या गिफ्ट्स आणि फराळाच्या पार्सल मुळे तो त्रिगुणीत झाला.. !!
सायोच्या मलाई बर्फीने ऐनवेळी दगा दिल्याने आमची उपस्थिती हाच आमच्या तर्फे दिलेला फराळ होता.. Uhoh
Proud

हे पहा काही फोटो.

दिवे :

Dive.jpg

फराळ :
Faral1.jpgFaral2.jpgFaral3.jpg

जेवणः
jevan.jpgshrikhanda.jpg

आणि हा ग्रुप :

group.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्तच. मला आता शिट्टीतली दिवाळी असा झब्बू द्यावासा वाटतोय. परंतु पुरेसा वेळ व लक्ष द्यायला वाव नसल्याने हा बेत रद्द करते आहे Proud

फोटोच्या सगळ्या फाईल्स हव्या असतील तर मी जीटॉक वरुन पाठवने घरून.. कारण पिकासावरून लहान होतात फोटो.. भावना, आर्जे तुमचे फोटो पण हवे आहेत मला..

हो अडम पाठवणार फाइल्स, वाट बघा Happy मी फक्त एक बारा गटग चा ग्रुप फोटो पाठव म्हटले तरी मी अजून वाट पहातेय!