मायबोली Statistics

Submitted by HH on 28 April, 2010 - 16:24

मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन

कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००

यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.

Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता

यात आणखी एक नमूद करण्या सारखी गोष्ट ही की जवळ जवळ सर्व कवींना मायबोली वर सदस्यत्व घेऊन साधारणपणे सरासरी १ वर्ष ३० आठवडे ईतका काळ झाला आहे. (अपवाद कौतुक शिरोडकर यांचा त्यांचा सदस्यत्व कालावधी २ वर्ष + आहे.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबर्‍या, आणि खर्‍या सांखिकीतज्ञाप्रमाणे फक्त आकडेवारी दिली आहे, निष्कर्ष वाचकांवर सोडला आहे!
'रेट ऑफ पोएम्स पर डे' असे अ‍ॅनॅलिसिस करायला हवे!

Lol हह!

यातील फक्त कौतुक शिरोडकर हे नाव वाचलेले आहे. तेही उत्तम विनोदी लेखनाबाबत.

...

सूज्ञांस अधिक सांगणें न लगें...... Proud

आम्ही सुज्ञ नाहिहोत.....

>>

मग तर तुम्हाला (डोके) फोडून सांगूनही काही उपयोग नाही म्हणजे प्रश्नच मिटला.... Proud

सर्व टॉप ५ लोकांचे हार्दिक अभिनंदन. Happy

नंदिनी, त्यासाठी साधे सुधे नाही, ग्रुप बिहेवीयरल स्टॅटिस्टिक्स अभ्यासावे लागेल. Proud हह, जमेल का?

एकुण किती प्रतिसाद आलेत ते एक वेळ शक्य होईलही पण ग्रुप बिहेवीयरल स्टॅटिस्टिक्स तपासणे अशक्य आहे!! Happy

असो.

ही माहिती वाचण्यात रस घेतल्याबद्दल धन्यवाद.

हह पोस्ट एडिट कर. विचार कर. नक्की जमेल. तसंही तुझं लिखांण सगळेच हलके घेतात मग घे की चॅलेंज! जाम मजा येईल.. Happy

सायो, अगं चॅलेंज म्हणून नाही. मला या मधे अगदी अ‍ॅकेडेमिक इंटरेस्ट आहे बघ!!! Happy

* ४००० कविता असतील तर एकूण प्रतिसाद किती असतील???
* प्रत्येक कवितेला साधारण किती प्रतिसाद मिळाले असतील??
* सर्वात जास्त कविता लिहिणारे कवि जसे समजले तसे सर्वात जास्त प्रतिसाद मिळवणारे कवि कोण आहेत यामधे फार इंटरेस्ट आहे

हह, बघ नक्की जमेल तुला असे विश्लेषण करायला.

वाचकांचा प्रतिसाद हाच आमचा संतोष असं ब्रीदवाक्य नाहीये का तुझं एच्चेच ?

प्रतिसाद किती , जास्तीत जास्त प्रतिसाद देणारे आयडी कोणते, प्रतिसादात वापरल्या जाणार्‍या शब्दांची वारंवारता हे सगळे रोचक स्टॅट्स पण टाक लवकर ...

हहने माबोवर काय करणं शक्य आहे याचा एक आदर्श घालून दिलेला आहे. तेव्हा यापुढे, नंदिनी सारखे प्रश्ण आणखी कुणाला असतील तर त्यांनी ते गृहपाठ म्हणून घ्यायला हरकत नाही. Wink

जाता जाता, आजचा आकडा ४८५२ आहे. म्हणजे एका दिवसात ८५२ कविता? काही तरी चुकतंय काय?

गुलमोहर->कविता विभागातील पूर्ण भरलेली एकूण पाने - ३२३.
प्रत्येक पानावर १५ कवितांच्या नोंदी, म्हणून एकूण नोंदी - ३२३ * १५ = ४८४५
३२४ व्या पानावर एकूण ७ कवितांच्या नोंदी आहेत, म्हणून सर्व कवितांची संख्या = ४८५२.

Pages