किलबिल : सानिकाचे बाल गणेश!

Submitted by maitreyee on 11 September, 2010 - 07:41

बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" Happy )
sanika-bal-ganesh pic.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..
मैत्रेयी असूदेत चेंडू, तिला गणपती बाप्पा तिच्या मित्र मैत्रिणींपैकीच एक वाटत असेल. Happy
माझे पुतणे चॉकलेट्स आणि आईस्क्रीमचा नैवेद्य दाखवायचे गणपतीला... Proud

एक अजून अ‍ॅड करायचे राहिले. तिच्या चित्राची प्रेरणा एक नेटवरचे बाल गणेश डिव्हिडीचे पोस्टर होते. त्यात त्या गणेशाची हाता पायाचे बरीच कॉम्प्लिकेटेड पोझ होती. सानिकाने दोन तीन मिनिट चित्राचं नीट निरीक्षण केलं , अन शेवटी स्वतःच त्यात हवे तसे बदल करून तिला हवी तशी पोझ काढली. तिचे स्टेन्डर्ड आहे ते एक. बॉय असेल तर हीच पोझ. अन गर्ल असेल तर ती डान्स कम उडण्याच्या बेतात असलेली काढणार Lol
बाकी चेहरा, डोळे , दागिने वगैरे काढण्यात तिचा हातखंडा आहेच. कायम पर्‍या अन राजकन्या असली चित्रे काढून त्यात हात बसलाय अगदी. मला पण असे छान डोळे काढायला जमत नाहीत. हात, पाय यात मात्र सुधारणेला वाव आहे Happy

फंडु आहेत बाल गणेश Happy मॉडर्न गणेश आहेत त्यात यु एस ओपन सुरु आहे त्यामुळे ते टेनिसचा चेंडु घेऊन आलेत यंदा Happy

गणपती बॉलिंग करायच्या तयारीत असल्यासारखा वाटतोय. Happy
रागाऊ हं नकोस मैत्रेयी, कौतुकाने म्हणतेय मी. मस्त काढलाय ग. Happy

मैत्रेयी, तुझी ही कन्या तुझ्यापेक्षा तिच्या मावशीवर जास्त गेली असे दरवेळी दिसून येते आहे Happy

गणपती छान! आईचे पण कौतुक Happy

मैत्रेयी, गणोबाची पोझ आवडली! कसा तयारीत आहे एकदम! छान काढलाय गं, सांग सानिकाला! हातातला मोदकाचा लाडू देखील फंडू! Happy

मैत्रेयी, तुझी ही कन्या तुझ्यापेक्षा तिच्या मावशीवर जास्त गेली >>>> बी , कशावरून रे? माझी चित्रकला पाहिलीयस का तू ? Proud Happy

जबरी!! Happy आपल्याला आवडला हा बाप्पा! Happy
डोळे मस्तच! पापण्या लय आवडल्या.. आत्ता उघडझाप करेल असं वाटतय Wink

छानच काढलय हो मै!!! केसाची बट विशेष आवडली!
दोन्ही मुलं एकदम आर्टिस्ट आहेत तुझी. मागे मुलांनी काढलेलं चित्र पण मस्त होतं Happy

मैत्रीयी, गणपती क्युट आहे गं. लहान मुलांना स्वःता विचार करण्याची आवड छान... सानिकाचे उत्तर वाचूनच हसायला आले... Happy

Dearest Sanu ,
I love your unique style of drawing 'Bowler Bal Ganesha'
Ganesha' s hair inspired from 'Bal Krishna' and the ornaments look too cute :).
I would like to suggest a caption , 'God save Indian cricket' !
- Pichi.

Pages