पणती

पणती

Submitted by रानभुली on 16 March, 2022 - 02:55

घन दाटुनि नाही आले झणी | सौदामिनी कुठुनी ये अंगणी || धृ ||

चिंब भिजली आठवगीते | नभ बरसती तुला बघुनी |
त्या मेघांतून वीज चमकता | माळ प्रभूची शब्द धरी || १ ||

त्या भेटींची चित्रे धूसर | सात पडद्यामागे विरली |
रानी नाही शालू हिरवा | धरा नेसली ऊन्हंकाहिली ||२||

दोन नयनी एकच दृष्टी |अता न होई गाठीभेटी |
दुरूनी सूर आरतीचे येता | खोल गर्भाशी घुमते घंटी ||३||

किणकिणते ध्वनी भरूनी आले | कलत्या साऊल्या पडल्या अंगणी |
मावळतीच्या तेजासंगे | पणती होई नभदामिनी || ४ ||

- रानभुली

शब्दखुणा: 

लेकीने घरी रंगवलेल्या पणत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2020 - 16:45

गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले Happy

लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.

विषय: 
शब्दखुणा: 

दिपावली पणत्या(टी लाईट होल्डर्स)

Submitted by मनःस्विनी on 4 November, 2010 - 03:31

सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या मी स्वनिर्मित पणत्या बनवल्या, ह्यावर टि लाईट ठेवू शकतो. ओळखा पाहु कश्या बनवल्या आहेत.
panati2.jpgpanati1.jpgpanati3.jpgpanati4.jpg

गरम टी लाईट ने नाजूक रंग जरासा हे झाला,
panati5.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पणती