क्लब

Submitted by मामी on 25 October, 2010 - 12:52

आधीच सांगू इच्छिते की, मी ना तळ्यात ना मळ्यात. कुठलीही बाजू न घेऊ शकणार्‍या काही limited edition अभाग्यांपैकी मी आहे. 'मी स्टँड घेतला' याचा अर्थ मी कुंपणावर बसले होते ती उभी राहिले असा होतो.

खालील गझलगुच्छ हा उच्च आहे की तुच्छ आहे हे तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूकडून पाहता यावर सापेक्षी अवलंबून आहे. माझ्यामते माझ्या प्रतिभाश्वानाचे ते पुच्छ आहे. मला खरंतर कवितेतले जामच काही कळत नाही, पण विडंबन म्हटले की डोक्यात शब्द टणाटण उडायला लागतात. हे सुध्दा कधीकधीच होते. केस अजून अगदिच हाताबाहेर गेली नाहीये. Happy

(सुरेश भटांची क्षमा मागून)

क्लबातल्या क्लबात मी तुझ्यासमीप राहते
तुलाच सांगूनी तुझा क्रमशः भाग वाचते ||

असेच रोज नाहूनी लपेट लेख ते नवे
असेच चिंब भाव तू बिंधास सोड मोकळे
तुझा निबंध मात्र मी इथे हळूच पचवते ||

असाच रोज नेटवरी टायपून टाक तू नवे
असेच सांग हासूनी पंख्यांस गू़ज आपुले
तुझ्या गझला तुझी दळे* इथे टिपून काढते ||

अजून तू अज्ञात माझ्या भाव-भक्तीस जरी
जरा विचार जाणत्या मेंब्रांस** एकदा तरी
दुरून कोण ही तुझी फिकीर रोज करते ||

* दळे - पुष्पदल (याचा या संदर्भात अर्थ लेख असा घ्यावा) या शब्दाचे अनेकवचन- दले = दळे. कृपया कोणीही हा शब्द 'दळण' या अर्थी घेऊ नये.

** 'मेंब्रांस' हा शब्द phonetically जरी 'मेंढ्रांस' याला जवळचा असला तरी तो निव्वळ योगायोग समजावा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दळे - पुष्पदल (याचा या संदर्भात अर्थ लेख असा घ्यावा) या शब्दाचे अनेकवचन- दले = दळे. कृपया कोणीही हा शब्द 'दळण' या अर्थी घेऊ नये.

====

Rofl

मामी.... साष्टांग नमस्कार Happy
बादवे आपण मात्र तुमच्या क्लबची लाईफटाईम मेंबरशीप घ्यायला तयार आहे, अट एकच फी तुम्ही भरायची. ती म्हणजे दिवसाला अशा दोन किमान एक भन्नाट गझला ऐकवायच्या Proud

सासुबाई, भलत्याच प्रतिभाशाली निघालात की तुम्ही.... भन्नाट जमलिये. मला पहिला स्पष्टीकरणाचा परिच्छेद अफलातून वाटला... >>>खालील गझलगुच्छ हा उच्च आहे की तुच्छ आहे हे तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूकडून पाहता यावर सापेक्षी अवलंबून आहे. माझ्यामते माझ्या प्रतिभाश्वानाचे ते पुच्छ आहे.

. 'मी स्टँड घेतला' याचा अर्थ मी कुंपणावर बसले होते ती उभी राहिले असा होतो. Rofl

ओहो,हे वाक्य म्हणजे मामींच्या निखळ प्रतिभेची चूणूक आहे.... Happy

"कोण आहे रे तिकडे, जा हत्तीवरून साखर वाटा आणि गावात दवंडी पिटा की इथे एक बीबी सापडलाय ज्यावर भांडण चालू नाहीयेत"

सगळ्यांनी sportingly घेतलं, मामींच्या मनास संतोष जाहला......

डॉ, खरंतर तुमची लई भिती वाटत होती हो!

ह्.बा..... माझ्या जामाता, मला सा.बा. म्हणण्याआधी आपल्या ओरिजिनल सा.बां.ची परवानगी काढून ये बरं ... म्हणजे परत येण्याच्या स्थितीत राहिलास तर!

अ.मामी, तुम्ही आणि केवळ तुम्हीच वर्गीकरण केलतं हं.

विशाल कुलकर्णी, अहो मेंबर्शीप न घेता मिळतयं ना वाचायला...मग?

बाकीच्यांना धन्यवाद!

नाय नाय मामी नाय. श्वान आणि फॅन यावरुन काहीही पडणार नाही. या दोघांमध्ये फक्त नावसदृष्यता आहे बाकी काहिच नाही.

Pages