Submitted by विजय दिनकर पाटील on 7 November, 2012 - 06:22
तरहीचा एक अतिजलद प्रयत्न
---
चालले कसले मनोव्यापार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली
जाहली नुकतीच ज्याची तोंडओळख
वाटतो तोही मला आधार हल्ली
बरकतीसाठी जिथे मी जात असतो
आतबट्टयाचा ठरे व्यवहार हल्ली
ऐकण्यामध्ये किती हलका जमाना
कान कोठे टोचतो सोनार हल्ली
दोर मिळतो का कुठे हळवेपणाचा
धावतो 'कणखर' किती मोकार हल्ली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्यवहार?
व्यवहार?
तुम्ही स्वतः लिहू शकता की
तुम्ही स्वतः लिहू शकता की नवीन...
तरही कुठली आहे?
नचिकेत, व्यवहार हे deal ह्या
नचिकेत,
व्यवहार हे deal ह्या अर्थी
एनीवे, तुमची शंका समजली नाही
अजयजी, कैलासरावांनी ओळ दिलीय
अजयजी,
कैलासरावांनी ओळ दिलीय "दाटते आहे...."
विजयजी, एक गंमत
विजयजी,
एक गंमत पहा...
>>>
कैलासरावांनी ओळ दिलीय "दाटते आहे...." <<<
दाटतेच्या आधी पूर्णविराम टाका....

कैलासरावांनी ओळ दिलीय. (म्हणून) दाटते आहे ?
छान गझल आवडली बरकतीसाठी जिथे
छान गझल आवडली
बरकतीसाठी जिथे मी जात असतो...........आतबट्टयाचा ठरे व्यवहार हल्ली>>>ठळक भाग चपखल नाही बसत असे वाटले बदलून पाहता येइल का ?
'मोकार' माझ्यासाठी नवीन .....'मोकाट' माहीत आहे
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39029
अतिजलद प्रयत्न असला
अतिजलद प्रयत्न असला तरी----खूप सुंदर प्रयत्न...
गझल छानच
जाहली नुकतीच ज्याची
जाहली नुकतीच ज्याची तोंडओळख
वाटतो तोही मला आधार हल्ली
दोर मिळतो का कुठे हळवेपणाचा
धावतो 'कणखर' किती मोकार हल्ली<<<
वा वा, गझल आवडली
जाहली नुकतीच ज्याची
जाहली नुकतीच ज्याची तोंडओळख
वाटतो तोही मला आधार हल्ली.....व्व्वा!
दोर मिळतो का कुठे हळवेपणाचा
धावतो 'कणखर' किती मोकार हल्ली.....सुरेख!
व्यवहार मध्ये मीटर गडबडलंय
व्यवहार मध्ये मीटर गडबडलंय
व्यवहार मध्ये मीटर
व्यवहार मध्ये मीटर गडबडलंय
<<<
कुठे गडबडलंय?
जाहली नुकतीच ज्याची
जाहली नुकतीच ज्याची तोंडओळख
वाटतो तोही मला आधार हल्ली... आवडला
एक लघु जास्त आहे तिथे. 'गा गा
एक लघु जास्त आहे तिथे.
'गा गा ल हल्ली' असं मीटर हवंय.
व्यवहार हा शब्द उच्चारताना चुकून बरेचदा गा गा ल असा घेतला जातो.
एक लघु जास्त आहे तिथे. 'गा गा
एक लघु जास्त आहे तिथे.
'गा गा ल हल्ली' असं मीटर हवंय.
व्यवहार हा शब्द उच्चारताना चुकून बरेचदा गा गा ल असा घेतला जातो.<<< चुकून नव्हे, ललगाल = गागाल असेच मीटर आहे या शब्दाचे
व्यव = गुरू
हा = गुरू
ल = लघु
मीटर बरोबर आहे.
मीटर बरोबर आहे. असहमत. असो.
मीटर बरोबर आहे.
असहमत. असो.
असहमत. असो.<<< अहो असहमत काय
असहमत. असो.<<<
अहो असहमत काय त्यात?
'व्य' या अक्षराच्या दोन मात्रा तर जमेस धरत नाही आहात ना?
हम्म्म... तुमचं बरोबर आहे.
हम्म्म... तुमचं बरोबर आहे.
मीटरचं जाऊ द्या हो... फिटर तर
मीटरचं जाऊ द्या हो...
फिटर तर आपला आहे ना..! मंग झालं तर...
नचिकेत लय एकदम परफेक्ट आहे.
नचिकेत लय एकदम परफेक्ट आहे.
सर्वांचे अनेक आभार!
सर्वांचे अनेक आभार!
चालले कसले मनोव्यापार
चालले कसले मनोव्यापार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली
जाहली नुकतीच ज्याची तोंडओळख
वाटतो तोही मला आधार हल्ली
हे दोन्ही शेर खूप आवडले.
'चालले कसले मनोव्यापार हल्ली' इथे 'आहेत' गृहित धरावं लागतंय.