एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 January, 2013 - 22:19

गझल
एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

चेह-याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!

एकटे गाठून मजला घेरले सा-या स्मृतींनी....
या पिशाच्चांना तसे समजावणेही शक्य नाही!

जे तिन्हीत्रीकाळ असती वेदनांनी वेढलेले;
हुंदके गझलेत त्यांना टाळणेही शक्य नाही!

माणसे नाहीत सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

कोणतीही वाट नसते फक्त काट्यांची परंतू;
टाळुनी काटे, फुलांना वेचणेही शक्य नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक वाटली !
२ र्‍या शेरातील परंतू ची गरज कळली नाही
शेवटच्या शेरातील टाळुनी काटे. टाळू =मस्तकाची आठवण झाली दुसरा शब्द योग्य वाटला असता.
टाळुन काटे, फुले वेचणे असे वाचल्या जाते . गै. स. नसावा

चेह-याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!.. ..... ... जखमा/ भाव

माणसे नाहीत... सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

........ मस्त शेर!

@ शा. पै. - छान जमले आहे.

पण माझ्या मते प्रोफेसर जे गजल च्या नावानी पाडतात ते च आधी गजल चे विडंबन आहे. तुम्ही विडंबनाचे विडंबन केलेत.

सर्व विटंबनाकारांचे आभार,
आपली प्रज्ञा व प्रतिभा खर्ची पाडल्याबद्दल!

>>एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
>.बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

वाह, नकाच थांबू, चालत रहा, पुढील वाटचाल सुखमय होवो !

प्रसाद!
फारच विडंबनात्मक बोलता हो आपण!
चहूकडे विडंबन/विटंबनाच दिसते बहुधा आपल्याला!
छान ! लगे रहो.....

छान