केस गळणे सामान्य आहे का?

Submitted by बिथोवन on 17 September, 2020 - 04:20

केस गळणे सामान्य आहे का?

इंटरमिटंट फास्टिंग हा लेख नुकताच वाचण्यात आला. लेखाच्या पहिल्याच वाक्यात दहा किलो वजन कमी झाल्याचं म्हंटले आहे. अभिनंदन. वजन कमी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा लेख एक गाईडलाईन प्रमाणे आहे यात शंका नाही.

अशीच काहीशी गाईड लाईन खालील गोष्टी साठी मिळेल का याचा तपास करतो आहे.

माझ्या मित्राची मोठी बहीण. कॉलेजात होती तेंव्हा दाट केस होते. अगदी घनदाट म्हणावे तसे. यथावकाश तिचे लग्न झाले आणि त्या नंतर हळू हळू तिचे केस गळू लागले. तिचे माहेर आणि सासर एकाच गांवात आहे. म्हणजे हवा पाण्यात काहीच बदल झालेला नाही. प्रेग्नंट असताना केस गळायचे प्रमाण वाढले आणि डिलिवरी झाल्यावर केस इतके गळायला लागले की अगदी स्काल्प दिसण्या इतपत स्थिती झाली. मग 'रिचफिल ' यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. पैसा बरबाद झाला पण रिझल्ट लवकर येईना. बाळाला घेऊन जाणे आणि सिटिंग करणे यात वैताग आला. नंतर मिनॉक्सीदील हे औषध घेतले पण काही फरक नाही. केशरंजन गोळ्या घेऊन पहिल्या, होमियोपथी, आयुर्वेद सगळं केलं पण केस गळण्याचे प्रमाण तसेच राहिले. अगदी सेल्फ कॉंशस झाली बिचारी. कंटाळून सगळे बंद केले आणि आश्चर्य, केस गळण्याचे प्रमाण कमी आले. हे कसे काय झाले असावे आश्चर्यच आहे.

माझ्या एका मित्राची आई. बँकेत उच्च पदावर कार्यरत होती. तिचेही असेच काहीसे झाले आणि अल्मोस्ट बाल्ड झाली. तिनेही अशीच औषधे घेतली आणि नंतर बंद करून टाकली पण केस हळू हळू गळतच राहिले, टक्कल पडे पर्यंत.

वरच्या दोन्ही बाबतीत हेरेडीटरी असे काहीच नाही. त्या दोघींना डायबेटिस नाही किंवा थायरॉइड वगैरे नाही किंवा इतर गोळ्यांचे साईड इफेक्ट वगैरे काही नाही.

केस गळणे सामान्य आहे असे म्हणतात पण इतक्या प्रचंड प्रमाणावर केस गळत असतील तर ही चिंताजनक बाब आहे, खास करून स्त्रियांच्या बाबतीत. दाट केशसंभार कुणाला नको आहे? शेवटी ती एक क्राऊनिंग ग्लोरी आहे.

अशा केसेस कुणी पाहिल्या असतील आणि कुणाला चांगला अनुभव आला असेल तर ते जाणून घ्यायला आवडेल.
......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुण्याहून मी होसुर ला शिफ्ट झाल्यावर एक वर्षभरात माझे केस विरळ झाले होते गळून. May be पाणी बदलले म्हणून असावे. तामिळनाडूचे खूप सौल्टी पाणी आहे. मी काही विशेष केले नाही.
मग 4 वर्षानंतर सेकन्ड प्रेग्नन्सी मधे केस छान दाट झाले परत. (बहुतेक आयर्न,कैल्शिअम गोळ्यांमुळे) त्यानंतर मी मागच्या तीन वर्षापासून आजपर्यंत वॉटर प्युरीफाईर च्या पाण्याने केस धुते.
मेन्टेन आहेत बर्यापैकी.

कॉलेजला शेवटच्या वर्षालाअसताना काय दुर्बुद्धी सुचली आणि कमरेएवढ्या दाट आणि लांब केसांना तिलांजली दिली आणि त्यांना खांद्यावर आणून ठेवले. त्याचा आज खूप पश्चाताप होतो. मध्यंतरी खूप केस गळत होते तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मैत्रिणीकडे केसांची ट्रिटमेंट सुरु केली. तिने केरला आयुर्वेदाचे केसांचे तेल वापरायला दिले ( मी जाहिरात नाही करत आहे) . त्याने बराच फरक जाणवला. दाट केसांसाठी मी रोज एक चमचा तीळ आणि एक तुकडा ओला नारळ खाते. आतापर्यंत पांढरा केस नाही सापडलायं डोक्यात ( ह्याचा
खू SS प आनंद वाटतो बरं का.. )

गेल्या महिन्याभरापासून हा त्रास मला फार जाणवतोय . केस गळून गळून टक्कल पडायला आलाय .
केसाचा बुचडा बान्धला तर लिम्बाएवढा गोळा होतोय .

कॉलेजला शेवटच्या वर्षालाअसताना काय दुर्बुद्धी सुचली आणि कमरेएवढ्या दाट आणि लांब केसांना तिलांजली दिली आणि त्यांना खांद्यावर आणून ठेवले. त्याचा आज खूप पश्चाताप होतो. >>> सेम पिन्च रूपाली Sad
दाट केसांसाठी मी रोज एक चमचा तीळ आणि एक तुकडा ओला नारळ खाते. >> हे करून बघते काही दिवस .
तेल मी त्रिचप वापरतेय काही वर्शापासून . तसा काही फरक पडत नाहीये .

गेल्या वर्शी पर्यन्त केस गळायचे पण बर्यापैकी दाट आणि सिल्की होते . आता एक्दम खराब झालेत .

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून गेल्या 17वर्षांच्या प्रॅक्टिस मधल्या अनुभवांवरून सांगते, केस गळण्याला hereditary, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, मानसिक ताणतणाव, कॅल्शियम -हिमोग्लोबिन कमी असणे, क्षारयुक्त पाणी, केसांना तेल न लावण्याची फॅशन, कुपोषण, parler मध्ये केसांवर केले जाणारे सगळे प्रयोग(निम्म्या लोकांना सूट होत नाहीत.. अगदी आयुर्वेदिक मेंदी लावल्यानेही केस निर्जीव होऊन तुटण्याचे, गळण्याचे, scalp ला allergy झाल्याचे पेशंट पाहिलेत मी. )
आपले केस गळण्याला नेमके काय कारण आहे, याचा शोध घेतला, तर कमी करता येते केस गळणे. नुसते वरवर तेल लावून क्वचितच फायदा होतो.

माझे पण केस खूपच गळत आहेत. ब12आणि कॅल्शियम कमी होते. गोळ्या घेतल्या 3 महिने पण फायदा नाही. शेवटी सोनोग्राफीत कळाले PCOS आहे एक ओव्हरीला. त्यामुळे केस गळणे हे एक लक्षण आहे हे वेळीच लक्षात आले.

टकलू माणसाचे केस गळत असतील तर ते असामान्य आहे कारण आडातच नव्हते पण पोहर्‍यात आले. :दिवे:
बाकीच्या लोकांचे केस गळत असतील तर वेळीच लक्ष करा. _/\_ . १०० पेक्षा जास्त केस रोज गळणे सामान्य नाही.

पुरुषांमध्ये आणि स्त्रीयांमध्ये ही testosterone तयार होत असते. Testosteron चा काही भाग DHT या हॉर्मोनमध्ये कन्व्हर्ट होतो.हे हॉर्मोन शरीरावरचे केस वाढवते पण चमत्कारीतरित्या डोक्यावरचे केस घालवते.DHT sensitivity ही जेनेटीक आहे. ज्यांचे वडील व आई यांच्याकडे टक्कल आहे त्यांना काहीही केले तरी केस जातातच.
यावर उपाय म्हणजे DHT ब्लॉकर्स घेणे,ज्याचे साईड इफेक्टस वाईट आहेत.

बायोटिन या ब गटातील व्हिटॅमिन सप्लिमेंटने केस गळणे कमी होऊ शकते. कुटुंबातील तीन सदस्यांचा अनुभव आहे.
अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

हो गळणार्‍या केसांसाठी अजूनतरी अ‍ॅप ऐकीवात नाही त्यामुळे गळीत केस काऊंट स्वत: च ठेवावा लागतो. नाय ते उपयोगी तरी कोहलीचा स्कोर, धवनचा स्कोर मध्ये वेळ घालवतात लोकं तर केस काऊंट मध्ये वेळ घालवण्यास हरकत नाही.

धागा अणि प्रतिसाद वाचले नाहीत. शिर्षक वाचले..केस गळणे सामान्य असावे
सध्या आमच्याकडे रोज बाथरूममध्ये केसांचा एक भलामोठा पुंजका जमतो . आणि आम्ही तो नेमका कुठल्या डोक्याचा यावरून भांडत बसतो. अजून शोध लागला नाही. पण आम्ही त्याचे टेंशनही घेत नाही. कारण टेण्शन घेतल्याने केस अजून गळतात म्हणे. त्यामुळे उत्तम खा प्या मजेत राहा शरीराला आवश्यक ती सारी पोषणमुल्य मिळू द्या.

<<<दाट केसांसाठी मी रोज एक चमचा तीळ आणि एक तुकडा ओला नारळ खाते>>> चांगला आणि सोपा उपाय आहे. पण हे जे खाणे आहे ते केंव्हा करावे? म्हणजे सकाळी अनशेपोटी, किंवा रात्री झोपायच्या अगोदर वगैरे असे काही वेळा पाळायचे संकेत आहेत का? तसेच तीळ कसले खावेत? कृपया सांगा. धन्यवाद.

<<<दाट केसांसाठी मी रोज एक चमचा तीळ आणि एक तुकडा ओला नारळ खाते>>> हे सर्वांना शक्य नाही, परिणामी भयंकर वाढलेले वजन देखील गिफ्ट मिळू शकते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते

लोकडाऊन मध्ये माझेही केस खूप गळत होते..म्हणजे scalp दिसत होता.. ऑफिस चालू झाल्यावर गळायचे कमी झाले.. पण गेलेले केस कसे परत आणायचे काळात नाही..

लॉकडॉउअनची देणगी आहे, सतत भितीच्या छायेखाली रहाणे, झोपेचे पॅटर्न बदलणे, बसून रहाणे, ह्याने बहुतेकांना केस गळती हॉर्मोन्स बदल त्रास झालेले एकतेय.
एकदा, रक्त तपासणी करा, झोप ,आहार सुधारला की ठिक.
बायकांना, थायरॉईड, चाचणी करावी.

लॉकडॉउअनची देणगी आहे, >>> माझ्या बाबतीत खरंचच देणगी आहे.
रोज आठवणीने वॉलनट्स खाणे, भरपूर आराम, ऑफिसला धावपळ करत जायचं नाही, निवांत कुकिंग करणे, आठवणीने फळं खायला, वेळेवर जेवायला, ऑइल मसाज करायला वेळ यामुळे केस (परत एकदा ) दाट झाले आहेत. नेहमी पाठीपर्यंत असणारे लेअर्स कमरेपर्यंत पोचले आहेत.

टीप - आव्हकॅडो + ऑलिव्ह ऑइल + एक व्हिटॅमिन E ची कॅप्सूल (त्याला किंचित होल करून ऑइल दाबून काढून घ्यायचं) हे महिन्यातून दोन वेळा लावलं. याचा पण ग्रोथ आणि टेक्स्चर सुधारण्यासाठी उपयोग झाला असावा.
मला माहित आहे की आव्हकॅडो महाग आहे, पण महाग ऑईल्स, डॉक्टर ट्रीटमेंटस आणि फसव्या गोळ्यापेक्षा घरच्या घरी खात्रीशीर उपाय केलेला चांगला.
अजून एक टीप - आव्हकॅडो स्कुप करून काढून घेतलं तरी फळाच्या सालीला थोडं राहिलेलं असतं, ते चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचं आणि अर्ध्या तासाने चेहरा गार पाण्याने धुवून घ्यायचा. स्किन इतकी सुंदर होते.

ऑफिस होते तेव्हा वेळच्या वेळी.. दूध . फळे .. पाणी पोटात जात होते.. पण घरी असल्यावर सगळे स्किप होते.. ९ ची लोकल पकडायची म्हटल्यावर ८.३० एक ग्लास दूध.. हेवी नास्ता पोटात जायचा.. पण घरीच आहे म्हटल्यावर .. नवीन पदार्थ.. सगळेच स्किप... शारीरिक श्रम कमी.. मानसिक जास्त..

लॉकडाऊनमधे उलट केस जरा जाड झाल्यासारखे वाटले.निदान गळत तरी कमी होते.चीझ वगैरे जास्त खाल्ले गेले.कदाचित त्यामुळेही असेल.थोडेसे वजन वाढले हा साईड इफेक्ट होता.
त्या कालावधीत दमायला होत होते,पण फ्रेशही वाटत होते.अर्थात मी व्हीआरएस घेतली आहे.त्यामुळे ऑफीसचा त्रास नाही.

ऑफिस होते तेव्हा वेळच्या वेळी.. दूध . फळे .. पाणी पोटात जात होते..>>>>> प्रतिसाद योग्य आहे.

म्हणजे सकाळी अनशेपोटी, किंवा रात्री झोपायच्या अगोदर वगैरे असे काही वेळा पाळायचे संकेत आहेत का? तसेच तीळ कसले खावेत? कृपया सांगा. धन्यवाद.>> मी काही संकेत नाही पाळत. मी शक्यतो जेव्हा भूक लागते त्यावेळीच खाते. एक चमचा पांढरे तीळ रोज आणि ओल्या नारळाचा प्रसादाएवढा तुकडा (आठवड्याला एक नारळ असा हिशोब. ) तीळ उष्ण असल्यामुळे एखादयाला उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मला काही त्रास जाणवत नाही आणि ओला नारळ फॅट फ्री असतो असं मी वाचल होतं.

माझे ही केस लॉक्डाऊन काळापासुनभयंकह्ह गळु लागले आहेत. अति , अवेळी किंवा कमी झोप हे ही कारण असु शकते असे वाटते. आता हापिस सुरु झाले तर थोडे फार बरे वाटत आहे, रुटीन सुरु झाले की जेवण , पाणी ठरलेल्या वेळीच होते.
अस होतय की रिकामा वेळ मिळाला की एक काम धड होत नाही , आनि रुटीन सुरु झाले की कमी वेळा त पण जास्त आनि नीट्नेटी की काम होए आहेत. त्यात स्वैत:ची काळजी घेणे हे मुख्ञ आहे.

ओला नारळ फॅट फ्री असतो असं मी वाचल होत >>>>>> रुपाली, ताज्या नारळाने केस आणी त्वचा दोघांना फायदा होतो. पण आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्यांना सतत पित्त होते त्यांनी खाण्यात शेंगदाण्यांपेक्षा नारळाचा किंवा सुक्या खोबर्‍याचा वापर करावा. याने पित्त कमी होते. आणी दुसरे म्हणजे ज्यांची वात किंवा पित्तकारक प्रकृती आहे त्यांचे केस जास्त गळतात. त्यामुळे आधी जे कारण आहे त्याचाच ईलाज केला तर हे प्रमाण कमी होईल. तीळामध्ये खूप कॅल्शियम असते. साहजीक आहे की तीळ खाल्ल्याने तुला ते मिळतेय.

खोबरेल तेलात थोडे तीळ व एरंडेल तेल मिक्स करुन त्याने मालिश करुन दुसर्‍या दिवशी सकाळी केस धुवावेत. तेलाची वाटी गरम पाण्यात ठेऊन ते तेल गरम होते, डायरेक्ट तेल गरम करु नये.

रश्मी खूप छान प्रतिसाद . मला पण कॅल्शियम डेफिसाठी तीळ सांगितलेले खायला पण ते झेपल नाही अजिबात. तोंड सगळं पिंपल्स ने भरून आलेलं. शेंगदाणे भिजवून खाल्ले तर बहुतेक पित्त होत नसावं.

माझे देखिल केस गळत आहेत. स्काल्प दिसायला लागले आहे. पण यात म्हणजे मी मिठ खुप खाते त्यामुळे असे होत असावे. प्रयत्न करुनही मिठ खाणे कमी होत नाहीये. पण तेल लावत असते डोक्याला. जसे जमेल तसे उपाय घरगुती करुन बघत असते. सध्या हेअर मास्क आणला आहे. निदान रुक्ष झालेले केस थोडे मऊ आणि चमकदार झाले आहेत. लांबी कमरे एवढी आहे. पण अजुन दाट झाले नाहित.
सध्या कांद्याचा रस आणि तांदूळाचे पाणि वापरायला सुरुवात केली आहे. बघु काय फरक पडतोय ते.

केस गळणे हे व्हिटॅमिन कमी, स्ट्रेस , टेंशन्स आणी देखभाल न ठेवल्यामुळे होते आणी बोरींगचे ऑर खारट पाणी असेल तरी गळतात केस, हे सगळे डॉक्टर ने सांगितले आहे. माझे केस खूप गळत होते व्हिटॅमिन SUPPLIMENTS, मेडिटेशन स्ट्रेस साठी, हेअर स्पा सगळे करून पहिले पण फरक नाही पडला, माझ्या एका ओळखीतील काकूंनी केशकींग ऑइल आणी शाम्पू वापरून पाहायला सांगितलं, मी गेल्या ३,४ महिन्या पासून नियमीत केशकिंग ऑइल सोम, बुध आणी शुक्र वारी सकाळी लावते LOCKDOWN मुले ऑइली हेअर चे नो टेंशन Wink आणी दुसर्या दिवशी म्हणजे मंगळ, गुरु, शनी वारी सकाळी केशकिंग शाम्पू ने धुते, बराच फरक पडला आहे नवीन केस ब्लॅक येत आहेत, आधी PREMATURE व्हाईट होत होते.

तेल लावताना अगदी आज्जी लावायची तसे चिपचिप लावायचे एक केस हि सुटला नाही पाहिजे आणि केस नेहमी TIGHT बांधून न ठेवता दिवसातून थोडावेळ मोकळे सोडायचे याने खूप फरक पडला मला. आणी केस धुताना कोमट पाणीच वापरायचे, केस NATURALLY वाळू द्यायचे नो मशीन्स, आणी ओल्या केसात कंगवा नाही लावायचा

मुलीचे लहानपणी केस खूप विरळ होते. मुलगी टकली होते की काय भिती होती. त्यानंतर आम्ही तिला पिडीयाशुअर pediasure व्हॅनिला फ्लेवर द्यायला सुरुवात केली. आणि कदाचित त्यातून केसांना आवश्यक ती पोषणमूल्ये मिळून तिची केसांची स्थिती सुधारली.
अनुभव आहे. दावा नाही पण कोणाच्या मुलीचे केस कमी असल्यास ट्राय करू शकता.

<<<केशकिंग ऑइल सोम, बुध आणी शुक्र वारी सकाळी लावते LOCKDOWN मुले ऑइली हेअर चे नो टेंशन Wink आणी दुसर्या दिवशी म्हणजे मंगळ, गुरु, शनी वारी सकाळी केशकिंग शाम्पू ने धुते,>>> म्हणजे सोमवार सकाळ ते मंगळवार सकाळ असे चोवीस तास लावून ठेवायचे का? रात्री उशांचे अभ्रे, डोक्यावरून घेतलेले पांघरूण तेलकट होत असतील ना...?

तेलकट अभ्रे धुवून टाकता येतात. आहेत केस तोवर लावावे तेल. टक्कल पडल्यावर नवे सुळसुळीत सिल्क-सॅटीन काय ते अभ्रे घेता येतील !

मी डोक्यावरून पांघरुण घेत नाही मी उशी वर जुना टॉवेल लपेटते त्याने उशीचे कव्हर खराब होत नाही

तेलकट अभ्रे धुवून टाकता येतात. आहेत केस तोवर लावावे तेल. टक्कल पडल्यावर नवे सुळसुळीत सिल्क-सॅटीन काय ते अभ्रे घेता येतील !>> +१११:))

तेलकट अभ्रे धुवून टाकता येतात. आहेत केस तोवर लावावे तेल. >> + १.
आमच्याकडे जुने टॉवेल उशीला गुंडाळायला ठेवलेत त्या करता.

मी पण केश किंग तेल वापरायला सुरवात केले.. मला पण थोडा फरक जाणवतोय.. गळायचे कमी झाले. शाम्पू नाही आणला अजून.. मी सरळ बेडवर डोके ठेवते..उशी वापरात नाही, मला ते डोक्याला टॉवेल बांधून झोप येत नाही.. आणि माझ्यासाठी.. झोप आणि केस दोन्ही महत्वाचे..दुसऱ्यादिवशी बेडशीट धुवून टाकते..

जेव्हा माझे केस गळत होते तेव्हा डॉक्टर ने व्हिटॅमिन च्या गोळ्या दिल्या त्या घेतल्या आणि अजिबात केसाला तेल लावायचं बंद केलं आज १.५ वर्ष झाला आहे, तेल ना के बरोबर लावते आहे, touch wood केस गळती बंद आहे
सो हे पण करून पहा तेल कमी वापरा कारण आपल्या शरीरातील तेल केसांना पूरक असेल तर अजून लावायची गरज नसते त्याने आपले रूट्स सॉफ्ट होऊन hairfall चालू होतो, डॉक्टर कडून ऐकलं आहे म्हणून चालू केलं तर result मिळाला

तेलकट अभ्रे धुवून टाकता येतात. आहेत केस तोवर लावावे तेल. टक्कल पडल्यावर नवे सुळसुळीत सिल्क-सॅटीन काय ते अभ्रे घेता येतील !>>>>> बेक्कार हसले मी सीमंतिनी Rofl
माझे पण प्रचंड म्हणावे असे गळतात केस, मला तर आश्चर्य च वाटतय कि टक्कल कसं नाही पडलं? याचा अर्थ नवीन केस पण तेवढेच येत असावेत. मी कलर नाही लावत केसांना, काळेच आहेत त्यामुळे ह्या कारणाने गळत नाहीत नक्कीच

माझ्या आईवर गेलेत माझे केस, आई ६३ व्या वर्षी गेली पण तिचे केस काळे भोर होते, काहीही लावायची नाही ती केसांना. तेलही नाही. तिचे मउ चमकदार केस, पण पातळ. माझ्या वडलांचे एकदम दाट पण पांढरे. मी आणि मोठी बहिण - केस आईवर गेले. दोन नंबर आणि धाकटी बहिण -केस वडिलांवर गेले (पांढरे) त्या दोघी कलर करतात. वडिल कलर नाही करत त्यांचे खुप आधीपासून पांढरे आहेत

मी केशकिंग शाम्पू आणला .. पण त्याला फेस येत नाही.. कदाचित त्यात सल्फेट कमी असावे..
केसांसाठी काही पण.. मी ऑफिसला जाताना पण केसांना तेल लावून पोनी बांधून जाते.. सगळे चम्पू म्हणतात.

केशकिंग शाम्पूला चांगला फेस येतो. मी थोड्या पाण्यात मिसळून, फेस करुन मग लावते. नंतर वाटलेच तर थोडा हातावर घेवून मसाज देते.

Pages