मुंबईचा अन्नदाता

Submitted by अरूण on 17 July, 2008 - 15:57

कालच एका पुस्तक प्रदर्शनातून शोभा बोंद्रे यांनी लिहिलेल मुंबईचा अन्नदाता हे पुस्तक विकत घेतलं.

मुंबईच्या डबेवाल्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे. प्रिन्स चार्ल्स च्या लग्नाला मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रण मिळतं इथपासून या पुस्तकाची सुरुवात होते. काही लेख श्री. मेदगे यांचे "प्रथम पुरुषी एकवचनी" टाईप आहेत, तर काही लेख शोभा बेन्द्रे यांचे आहेत.

या पुस्तकाची अजून एक जमेची बाजू म्हणजे Six Sigma या concept बद्दल दिलेली प्राथमिक माहिती.

फोर्ब्स मॅगझिन मध्ये डबेवाल्यांची केलेली प्रशंसा, अनेकानेक training institutes मध्ये श्री. मेदगे आणि इतरांनी केलेली भाषणे या बाबतीत अजून माहिती देता आली असती.

एकंदरीत डबेवाल्यांचे अनुभव बघता (१०० वर्षांपुर्वी सुरू झालेला हा व्यवसाय), पुस्तक जरा त्रोटकच वाटतं. थोडं अजून वाढवायला पाहिजे होतं असं मला वाटलं.
अर्थात जेव्हडं काही लिहिलं आहे, ते वाचनिय आहेच.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा, हे इथे आलं होय .......... Happy

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  ये रे ये रे पावसा ....... Happy

  अरुण, प्रकाशन कुणाचं आहे?

  बी : आत्ता माझ्याकडे डिटेल्स नाहियेत. संध्याकाळी घरी गेल्यावर पाठवतो.

   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
   चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

   बी : राजहंस प्रकाशन चे पुस्तक आहे हे.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
    चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो