गद्यलेखन

देवयानी - कोथरुडमधील एक उत्तम रुग्णालय

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2015 - 03:42

राधे ६... मीरा-१

Submitted by अवल on 17 January, 2015 - 21:40

आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...

यमुनेकाठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???

फ्लॅश फिक्शन ( शिकार )

Submitted by कवठीचाफा on 16 January, 2015 - 18:06

सरोवराकाठी त्यांची पार्टी पूर्णं रंगात आली होती, वेगवेगळ्या झाडांपासून मिळवलेली मद्ये, मोसमात उपलब्ध असलेली फळे, अनेक तर्‍हेच्या झाडांच्या पानांना एकत्र करून तयार केलेल्या खाद्यकृती, सोबत जिभेला झणका देणार्‍या मुळ्या. हो, असेच सगळे, कारण आता जिभेचे बाकी चोचले पुरवायला दूर दूरपर्यंत एकही शिकार उपलब्ध होत नव्हती, जी काही थोडीफार शिकार शिल्लक होती ती सुद्धा संरक्षीत करून फार दूरवर नेऊन ठेवण्यात आलेली होती.

"पारवा " (एक अधुरी प्रेम कहाणी - भाग २)

Submitted by विश्या on 16 January, 2015 - 04:12

नरेश ने सांगितला प्रेमाचे प्रपोजल विचारल्यानंतर संगीता तर बहरुनच गेली होती , तिच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते , त्या क्षणापासूनच संगीता फक्त आणि फक्त नरेशचाच विचार करू लागली होती , तिच्या मनात प्रेम रुपी फुलपाखरू आनंदाने दवडत होते , ती राहून राहून नरेश बद्दलच विचार करत होती , तिला रात्री जेवण पण जाईना का रात्रभर झोप पण आली नाही , सकाळी आनंदी मनाने ती देवाला जाऊन आली आणि पक्का निर्णय घेतला होता कि आपण नरेश ला प्रेमाचा होकार द्यायचा .

सलाम!

Submitted by झुलेलाल on 15 January, 2015 - 12:36

परवाचाच एक अनुभव. गाडी स्टेशनवर थांबण्याआधी रिकामी झाली होती. मी व्हॉटसअपवर असल्याने मला स्टेशन आल्याचे जरा उशीराच लक्षात आले. फर्स्टक्लासचा तो डबा जवळपास रिकामा होता. समोरच्या बाकावर, माझ्यासारखाच, उशीरा लक्षात आलेला एकजण होता. मी उतरताना सहज वर बघितलं. एक चकचकीत बॉक्स असलेली प्लास्टिकची पिशवी कुणीतरी रॆंकवर विसरून गेला होता. मी बाजूच्या त्या माणसाला विचारलं.
ये आपका है?
त्याची नसल्यामुळे तातडीनं तो नाही म्हणाला. पण लगेचच त्याचं लक्ष त्या पिशवीवर खिळलं.
मी उतरलो. मागे बघितलं.
तो माणूस डब्यात रेंगाळला होता.
थोडं पुढे जाऊन मी थांबून बघू लागलो.

बिकट वाट वहिवाट..... असावी!

Submitted by saakshi on 15 January, 2015 - 08:44

हाहाहाहा...
मस्त!
ए छाने जोक...
....
....
कुणीतरी पाठवलेल्या टिपिकल बायका अशा नी तशा जोकवर हशा सुरू असतो...
...
"अरे आपणच आपल्याला नावे ठेवणारे जोक्स काय फॉरवर्ड करता गं???"
पुढे पाच मिनिटे शांतता...
मग परत एक जोक.. तसाच...
पण मग आपणच सोडून देतो.. मनात येतं ,वेगळा विचार करूच नये का क्कॉय?
की एक पारंपारीक मानसिकता जोपासली की डोक्याला कष्ट होत नाहीत म्ह्णून तसं वागायचं?

शिक्षण, लग्न, मुलं अशा जगाने ठरवून दिलेल्या पायरया..
त्या सो कॉल्ड वेळेत पार पाडणारे ढिगाने आजूबाजूला...
आणि या पायरया पार पाडतानाही आणखी काहितरी हवं आहे असं वाटणं हे चूक का मग??

कलंदर कलाकार बाबा (डॉ अनिल अवचट) भेट वृत्तांत

Submitted by मंजूताई on 15 January, 2015 - 05:14

सालाबादप्रमाणे नवीन वर्ष येतं अन संपत, कसं, ते कळतही नाही. अनपेक्षितपणे डॉ कन्ना मडावी व डॉ प्रकाश व डॉ मंदा आमटेच्या भेटीने दोन हजार चौदाची सांगता झाली अन त्या आठवणी आळवत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात आवडत्या लेखकाच्या भेटीने झाली ... ... क्या बात है! आपलाच हेवा आपल्याला वाटावा. नाही, हा हेवा नाही तर 'ठेवा' आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन