बिकट वाट वहिवाट..... असावी!

Submitted by saakshi on 15 January, 2015 - 08:44

हाहाहाहा...
मस्त!
ए छाने जोक...
....
....
कुणीतरी पाठवलेल्या टिपिकल बायका अशा नी तशा जोकवर हशा सुरू असतो...
...
"अरे आपणच आपल्याला नावे ठेवणारे जोक्स काय फॉरवर्ड करता गं???"
पुढे पाच मिनिटे शांतता...
मग परत एक जोक.. तसाच...
पण मग आपणच सोडून देतो.. मनात येतं ,वेगळा विचार करूच नये का क्कॉय?
की एक पारंपारीक मानसिकता जोपासली की डोक्याला कष्ट होत नाहीत म्ह्णून तसं वागायचं?

शिक्षण, लग्न, मुलं अशा जगाने ठरवून दिलेल्या पायरया..
त्या सो कॉल्ड वेळेत पार पाडणारे ढिगाने आजूबाजूला...
आणि या पायरया पार पाडतानाही आणखी काहितरी हवं आहे असं वाटणं हे चूक का मग??
मग हे जे आणखी काही आहे ते मिळवण्याचा अट्टाहास करायचा नाही??
बिकट वाट वहिवाट नसावी? आणि म्हणून धोपटमार्ग सोडायचा नाही?

अगं कालच केलं बघ नवीन गळ्यातलं... छाने ना??
तुला सांगते, अशा मस्त झाल्या होत्या इडल्या..
गुणी आहे हो पोर, अगदी गृहकर्तव्यदक्ष!
मुलगी म्हटलं की गुणी, सालस, वरचा शब्द हे सगळं असलं की धन्य पावलो!
पण मला आयफेल टॉवर समोर उभं राहून जे वाटतं ते या कशाशीही कंपेअर नाही होऊ शकत असं म्हटलं की उंचावणार्या भुवया!
इडल्या फक्त साऊथ इंडियात कातिल बनतात असं म्हटलं की, "काय बाई आहे"
भजी तळत उभं राहण्यापेक्षा आत्ता कॉफी घेऊन पाऊस बघत उभं राहूच नये???किंवा सरळ उठून कोपरयावरच्या टपरीत चहा पिताना तिच्या निळ्या ताडपत्रीवरून टपटपणारे थेंब पाहूच नये???

--- सगळ्याच वेगळा विचार आणि वेगळ्या स्वप्नांवर जीव असणारयांना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. असा वेगळा विचार करणारर्‍या स्त्रिया घोळक्यात कायम एकट्याच पडतात. पण बिकट वाट निवडली की एकटेपणाची सवय लावून घेता यायला हवी!!

लेख आवडला.
बरंच काही लिहावंसं वाटतंय यावर पण याअगोदर बर्याचदा इथे तिथे लिहून झालंय. Wink

आपण आपल्याला वाट्टेल तसं रहायचं, मूड असेल तर भर पावसात टू व्हीलर काढून भन्नाट भिजून टपरीवर चहा प्यावा, मूड असेल तर नवर्याला , मुलांना भजी पकोडे तळून द्यावे.
फक्तं अमुक एक इमेज जपायची स्वतःवरच जबरदस्ती करू नये.

(अर्थात तुम्हीसुद्धा हेच लिहिलेय म्हणा!)

आपण जे वेगळे करतो ते करून जर आपल्याला हवा तो आनंद मिळत असेल तर ते वेगळे कृत्य ग्रूपमध्ये सांगितल्यावर भुवया उंचावल्या जाणे, 'काय बाई आहे' अश्या अर्थाचे चेहरे होणे ह्याचा त्रास व्हायला नको.

मला ह्या ललितात एक थोडासा गोंधळ आहे असे वाटते.

बिकट वाटेला वहिवाट केलेले आहे. करणे शक्यही झालेले दिसत आहे. पण त्याचे अ‍ॅप्रिसिएशन होत नाही आहे ही बाब एक प्रॉब्लेम असल्याप्रमाणे सांगितली गेली आहे. बिकट वाट वहिवाट असावी हे स्वप्न तर पुरे झालेले आहे ना? Happy

माझा प्रतिसाद कदाचित स्त्री मुक्ती अग्रक्रमाने मांडणार्‍या महिलांना पटणार नाही. स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असणे यावर कुणाचेही दुसरे मत असणार नाही पण याकरता वाटेल ते क्षेत्र निवडुन १६ तास बाहेर रहाणे/ महिनोन महिने प्रोजेक्ट साठी घराबाहेर रहाणे यात स्त्रीची मानसीक आणि शारिरीक परवड होते. स्त्रीया घराशी / मुलांशी मानसिक रित्या जास्त जवळ असल्याने त्यांची घालमेल होते. ही वाट काही सोपी नसते. यालाही बिकट वाट म्हणावे लागेल.

स्त्रीयांनी करियरच करु नये असे नाही पण अश्या परवडी पोटी स्त्रीयांना अनेक शारिरीक मानसीक समस्यांना सामोरे जावे लागते. काही स्त्रीयातर करीयर मध्ये मागे पडु म्हणुन मुलांना जन्म देण्याचे टाळतात.

माझ्या मते यावर एक विचारप्रवाह तयार होत आहे. यातुन बाहेर पडण्यासाठी कमी श्रमाच्या / कमी तासांच्या काही खास स्त्रीयांकरता नोकर्‍या उपलब्ध झाल्यास स्त्री वर्गास सुलभ होईल.

नितीनचंद्र माझ्या मते लेखिकेची करियर करता येत नाही किंवा करियर केल्यामु़ळे परवड होते आहे अशी तक्रार नाहीच आहे!! लेखिकेला केवळ असे वाटते आहे की सांसरिक जबाबदरर्‍या पार पाडतानासुद्धा स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा बळी जाउ देउ नये!! साच्याबाहेरचा विचार ज्यांना करावासा वाटतो त्यांना तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पहिजे.

>>>>लेखिकेला केवळ असे वाटते आहे की सांसरिक जबाबदरर्‍या पार पाडतानासुद्धा स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा बळी जाउ देउ नये!! साच्याबाहेरचा विचार ज्यांना करावासा वाटतो त्यांना तसा विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पहिजे.>> +१०० सुमुक्ता अचूक मांडलंत Happy धन्यवाद Happy

>>>>बिकट वाटेला वहिवाट केलेले आहे. करणे शक्यही झालेले दिसत आहे. पण त्याचे अ‍ॅप्रिसिएशन होत नाही आहे ही बाब एक प्रॉब्लेम असल्याप्रमाणे सांगितली गेली आहे. बिकट वाट वहिवाट असावी हे स्वप्न तर पुरे झालेले आहे ना?>>> बेफिकीर, प्रॉब्लेम नाही, अ‍ॅप्रिसिएशन ची अपेक्षाही नाही, फक्त असं चाकोरीबाहेरचं काहितरी करू पाहणारया लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.