गद्यलेखन

अधुरी कादंबरी... सुरुवात एका प्रेमाची.. भाग ६

Submitted by Kally on 11 January, 2015 - 03:02

काही दिवसानी मला त्याचा वागण्यात थोडा फरक जाणवू लागला,, तो मला ignore करत न्हवता पण मी त्याचा नझरे आड होत चालली होते,, सतत आपल्याच विश्वात दंगलेला असायचा किवा phone वर massage करत तरी असायचा, त्याच वागण बघून मला वाटले की तो प्रेमात तर पडला नाहीये ना कुणाचा... मी विचारले ही तसे त्याला..

तू प्रेमात पडला आहेस का,,,

अबोल तर तू नेहमीच होतास
पण आता पुरता निशब्द झालायस

आपल्याच विश्वात रमलेला असतोस
कधी अचानक परका भासतोस

जणू तू तो नाहीस ज्याला मी माझा म्हणत होते
मान्य आहे मला की तसे खरे कधीच न्हवते

पण एक नाते होते आपल्यात,, आपलेपणाचे
मनाला जोडणार अन मनातले सारे जाणणारे..

नो पनिशमेंट झोन

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2015 - 09:29

मध्यंतरी प्रवासात रस्त्याकडेला लागून एक शाळा होती आणि शाळेवर एक मोठी पाटी होती.

YOUR CHILD IS IN NO PUNISHMENT ZONE

ही पाटी लावलेली पाहून इतके चटकन् लक्षात आले की पालकांना शाळेबाबत विश्वासार्हता वाटावी ह्यासाठी हे विधान मुद्दाम एखाद्या जाहिरातीसारखे झळकवले गेलेले आहे.

अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची..भाग ५

Submitted by Kally on 9 January, 2015 - 03:33

फार छान मैत्री झाली होती आमच्यात. नव्याने ओळखू लागलो होतो आम्ही एकमेकांना. मला त्याच्या सवय, आवडी-निवडी, दिनक्रम सारेच कळू लागले होते. तशी तर आधी ही माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्यापासून आणि शेवट ही त्याच्यापाशीच होत होता पण तेव्हा तो फक्त माझ्या विचारातच असायचा पण आता तो सत्यात आहे, खरा खुरा, आता माझ्या सकाळची सुरुवात त्याला good morning wish करून होते आणि दिवसाचा शेवट त्याचा good night wish ने होतो.
एकदा office मधून घरी जाताना अचानकच आमची भेट झाली शनिवार होता, म्हणून दोघांचे ही office hours लवकर संपले होते.
मी: hi,,, तू ही आज लवकर निघालास?

अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची..भाग ४

Submitted by Kally on 9 January, 2015 - 01:24

होळीचे दिवस होते, दोन दिवसाच्या सुट्टी नंतर मला वाटले म्हणून मी ऑफीस ला जाताना त्याच्या साठी आई ने केलेल्या पुरणपोळ्या घेउन गेले होते पण तो आलाच नाही,,,,,! अस पहिल्यांदाच झाला होत एवढ्या दिवसात की आमची भेट चुकली होती. जस गोरेगाव स्टेशन पास झाल आणि तो आलाच नाही,, तेव्हा मला काही सुचेनासेच झाले. होते. मग विचार केला की रंग खेनूण दमला असेल म्हणणुन आज ऑफीस ला दांडी मारली आसेल तेवढ्या दिवसा पुरते मी स्वात:हला हे कारण सांगून समाजविले होते. पण दुसर्या दिवशी, दुसर्या दिवशी ही तो आला नाही.

कार्टून्स आणि कॉमिक्स

Submitted by बावरा मन on 9 January, 2015 - 00:29

… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला .

शेजार - माधुरी पुरंदरे

Submitted by सई केसकर on 7 January, 2015 - 04:59

गेले काही दिवस माधुरी पुरंदरेंची दोन अतिशय गोड पुस्तकं अनुवादित करण्याचे काम मिळाले. पुस्तकं "शेजार" या शृंखलेतील दोन भाग आहेत.

अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची.. (भाग ३)

Submitted by Kally on 7 January, 2015 - 01:21

दुसर्या दिवशी स्टेशन वर वेळेवर पोहोचले पण संभ्रमात पडले, वाटले लडिज कॉमपार्टमेंट सोडून पुन्हा त्याच डब्यात चढाव का? कदाचित पुन्हा केशवशी भेट होईल,, मनात थोडी हुरहुर होत होती मग तेच केल जे मन सांगत होत.. म्हणजे ट्रेनचा डबा चेंज केला.. गर्दीतून वाट काढत मी एक कोपरा पकडून उधी राहले. कधी एकदाच गोरेगाव येताय अस झाल होत मला, नज़र अगदी ट्रेनचा दारावर खिळून राहिली होती. एक क्षण वाटले की मी काही मूर्खपणा तर केला नाही ना मुद्दाम जेंट्स कॉमपार्टमेंट मधे येउन.. आणि दुसर्याच क्षणी जर तो आलाच नाही तर,,,हा प्रश्न मनात डोकावून गेला..

ओळखीचा शहरात अनोळखीपणे वावरणारी ,,

The Romanov Sisters - हरवलेल्या जीवनाची कहाणी

Submitted by वेदिका२१ on 7 January, 2015 - 00:28

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८३७ ते १९०१ या काळात इंग्लंडवर (आणि भारतावरही!) राज्य केलं. मुंबईतील व्ही.टी. स्टेशन - व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), कलकत्याचं व्हिक्टोरिया मेमोरियल आदी वास्तूंना याच व्हिक्टोरियाचं नाव दिलं गेलं होतं. या व्हिक्टोरियाने आपल्या मुलानातवंडांची लग्नं युरोपातील विविध राजघराण्यात लावून दिली. म्हणूनच तिला ’युरोपची आजी’ (Grandmother of Europe) असंही म्हणतात.

परसदारीचा चाफा -

Submitted by किंकर on 5 January, 2015 - 12:10

रोजनिशी त्याची आणि तिची -
खरच एक नाणे आणि दोन बाजू . वर्षानु वर्षे आपण ऐकत आलो आहोत. मग काय घटना तीच,पण तगमग किती वेगळी . भिन्न दृष्टीकोन. सरळ समोरासमोर नजरेला नजर देत जेंव्हा बोलता येत नाही तेंव्हा आडमार्गाने नजर फिरवत किंवा समक्ष न बोलता माघारी मांडलेली बाजू म्हणजे दृष्टीकोन ?

अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची.. (भाग २)

Submitted by Kally on 5 January, 2015 - 05:07

काही दिवसांनी मला नवीन जॉब ऑफर आली, दादरला, आणि मी ही तिथे रुजू व्हाईचे ठरवले. काही दिवसातच मी त्या रोजचा लोकल ट्रेनचा प्रवासात आणि नवीन नोकरीत रुळले, रमले होते. एकदा मला जरा उशीर झाला आणि मी नेहेमीचे लेडीज कॉमपार्टमेंट चुकले म्हणून मग नाईलाजाने जेंट्स कॉमपार्टमेंट मधे चढले,, तश्या माझ्या व्यतिरिक्त ही बर्याच स्त्रिया होत्या तिथे,, म्हणून मला जरा हायसे वाटले.. गर्दी फार होती आणि सारेच अनोळखी चेहेरे होते. पुढचे स्टेशन आले आणि लोकांची चढ उतार सुरु झाली मी ते पहात होतेच तेवढ्यात माझी नज़र चमकली आणि एका जागी स्थिरावली.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन